सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

अप्रैल, 2026 की पोस्ट दिखाई जा रही हैं

केनडियर सोबत साजरा करा मदर्स डे !

मुंबई। मदर्स डे म्हणजे केवळ एक दिवसाचे सेलिब्रेशन नाही, तर आईने केलेले अगणित त्याग आणि ते करत असताना तिची ती सहज-सुंदर वागणूक, जी अनेकदा आपल्या नजरेतून सुटते, या सगळ्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आईचे शांत समर्पण आणि तिचे निस्वार्थ प्रेम शब्दांत मांडणे कठीण आहे, पण एक देखणा दागिना तिच्या चेहऱ्यावर नक्कीच अद्वितीय चमक आणू शकतो असा दागिना जो ती केवळ खास प्रसंगीच नाही, तर दररोज मोठ्या अभिमानाने मिरवू शकेल. आईला भेट दिला जाणारा दागिना हा केवळ एक अलंकार नसून, आठवणींची एक सुंदर ठेव बनेल. हे दागिने आईच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहेत, जे तिच्या प्रत्येक रूपाला रोजच्या रोज असो वा एखादा खास सोहळा, अधिक खुलवतात. आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती असते, हे दागिने तिच्या महतीचे एक सुंदर प्रतिबिंब आहेत. कल्याण ज्वेलर्सचा लाइफस्टाइल ब्रँड 'केनडियर' खास विचारपूर्वक साकारलेले आणि परिधान करायला सहजसोपे दागिने सादर करत आहे. अगदी नाजूक नक्षीकामापासून ते प्रभावी कलाकुसरीपर्यंत, हे डिझाइन्स आईबद्दलचे तुमचे प्रेम कोणत्याही बडेजावाशिवाय, अत्यंत साधेपणाने आणि आदराने व्यक्त करतात. ...

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बा...

सॅमसंग इंडियाचा हायब इंडियासोबत सहयोग

मुंबई। सॅमसंग इंडियाचा 'शो देम हाऊ इट्स डन #विथगॅलॅक्सी' उपक्रम हायब इंडियासोबत सहयोगाने प्रतिभावान मुलींना ऑडिशन्‍सच्‍या माध्‍यमातून त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सक्षम करत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, सॅमसंग इंडिया १० शहरांमध्ये गॅलेक्सी ऑडिशन स्टुडिओज लाँच करणार आहे. या अंतर्गत निवडक सॅमसंग एक्सपिरियन्स स्टोअर्सचे रूपांतर ऑडिशन आणि कंटेंट निर्मितीच्या केंद्रांमध्ये केले जाईल. या स्टुडिओंमध्ये प्रत्येक शहरातील ऑडिशनच्या पहिल्या दिवशी नामांकित क्रिएटर्सच्या मार्गदर्शनाखाली मास्टरक्लासेस आयोजित केले जातील, ज्‍यामुळे सहभागी मुलींना सादरीकरण करण्यास, नवनवीन कंटेंट तयार करण्यास आणि त्यांच्या यशोगाथा जगासमोर मांडण्यास प्रेरणा मिळेल. "या उपक्रमाच्या केंद्रस्थानी एक साधा पण महत्त्वाचा विश्वास आहे, तो म्हणजे भारतातील प्रत्येक तरुणीमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास असायला हवा आणि तिला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळायला पाहिजे. हायब इंडियासोबत आमचा सहयोग प्रगतीसाठी सज्ज असलेल्या पिढीला ...

भारत-न्यूझीलंडमध्ये 'मुक्त व्यापार' कराराने भारतासाठी प्रगतीची नवी दारे उघडली : एस. जयशंकर

मुंबई। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये आज एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारावर' (एफटीए) स्वाक्षरी केली असून, यामुळे भारताच्या निर्यातीला मोठा वेग मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या कराराचे वर्णन 'ऐतिहासिक मैलाचा दगड' असे केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक विश्वास आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर २७ एप्रिल रोजी हा करार अंतिम करण्यात आला. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी वेळेत हा करार पूर्ण झाल्याचेही जयशंकर यांनी नमूद केले. करारानुसार, भारतातून न्यूझीलंडला जाणाऱ्या १०० टक्के निर्यातीवर शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून भारतात येणाऱ्या सुमारे ९५ टक्के वस्तूंवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी किंवा रद्द करण्यात येण...

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते. ५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल. अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येत...

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

सॅमसंगने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली

मुंबई। सॅमसंग इंडियाने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये विविध विभागांतील २३ मॉडेल्सचा समावेश आहे आणि त्यांची किंमत ३२,९४० रुपयांपासून सुरू होते. हे नवीन एसी एआय फास्ट आणि कंफर्ट कूलिंग तंत्रज्ञानाने सज्ज आहेत, तसेच एआय एनर्जी मोड ३० टक्‍क्‍यांपर्यंत ऊर्जेची बचत करतात. सॅमसंगची एआय फास्ट व कंफर्ट कूलिंग यंत्रणा वापरकर्त्याच्या वापराच्या पद्धतींचे आणि रूममधील परिस्थितीचे आपोआप विश्‍लेषण करते. त्यानंतर त्वरित थंडावा देण्यासाठी फास्ट कूलिंग मोड सक्रिय करते, ज्यामुळे ग्राहकांना कडक उन्हात त्वरित थंडावा आणि आराम मिळतो. रूममधील तापमान इच्छित पातळीपर्यंत खाली आले की, एआय तंत्रज्ञान आपोआप विंडफ्री™️/ड्राय कंफर्ट मोडवर स्विच होते, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गरजेनुसार थंडावा कायम राखला जातो. हे तंत्रज्ञान हजारो सूक्ष्म छिद्रांमधून अतिशय हलक्या स्‍वरूपात थंड हवा पसरवून खोलीतील हवामान संतुलित राखते, ज्यामुळे अंगावर येणारे थंड हवेचे थेट आणि बोचरे झोत टाळले जातात. संपूर्ण कार्यप्रणाली दरम्यान एआय सतत रूममधील परिस्थिती आणि वापरकर्त्याच्या आवडीनिवडींच...

सोमानी सिरॅमिक्स’कडून नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण

मुंबई। जगातील १२ वी सर्वांत मोठी टाइल्स उत्पादक आणि भारतातील टाइल्स, बाथवेअर; तसेच होम अँड बिल्डिंग सोल्युशन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड’ने आपल्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले आहे. घराच्या आणि इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व गरजा एकाच छताखाली पूर्ण करणारे केंद्र म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही नवीन ओळख ‘सोमानी’चा गेल्या पाच दशकांतील प्रवास अधोरेखित करते. केवळ टाइल्स उत्पादक ते आधुनिक जीवनशैलीला आकार देणारा ब्रँड असा हा वेगवान बदल आहे. कंपनीचा विस्तारत असलेला पोर्टफोलिओ लक्षात घेऊन हा नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. ‘हा नवीन ब्रँड आमच्या ५५ वर्षांच्या प्रवासातील एक निर्णायक क्षण आहे. हे आमची नावीन्यपूर्ण वृत्ती, शाश्वतता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. आम्ही आजवर कमावलेला विश्वास, ताकद आणि व्याप्ती या नवीन ओळखीमध्ये सामावलेली आहे. याशिवाय पुढच्या पिढीचे नेतृत्व कंपनीला पुढे नेण्यासाठी सज्ज होत असताना, ही नवी ओळख आमची भविष्यातील दिशा अधिक स्पष्ट करते,’ अशी माहिती ‘सोमानी सिरॅ...

होमलेनकडून सीबीडी बेलापूर नवी मुंबईमध्ये नवीन स्टुडिओचे उद्घाटन

नवी मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते. या लाँचसह, होमलेनने वेगाने वाढणाऱ्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित एंड-टू-एंड होम इंटीरियर सोल्यूशन्स आता घरमालकांच्या अधिक जवळ आणले आहेत. हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. त्यांची स्थानिक बाजारपेठेतील सखोल समज आणि होमलेनचा तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन यामुळे नवी मुंबईतील घरमालकांना अधिक पारदर्शक, त्रासमुक्त व विनाव्यत्यय इंटीरियरचा अनुभव मिळण्यास मदत होईल. होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, “नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे. या...

‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला अक्षय कुमार, करण जोहर, नागराज मंजुळे, आदित्य सरपोतदार आणि इतर अनेक दिग्गजांची पसंती

मुंबई। 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलरला २० एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या रितेश विलासराव देशमुख यांनी साकारलेला हा चित्रपट भारताचे महान योद्धे आणि ‘हिंदवी स्वराज्य'चे  संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आणि वारशावर आधारित आहे. ॲक्शन, भावना आणि भव्य दृश्यांनी सजलेल्या ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सर्वत्र चर्चांना उधाण आणले आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली असून, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही या अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचे भरभरून कौतुक केले आहे. अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक नागराज मंजुळे ते आदित्य सरपोतदार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्रेलरबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाच्या भव्यतेचे आणि आशयाचे कौतुक केले आहे. ‘राजा शिवाजी’...

भारतीय फार्मा क्षेत्रात रे निओ फार्माचे पदार्पण

९०+ फॉर्म्युलेशन्ससह फार्मा क्षेत्रात दमदार एंट्री  मुंबई। रे निओ फार्मा या नेक्‍स्‍ट-जनेरशन फार्मास्‍युटिकल कंपनीने भारतातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अधिकृतपणे आपल्या कार्याचा शुभारंभ केला आहे. स्थिर व विस्तारक्षम कार्यप्रणालीवर आधारित आणि पाच दशकांहून अधिक काळ विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजकतेचा वारसा लाभलेली रे निओ फार्मा अॅक्युट आणि स्पेशलाइज्ड थेरपी विभागांमध्ये ९० पेक्षा जास्त औषध प्रकार सादर करणार आहे. तसेच, अनेक नाविन्यपूर्ण औषधे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहेत. प्रसिद्ध उद्योजक अमित पटनी यांनी रे निओ फार्माची स्थापना केली आहे. पटनी कॉम्प्युटर्सच्या निर्मितीमागे असलेला समृद्ध कौटुंबिक वारसा आणि उत्पादन, आरोग्य पायाभूत सुविधा, ऊर्जा व आर्थिक क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अमित पटनी यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी विज्ञान, नैतिक मूल्ये आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांचाचे अद्वितीय संयोजन भारतातील उदयोन्मुख औषध निर्मिती क्षेत्रात घेऊन येत आहे. रे निओ फार्मा अँटीबायोटिक्स, मधुमेहविरोधी औषधे, गॅस्‍ट्रो-...

किया इंडियाकडून नवीन किया सिरॉस एमवाय२६ लाँच

स्‍पोर्टी व शक्तिशाली फ्रण्‍ट आणि रिअर डिझाइन  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने किया सिरॉस मॉडेल इअर २०२६ (एमवाय२६)च्‍या लाँचची घोषणा केली आहे. ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजा व अभिप्रायानुसार नवीन एचटीई, एचटीई(ओ), एचटीके+(ओ) आणि एचटीएक्‍स(ओ) ट्रिम्‍ससह मॉडेल श्रेणीचा विस्‍तार केला आहे. ८३९,९०० रूपयांपासून सुरू होणारी सिरॉस एमवाय२६ खरेदी करणे सोपे झाले आहे, तसेच या वेईकलचे मूल्‍य-केंद्रित स्‍थान अधिक दृढ झाले आहे. नवीन डिझेल ऑटोमॅटिक ट्रिम्‍ससह ऑटोमॅटिक पर्यायांच्‍या व्‍यापक उपलब्‍धतेमुळे श्रेणीमध्‍ये अधिक पर्याय उपलब्‍ध झाले आहेत. संपूर्ण श्रेणीमध्‍ये प्रबळ ट्रिम धोरण, सुधारित वैशिष्‍ट्य वितरण आणि अधिक वैशिष्‍ट्यपूर्ण एसयूव्‍ही अपीलसह स्‍पोर्टी व शक्तिशाली फ्रण्‍ट आणि रिअर डिझाइन सुधारणांसह नवीन सिरॉस उत्तम, अधिक अर्थपूर्ण मूल्‍य देते. तसेच एैसपैस जागा, प्रीमियम इंटीरिअर्स आणि प्रबळ सुरक्षितता ही मुलभूत वैशिष्‍ट्ये कायम ठेवण्‍यात आली आहेत. ''ग्राहकांच्‍या अभिप्रायांमधून सिरॉस एमवाय२६ च्या उत्क्रांतीला दिशा दिली आहे. डिझाइनमधील सु...

‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित: बंधुभाव, कुटुंब आणि हिंदवी स्वराज्याच्या गाथेची रोमांचक झलक

मुंबई। 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी आणि हिंदी अशा दोन्हीं भाषांमध्ये, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजी पर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य' स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशप...

अक्षयकल्प ऑर्गेनिकचा मुंबई आणि पुण्यात प्रवेश

दक्षिण भारतात सुरू झालेला भारताचा आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँडचा प्रवास आता महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे  मुंबई। भारतातील आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँड (सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादन ब्रँड) अक्षयकल्प ऑर्गेनिकने आज मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दक्षिण भारतातील लोकप्रिय ब्रँडपासून संपूर्ण भारतातील घराघरात पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या आणि स्वच्छ पोषण व शेतकरी सक्षमीकरण या दोन तत्त्वांवर उभारलेल्या अक्षयकल्प ऑर्गेनिककडून महाराष्ट्रात त्यांच्या प्रमाणित सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादनांचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक तसेच त्यांची वेगाने वाढणारी उच्च-प्रथिनांची श्रेणी यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा उरलेला साका किंवा गाळ, अन्न खराब होऊ नये, जास्त काळ टिकावे आणि त्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी वापरली जाणारी संरक्षक द्रव्ये आणि कृत्रिम अॅडिटिव्ह्सपासून ...

आयटेलकडून फीचर फोन्ससाठी काऊंटर रिप्लेसमेंटची घोषणा

मुंबई। आयटेल हा भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान ब्रँड टिकाऊपणा, विश्वसार्हता आणि परवडणाऱ्या किमतींसाठी ओळखला जातो. हा ब्रँड भारतातील आपल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करत आहे. आयटेलने आता १५ कोटींच्या व्‍यापक ग्राहकवर्गाचा टप्पा गाठला आहे आणि हा त्यांच्या परिवर्तनीय प्रवासातील महत्त्वाचा टप्‍पा ठरला आहे. हे यश साजरे करण्यासाठी, आयटेलने त्यांच्या फीचर फोन्सवर कोणत्याही उत्‍पादन डिफेक्टसाठी उत्‍साहवर्धक १ वर्षाची काऊंटर रिप्लेसमेंट ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी बोनान्‍झा आहे. गेल्या दशकात, आयटेलने परवडणाऱ्या किमतीत टिकाऊ आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली, ज्‍यासह ग्राहकांशी दृढ नाते निर्माण केले आहे आणि भारतातील बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतातील १० वर्षांचा प्रवास आणि काऊंटर रिप्लेसमेंट सुविधेच्या लाँचबद्दल मत व्‍यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले, "भारतात १० वर्षे पूर्ण करणे आणि १५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचणे हा आयटेलमधील आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमाना...

त्वस्त्र बाय प्राची फाऊंडेशनने प्राचीच्या जीवन आणि कलेवरील चरित्रात्मक पुस्तकाचे लोकार्पण केले

