डाबर ग्लुकोप्लस-सी ने सौरव गांगुली यांच्या सहकार्याने एआय-सक्षम 'दादाज पॉवर कोचिंग कॅम्प' मोहिमेची केली सुरुवात
या नव्या मोहिमेद्वारे 13 लाखांहून अधिक वैयक्तिकृत कोचिंग संदेशांचा लाभ तरुण खेळाडूंना; देशभरातील 11 कोटींहून अधिक मातांपर्यंत पोहोच मुंबई। भारतातील आघाडीची विज्ञानाधिष्ठित आयुर्वेदिक व एफएमसीजी कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने आपल्या लोकप्रिय ऊर्जा पेय डाबर ग्लुकोप्लस सीसाठी माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या सहकार्याने नवीन उन्हाळी मोहिमेची घोषणा केली आहे. ‘दादाज पॉवर कोचिंग कॅम्प’ या नावाने सुरू करण्यात आलेली ही मोहीम जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Generative AI)च्या साहाय्याने तयार करण्यात आलेला एक अभिनव वैयक्तिकृत कोचिंग अनुभव देणारी देशातील पहिली मोहीम आहे. या उपक्रमाद्वारे सौरव गांगुली हे केवळ ब्रँडचे चेहरा न राहता देशभरातील युवा खेळाडूंचे वैयक्तिक मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून समोर येतात. अनेक दशकांपासून सेलिब्रिटी आधारित जाहिराती एकाच संदेशाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचत आल्या आहेत. मात्र, डाबर ग्लुकोप्लस सीची ही नवी मोहीम त्या पारंपरिक पद्धतीपासून वेगळी ठरत प्रत्येक मुलाच्या क्रीडा प्रवासानुसार त्याच्याशी वैयक्तिक आणि अर्थपूर्ण संवाद साधते. या मोह...