सीधे मुख्य सामग्री पर जाएं

बार्बरा ओ'नील यांच्या "डायजेस्ट विथ ईझ २०२६ - द गट हेल्थ रिव्होल्यूशन पॉवर्ड बाय एस ब्लेंड"मध्ये ३५० हून अधिक आरोग्यप्रेमी सहभागी

मुंबई। आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नैसर्गिक आरोग्य शिक्षिका बार्बरा ओ'नील यांच्या "डायजेस्ट विथ ईझ २०२६ - द गट हेल्थ रिव्होल्यूशन पॉवर्ड बाय एस ब्लेंड"च्या अत्यंत यशस्वी आवृत्तीचा नुकताच  यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे समारोप झाला. यामध्ये निरोगीपणा, शिक्षण आणि सर्वांगीण उपचारांच्या परिवर्तनात्मक दिवसासाठी ३५० हून अधिक जण एकत्र आले.

अवेकन युवर सोलच्या सहकार्याने एम्पॉवर लिव्हिंगने सादर केलेल्या या निरोगीपणा (वेलनेस) अनुभव कार्यक्रमाची सर्व तिकिटे विकली गेली. कार्यक्रमाला आरोग्याविषयी जागरूक व्यक्ती, वेलनेस प्रॅक्टिशनर्स, उद्योजक आणि सेलिब्रिटींचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हेलन, अलवीरा खान अग्निहोत्री, मिनी माथूर आणि सोफी चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि सजग जीवनशैलीविषयीचा वाढता रस अधोरेखित झाला. बार्बरा ओ'नीलचे बहुप्रतीक्षित मुख्य सत्र हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. यात त्यांनी पचनशक्तीचे आरोग्य, पोषण, नैसर्गिक उपचार आणि शरीराला पूर्ववत होऊन समृद्ध होण्याच्या क्षमतेला आधार देणाऱ्या जीवनशैलीच्या निवडींबद्दल व्यावहारिक माहिती मांडली. आरोग्य व निरामयतेसाठी शाश्वत व मूलगामी दृष्टिकोनाच्या शोधात असणाऱ्या प्रेक्षकांना त्यांचा संदेश मनापासून भावला.

लाँजेटिव्हिटी संशोधक डॉ. सजीव नायर, प्रख्यात पिलेट्स प्रशिक्षक यास्मिन कराचीवाला आणि फंक्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिखर पतंजली यांचा समावेश असलेल्या विचारप्रवर्तक पॅनेल चर्चेने या अनुभवात आणखी भर घातली. यात दीर्घकालीन निरोगीपणा साध्य करण्यासाठी पचन, हालचाल, तणाव व्यवस्थापन आणि जीवनशैलीच्या सवयी या परस्पर संबंधित भूमिकांचा शोध घेण्यात आला.

समरस होण्याजोगा एक अनुभव म्हणून तयार करण्यात आलेल्या कार्यक्रमाने आतड्यांचे आरोग्य, प्रतिबंधात्मक निरोगीपणा आणि समग्र उपचारांबद्दल अर्थपूर्ण संभाषणांना चालना दिली. त्यामुळे उपस्थितांना त्यांच्या दैनंदिन आरोग्य पद्धतींमध्ये बदल करण्यासाठी कृती करण्यायोग्य साधने आणि ज्ञानासह सक्षमता मिळाली. उत्साहपूर्ण सहभाग आणि खचाखच भरलेल्या कार्यक्रमस्थळाने भारतातील पुराव्यावर आधारित, सर्वांगीण निरामय शिक्षणाची वाढती मागणी अधोरेखित झाली.

याशोनंतर बार्बरा ओ'नील म्हणाल्या, "मुंबईत मिळालेल्या अतुलनीय प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे. आतड्याचे आरोग्य आणि नैसर्गिक उपचारांबद्दल जाणून घेण्यासाठी एवढ्या संख्येने लोक एकत्र येतात हे पाहून प्रतिबंधात्मक, समग्र निरामयतेची वाढती आवड अधोरेखित होते. अशा रस घेणाऱ्या प्रेक्षकांसमोर हा प्रवास मांडणे हा एक बहुमान होता आणि मला आशा आहे, की ही मांडलेली माहिती त्यांच्या आरोग्य आणि स्वास्थ्यात चिरंतन, सकारात्मक बदलांना प्रेरणा देतील."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल ७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात महोत्सव मुंबई। आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील 'आर्ट डेको'च्या प्रवासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (शताब्दी) मियामी आणि मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्याच ट्विन-सिटी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 'आर्ट डेको अलाइव्ह'च्या संस्थापक स्मिति कनोडिया आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संचालक तसनीम मेहता उपस्थित होत्या. ऑक्टोबरमध्ये मियामीत 'आर्ट डेको अलाइव्ह!'चा महोत्सव पार पडला होता. आता यानंतर मुंबईत या महोत्सवाची पहिली आवृत्ती ७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणी पार पडणार आहे.  राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार म्हणाले, ''आर्ट डेको अलाइव्ह! आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रह...

लोणावळ्यात अमावी सोबत सुरु केले 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज'

ताजचे लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पदार्पण मुंबई । भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे ' ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड 'अमावी' च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा ...