सीधे मुख्य सामग्री पर जाएं

लोणावळ्यात अमावी सोबत सुरु केले 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज'

ताजचे लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पदार्पण

मुंबई। भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड 'अमावी' च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत.

पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा 'ताज', लक्झरी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपले अग्रस्थान सातत्याने मजबूत करत आहे. 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिला'ची सुरुवात ही ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये आमचे शानदार पदार्पण आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आम्ही आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत, तसेच लक्झरी रिअल इस्टेटच्या एका नवीन श्रेणीमध्ये आमच्या ब्रँडचा विश्वास, उत्कृष्ट सेवा आणि वारसा प्रदान करत आहोत.”

पश्चिम घाटातील ३४ एकरांच्या निसर्गरम्य परिसरात पसरलेला 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' हा एक इंटिग्रेटेड लक्झरी प्रोजेक्ट आहे. यामध्ये ३२ ब्रँडेड व्हिला आणि १०० खोल्यांचे एक आलिशान ताज रिसॉर्ट आहे, जिथून आजूबाजूचे तलाव आणि दरीचे विहंगम दृश्य दिसते. आधुनिक 'बार्न-स्टाईल' वास्तुकलेपासून प्रेरित या व्हिलामध्ये मोठ्या काचेच्या भिंती आणि प्रशस्त व्हरांडे  आहेत, जे येथील नैसर्गिक परिसराशी पूर्णपणे एकरूप होतात. या प्रोजेक्टमध्ये दोन एकराचे 'वाबी-साबी' सेंट्रल पार्क देखील आहे, जे साधेपणा आणि निसर्गाशी ताळमेळ राखण्याच्या जपानी तत्त्वज्ञानावर आधारित आहे. येथे राहणारे लोक मियावाकी जंगल, नेचर ट्रेल्स, झेन गार्डन, स्टारगेझिंग डेक, गोल्फ पुटिंग ग्रीन्स, फिटनेस लॉन आणि मल्टी-पर्पज स्पोर्ट्स कोर्टचा आनंद घेऊ शकतात. या खास प्रोजेक्टमध्ये 'क्लब अमावी' देखील समाविष्ट आहे, जो वेलनेस, मनोरंजन, बँक्वेट आणि डायनिंग सारख्या जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा प्रदान करतो.

अपूर्व कुमार, व्यवस्थापकीय संचालक- अमावी संस्थापक, क्लार्क्स ग्रुप ऑफ हॉटेल्स म्हणाले,“लोक स्वतःला अधिक वेळ देता यावा या उद्देशाने 'सेकंड होम' खरेदी करतात जेणेकरून ते कुटुंबासोबत, निसर्गाच्या सानिध्यात आणि स्वतःसोबत काही क्षण घालवू शकतील. परंतु बऱ्याचदा, ही घरे त्यांच्यासाठी आणखी एक जबाबदारी बनतात. 'अमावी'मध्ये आमचा उद्देश हीच विचारसरणी बदलण्याचा आहे. 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिला' एका घराचा खाजगीपणा आणि स्थैर्य यासोबतच ताज हॉस्पिटॅलिटीची उत्कृष्ट सेवा आणि काळजी यांचा एक अप्रतिम संगम आहे. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला हा प्रोजेक्ट आमचा विश्वास देखील दर्शवतो की कोणताही सार्थक विकास असा असावा जो तिथल्या जमिनीचा आदर करेल आणि आजूबाजूच्या समुदायासाठी मूल्य निर्माण करेल. आम्हाला असे वाटते की माउंट कुसूर ही केवळ एक प्रॉपर्टी नसावी ज्याचे लोक मालक आहेत, तर ती अशी जागा असावी जिथे ते वारंवार परत येतील, ज्याच्याशी त्यांचे नाते जोडले जाईल आणि जिथे त्यांना आपलेपणा जाणवेल.”

हे ब्रँडेड व्हिला विक्रीसाठी उपलब्ध केले जातील, जे एका लीज-बॅक प्रोग्रामच्या माध्यमातून रिसॉर्टच्या इन्व्हेंटरी मध्ये समाविष्ट केले जातील. येथे राहणाऱ्या लोकांना ताजच्या जगप्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी सेवांचा अनुभव मिळेल, त्यामध्ये कन्सिएर्ज असिस्टन्स, हाऊसकीपिंग आणि देखभाल सेवांसह रिसॉर्टच्या सर्व मनोरंजन आणि वेलनेस सुविधांचा समावेश आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल

८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग मुंबई: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन ब्रँड्स व कलेक्शन्स उपलब्ध असतील. यासोबतच २१,००० उदयोन्मुख ब्रँड्स आणि लेबल्स सहभागी होत असून, त्यापैकी १३,००० ब्रँड्स प्रथमच बीएफएफमध्ये सहभागी होत आहेत. मिन्त्राच्या प्रमुख शेरॉन पैस म्हणाल्या, “बिग फॅशन फेस्टिव्हल हा भारताच्या उत्सवी कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला आहे. प्रादेशिक विक्रेते आणि लघुउद्योगांना सक्षम करण्यापासून ते जागतिक आणि भारतीय फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड्समधील सर्वोत्तम उत्पादने लाखो घरांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तो संपूर्ण इकोसिस्टमला जोडतो. एआय आणि विस्तारित डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने आम्ही ८० दशलक्षांहून अधिक ग्राहकांसाठी फॅशन अधिक सुलभ, वैयक्तिकृत आणि अखंड बनवत आहोत.” यंदाच्या बीएफएफमध्ये पुरुष व महिलांचे एथनिक वेअर, पुरुषांचे कॅज्युअल वेअर, महिला...

झेन डायमंड रेडियंट रिफ्लेक्शन्स

सादर केले करवा चौथ स्पेशल झेन डायमंड कलेक्शन मुंबई: प्रेम, समर्पण आणि आयुष्यभराची सोबत यांचा सण करवा चौथ, यंदा नैसर्गिक हिऱ्यांसह अधिक चमकदार बनवा. संध्याकाळी चंद्राचे दर्शन आणि उपवास सोडण्याच्या पवित्र क्षणी हिऱ्यांचे सदाबहार तेज तुमचा आनंद अधिक संस्मरणीय बनवेल. झेन डायमंड इंडिया या खास क्षणासाठी निवडलेले शानदार डायमंड ज्वेलरी कलेक्शन घेऊन आले आहे. तुमच्या जीवनसाथीसाठी प्रेमाची सुंदर भेट द्यायची असो किंवा तुम्हाला तुमचा करवा चौथ लुक सर्वात वेगळा आणि खास बनवायचा असेल - ही अद्वितीय डिझाइन्स तुमचा आनंद द्विगुणित करतील. प्रेमाचे अतूट बंधन आणि आयुष्यभराच्या वचनांचे प्रतीक, हा क्लासिक बँड अस्सल सॉलिटेयर हिऱ्यांच्या अद्वितीय चमकेने सजला आहे. करवा चौथला अंगठीचे खूप खास आणि भावनिक महत्त्व असते. हा सुंदर बँड तुमच्या लग्नातील अंगठीला एक आधुनिक आणि शानदार अपग्रेड देण्यासाठी परफेक्ट आहे. हा तुम्हाला त्या वचनांची आठवण करून देत राहील, जी या पवित्र रात्रीच्या चंद्राप्रमाणे कायम चमकत राहतील. रोज गोल्ड, यलो गोल्ड आणि व्हाईट गोल्डमध्ये उपलब्ध असलेली ही शानदार स्प्लिट-बँड सॉलिटेयर रिंग अतिशय...

आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड ने लॉन्च केले आकाश इनव्हिक्टस - इंजिनियरिंग 2.0

मुंबई: आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड, जे भारतातील आघाडीच्या परीक्षा-तयारी प्रदात्यांपैकी एक आहे, त्यांनी आकाश इनव्हिक्टस-इंजिनियरिंग 2.0 द्वारे आपल्या अभियांत्रिकी तयारी परिसंस्थेला बळकट केल्याची घोषणा केली आहे. ही एक नवीन कामगिरी-चालित शैक्षणिक रचना आहे, जी जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स्ड आणि राज्य सीईटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुव्यवस्थित मार्ग तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. एक ३६०-अंश तयारीचा अनुभव, सहा स्तंभांवर आधारित विद्यार्थ्यांना वर्गात, त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या चाचण्यांमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक टप्प्यावर इनव्हिक्टसचा फरक जाणवेल. हा कार्यक्रम सहा स्तंभांवर उभा आहे: परिणाम-केंद्रित शैक्षणिक दृष्टिकोन: प्रत्येक वर्ग, सराव सत्र आणि उजळणी चक्र एका उद्देशाने नियोजित केले जाते — जेईई ॲडव्हान्स्ड, जेईई मेन, बिटसॅट आणि राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये सर्वोत्तम शक्य रँक मिळवणे. रँक-सिद्ध झालेली शिक्षक टीम: शिक्षक टीम ही आकाश इनव्हिक्टसची सर्वात मोठी ताकद आहे. हीच शैक्षणिक टीम आहे जिने इनव्हिक्टस अभ्यासक...