प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम आणि नऊ एअरबॅग्जने सुसज्ज मुंबई। ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ लाँच केली. या कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्हीमध्ये १५० किलोवॅट पॉवर, क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि डिजिटल, लाइटिंग, तसेच कम्फर्ट तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या केबिनमध्ये डिजिटल स्टेज पॅनोरॅमिक डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले आणि सोनोस प्रीमियम साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली ही ऑल-न्यू ऑडी क्यू३ ५१,९९,०००/- रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ऑल-न्यू ऑडी क्यू३ मध्ये मायक्रो-एलईडी तंत्रज्ञानासह डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, चार निवडण्यायोग्य डे-टाइम-रनिंग-लाइट सिग्नेचर्स आणि तीन प्रगत डायनॅमिक लाइट सिक्वेन्सिंग देण्यात आले आहेत, तर मागील बाजूस इल्यूमिनेटेड ऑडी रिंग्ज वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करतात. नवीन डिजिटल इंटरफेस ड्रायव्हरच्या भोवती सर्व डिस्प्ले, कंट्रोल्स आणि इन्फोटेनमेंट फंक्शन्स एकत्र...
३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...