श्रीलंकेने मल्टी-सिटी लक्झरी वेडिंग शोमध्ये यशस्वीरित्या दाखवून दिले आहे की त्यांचे बेट एक प्रीमियर वेडिंग डेस्टिनेशन आहे
मुंबई। श्रीलंका टुरिझमने डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपले दरवाजे अधिकृतपणे उघडले आहेत, भारतीय जोडप्यांना आणि कुटुंबांना जगातील एका सर्वात चित्तथरारक ठिकाणी त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण साजरा करण्यासाठी अतिशय आपुलकीचे आमंत्रण दिले आहे. या प्रसंगी, श्रीलंका टुरिझमने संपूर्ण भारतात मल्टी-सिटी लक्झरी वेडिंग शोच्या मालिकेची यशस्वी सांगता केली, ज्यांना अविस्मरणीय विवाह अनुभव हवा असतो अशा जोडप्यांसाठी हे बेट एक प्रमुख पर्याय कसे बनू शकते हे यामध्ये दाखवले गेले.
या शोकेसमध्ये श्रीलंकेतील आघाडीची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, हेरिटेज साइट्स आणि वेडिंग सर्व्हिसेस प्रोव्हायडर्स, मोठमोठे भारतीय वेडिंग प्लॅनर, ट्रॅव्हल एजंट आणि मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात विशेष नेटवर्किंग सत्रे, तल्लीन करणारे अनुभव आणि खास तयार केलेल्या, अनोख्या लग्न संकल्पनांचा समावेश होता - पारंपारिक भारतीय समारंभ आणि आधुनिक लक्झरी उत्सव दोन्ही आयोजित करण्याची श्रीलंकेची अतुलनीय क्षमता यामध्ये दर्शविली गेली.
श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरोचे अध्यक्ष बुद्धिका हेवावासम यांनी सांगितले, “श्रीलंका आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी खुले आहे आणि आम्ही भारताला आमच्यासोबत प्रेम साजरे करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. संपूर्ण भारतातून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आमचा विश्वास दुणावला आहे आहे की, श्रीलंका भारतीय जोडप्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करेल. स्वच्छ, रम्य समुद्रकिनारे आणि चहाच्या तजेलदार मळ्यांपासून ते कोलोनियल वाड्या आणि ऐतिहासिक वारसा दर्शवणाऱ्या किल्ल्यांपर्यंत, हे बेट संस्मरणीय विवाह समारंभ आयोजित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आहेत.”
तुमच्या लग्नासाठी श्रीलंका हे एक सुंदर आणि परिपूर्ण ठिकाण आहे, का?
• वैविध्यपूर्ण ठिकाणे: शांत समुद्रकिनाऱ्यावरील अनवाणी घेतलेल्या शपथा, नयनरम्य बागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभांपासून ते ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये किंवा लक्झरी रिसॉर्ट्समध्ये शाही समारंभांपर्यंत, इथे तुमची प्रत्येक आवड पूर्ण होऊ शकेल अशी सर्व प्रकारची ठिकाणे आहेत.
• जवळचे अंतर आणि पोहोचण्यास सोपे: भारतातील प्रमुख शहरांमधून कमी वेळाच्या विमान सेवा आणि पाहुण्यांसाठी त्रास-मुक्त व्हिसा.
• लक्झरी आणि परवडण्याजोग्या किमती: भव्य विवाह आणि खाजगी बुटीक उत्सवांसाठी तयार केलेली पॅकेजेस.
• विश्वसनीय तज्ञ: जगप्रसिद्ध आदरातिथ्य, भारतीय परंपरांमध्ये पारंगत असलेले वेडिंग प्लॅनर आणि केटरिंग टीम्स.
• अनोखे अनुभव: सांस्कृतिक स्वागत, व्हीआयपी वागणूक, विमानतळावरील ब्रँडिंग, पोलिस एस्कॉर्ट आणि सजावट आणि बांधकामासाठी कस्टम सहाय्य - संपूर्ण वाटचाल अतिशय सुरळीतपणे पार पडते.
उद्योगक्षेत्रासोबत प्रभावी भागीदारी
वेडिंग शोकेसेसनी श्रीलंकेतील लक्झरी हॉटेल्स, प्रसिद्ध स्थळे आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या तसेच भारतातील आघाडीचे वेडिंग प्लॅनर आणि ट्रॅव्हल एजंट यांना एकत्र आणले. त्यांच्यातील सहकार्याच्या भावनेने सीमापार वेडिंग टुरिझम मार्केटची भरभराट होण्याची शक्यता अधोरेखित केली.
डेस्टिनेशन वेडिंग मार्केट वाढत आहे
या कार्यक्रमांमुळे भारतीय जोडप्यांमध्ये बुटीक आणि इंटिमेट वेडिंगचा वाढता ट्रेंड अधोरेखित झाला. श्रीलंका टुरिझम हे या वाढत्या सेगमेंटला क्युरेटेड पॅकेजेस आणि बेस्पोक अनुभवांसह सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक समृद्धी, नैसर्गिक सौंदर्य, लक्झरी आणि परवडणाऱ्या किमती यांचा मिलाप अनुभवायला मिळतो.
श्रीलंका टुरिझमबद्दल
श्रीलंका टुरिझम ही अधिकृत संस्था आहे जी या बेटाला जागतिक पर्यटन स्थळ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. पर्यटनाच्या दृष्टीने देशातील विविध महत्त्वपूर्ण गोष्टी - सांस्कृतिक ओळख आणि साहसी पर्यटनापासून ते लक्झरी वेडिंगपर्यंत - जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी उद्योगातील भागधारकांसोबत जवळून काम करते. वैयक्तिकृत सुविधा सेवा आणि जागतिक दर्जाच्या आदरातिथ्यासह, श्रीलंका भारताचे सर्वात पसंतीचे वेडिंग डेस्टिनेशन बनण्यास सज्ज आहे - खरोखर स्वर्गाइतक्या सुंदर वातावरणात आनंद साजरा करण्याचा अनुभव इथे मिळतो.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें