सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अकुम्सतर्फे आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरीची नोंद; उत्पन्नात वार्षिक १४.९ टक्के वाढ

मुंबई: भारतातील सर्वात मोठी कंत्राटी विकास आणि निर्मिती संस्था (सीडीएमओ) असलेल्या 'अकुम्स ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड'ने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले असून, आर्थिक वर्ष २०२७ ची दमदार सुरुवात केली आहे. कंत्राटी निर्मिती व्यवसायातील सातत्यपूर्ण गती, सुधारलेली कार्यक्षमता आणि ग्राहकांकडून असलेली मजबूत मागणी याच्या बळावर कंपनीने महसूल, महसुली नफा आणि निव्वळ नफ्यात उत्तम वाढ नोंदवली आहे.

अकुम्सने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत १,१६७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, जो आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील १,०२४ कोटी रुपयांच्या तुलनेत १३.९ टक्के जास्त आहे. व्याज, कर आणि घसारापूर्व नफा वार्षिक ३५.४ टक्क्यांनी वाढून१७५ कोटी रुपयांवर गेला आहे. तर नफ्याचे प्रमाण १२.६ टक्क्यांवरून १५.० टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. करोत्तर नफा १०१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत ६५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. निव्वळ नफ्याचे प्रमाणही ६.२ टक्क्यांवरून वरून ८.४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

या तिमाहीत कंत्राटी निर्मिती व्यवसाय हा वाढीचा मुख्य चालक राहिला. कंत्राटी निर्मिती व्यवसायातील महसूल ९६४ रुपयांपर्यंत वाढला. गेल्या वर्षी याच तिमाहीत ८१३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. सातत्यपूर्ण उत्पादन वाढ आणि औषधी घटकांच्या किमतीतील सुधारणेमुळे या विभागाचा घसारापूर्व नफा ११९ कोटींवरून ३६.८ टक्क्यांनी  वाढून १६३ कोटी रुपयांवर पोहोचला.

निकालांवर भाष्य करताना व्यवस्थापकीय संचालक संजीव जैन म्हणाले, "आर्थिक वर्ष २०२७ ची सुरुवात अत्यंत मजबूत आणि उत्साहवर्धक झाली आहे. कंत्राटी निर्मिती व्यवसायातील सातत्यपूर्ण कामगिरी ही बाजारातील उत्तम मागणी तसेच अकुम्सवर आमच्या ग्राहकांनी पसंतचा निर्मिती भागीदार म्हणून दाखवलेला विश्वास दर्शवते."

व्यवस्थापकीय संचालक संदीप जैन पुढे म्हणाले, "कंत्राटी निर्मिती क्षेत्रातील आमचे नेतृत्व अधिक मजबूत करणे, उच्च मूल्याच्या क्षमतेचा विस्तार करणे आणि कार्यक्षमतेत उत्कृष्टता आणणे यावर आमचा भर कायम आहे. भक्कम भविष्यकालीन नियोजन आणि योग्य भांडवल वितरणाच्या जोरावर आगामी वर्षांत शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

'अंतर्मनातील शांती ते जागतिक शांती' या संदेशासह 'जागतिक शांती यात्रा'

मुंबई। अखिल भारतीय आध्यात्मिक समिति (ABAS) ने शांतता, सलोखा आणि मानवी ऐक्य या संदेशासह 'जागतिक शांती यात्रा २०२६' चे आयोजन केले. देशभरातील ३५ हून अधिक ठिकाणी आयोजित या यात्रेत १०,००० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. शांतता, ऐक्य आणि सामूहिक चेतनेचा संदेश पसरवण्यासाठी विविध क्षेत्रांतील आणि व्यवसायांतील लोक एकत्र आले. ' जागतिक शांती यात्रा' मुंबईजवळच्या ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित करण्यात आली होती , जिथे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, विद्यार्थी, तरुण, कुटुंबे आणि विविध व्यवसायांतील लोक, तसेच सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य समुदायांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. यात्रेची मुख्य संकल्पना ' जागतिक शांती ते अंतर्मनातील शांती ' ही होती. यात्रेतून असा संदेश देण्यात आला की, जगातील चिरस्थायी शांतीची सुरुवात स्वतःपासून होते. जेव्हा व्यक्ती आपल्या विचारांत आणि वर्तनात शांती, करुणा आणि सकारात्मकता स्वीकारतात, तेव्हा त्याचा प्रभाव कुटुंब, समाज आणि व्यापक समुदायामध्ये जाणवतो. यात्रेदरम्यान, शांती पदयात्रा, मानवी साखळ्या, पोस्टर्स, संवाद आणि सामूहिक...

बाईकवो आपल्या ताफ्यात १०,००० वाहनांची भर घालणार

मुंबई। बाईकवो ग्रीन टेक लिमिटेड (NSE: BIKEWO) ने २०२६-२७ या आर्थिक वर्षात आपल्या ऑपरेटिंग ताफ्यात जवळपास १०,००० वाहनांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी यासाठी ₹७६ कोटींहून अधिक किमतीच्या वॉरंट्सच्या प्रिफरेन्शियल इश्यूद्वारे निधी उभारणार आहे. हा विस्तार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि वितरणाच्या पलीकडे जाऊन ईव्ही मालमत्ता मालकी आणि लीजिंग, फ्लीट तैनाती, विशेष मोबिलिटी ॲप्लिकेशन्स, ऑपरेटिंग पार्टनरशिप्स, लाइफसायकल सपोर्ट आणि तंत्रज्ञान-आधारित लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमधील कंपनीच्या मोठ्या स्थित्यंतराचे प्रतिनिधित्व करतो. बाईकवोने या पुढील टप्प्याला "बाईकवो असेन्ड" असे नाव दिले आहे. या परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बायो एनर्जी डिव्हिजनसोबत विशेष इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी आणि तैनात करण्यासाठी झालेला एक मोठा करार. जीएसटीसह या करारांचे एकूण अंदाजे मूल्य सुमारे ₹६६.४६ कोटी असून, त्यांची वैधता जुलै २०२३ पर्यंत आहे. हे ट्रॅक्टर विशेष लोडर, कॅचर आणि ग्रॅबर उपकरणांनी सुसज्ज आहेत आणि कंपनी चालक व वाहन संचालन सेवा द...