मुंबई। प्राचीच्या २३ व्या वाढदिवसानिमित्त, त्वस्त्र बाय प्राची फाऊंडेशनने एका मर्यादित-आवृत्तीच्या संग्राहक पुस्तकाचे प्रकाशन केले, जे प्राची सुमित शर्मा यांचे जीवन, कला आणि अद्वितीय आवड एकत्र आणते. प्राची, एक तरुण कलाकार जिने वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत २०० हून अधिक कलाकृती निर्माण केल्या आणि जिचा वारसा मुंबईतील हजारो लोकांच्या जीवनाला आकार देत आहे. हे पुस्तक एक चरित्र आणि निवडक कलाकृतींचा संग्रह आहे—ते प्राचीच्या वयाच्या सहाव्या वर्षापासूनच्या कलात्मक प्रवासाचा, चित्रकला, स्केचिंग, कॅलिग्राफी आणि क्विलिंगमधील तिच्या प्रभुत्वाचा आणि तिच्या कामातील वैशिष्ट्यपूर्ण चिन्हाचा मागोवा घेते: फुलपाखरे (जे तिच्या मते स्वातंत्र्याचे प्रतीक आहे). तिने तिच्या संग्रहाला 'त्वस्त्र' असे नाव दिले—जो 'शुद्ध सर्जनशीलता' या अर्थाचा संस्कृत शब्द आहे—हे नाव तिच्या कलेप्रमाणेच चिरस्थायी राहील. २०२२ मध्ये, जेव्हा प्राची वयाच्या १८ व्या वर्षी मोठ्या जगात आली, तेव्हा तिचे वडील, सलग उद्योजक सुमित गोविंद शर्मा आणि तिची आई, प्रिया सुमित शर्मा यांनी तिला एक वचन दिले होते: जग तिची कला ...

विजय सेल्सकडून शाओमी टीव्‍ही एस मिनी एलईडी सिरीजसाठी प्री-ऑर्डर सुरू

मुंबई। विजय सेल्‍स या भारतातील अग्रगण्य ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेनने नवीन लाँच झालेल्या शाओमी टीव्‍ही एस मिनी एलईडी सिरीजसाठी प्री-ऑर्डर सुरू करण्याची घोषणा केली आहे. ग्राहक या सिरीजसाठी विजय सेल्सची वेबसाइट विजय सेल्सडॉटकॉमवर आणि देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये बुकिंग करू शकतात. भारतातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आपल्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करत विजय सेल्स ब्रँड शाओमीचा विशेष रिटेल सहयोगी बनला आहे. या सहयोगांतर्गत ज्या शहरांमध्ये विजय सेल्सची प्रत्यक्ष स्टोअर्स आहेत, तिथे नवीन एस मिनी एलईडी टेलिव्हिजन सिरीज लाँच केली जाणार आहे. ग्राहक आता फक्त २,००० रुपयांमध्ये विजय सेल्स डॉटकॉम या वेबसाइटवर किंवा विजय सेल्‍सच्‍या कोणत्याही स्टोअरमध्ये जाऊन २१ एप्रिल २०२६ पर्यंत हा टीव्ही प्री-बुक करू शकतात. हे लाँच विजय सेल्स आणि शाओमी यांच्यामधील सातत्‍यपूर्ण सहयोगाचा भाग आहे, जे ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम मूल्य प्रदान करण्याच्या समान उद्दिष्टावर आधारलेले आहे. नवीन एस‍ मिनी एलईडी श्रेणीसाठी अर्ली अॅक्‍सेस उपलब्ध करून देऊन विजय सेल्स...

सॅमसंगने शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली

बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स  मुंबई। सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली आहे. या सेलच्या निमित्ताने सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेल्या या ऑफर्स ग्राहकांना खात्रीशीर बचतीसह दीर्घकालीन मूल्य प्रदान करतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि एआय आधारित जीवनशैलीकडे अपग्रेड करणे सोपे होईल. सॅमसंग आपल्या बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर विशेष फायदे देत आहे, ज्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळू शकते. ग्राहकांना मनःशांती मिळावी, दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च कमी व्हावा आणि वस्तू खरेदीचा एकंदरीत अनुभव सुखद व्हावा, हा या फायद्यांमागचा उद्देश आहे. या शुभ अक्षय्य तृ...

अनन्या दत्ता मॉडेलिंग आणि जाहिरात विश्वातील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे

मुंबई/कोलकाता। अभिनेत्री अनन्या दत्ता सध्या तिच्या आगामी हिंदी चित्रपट 'जिंदगी फिर भी खूबसूरत है' मुळे चर्चेत आहे, ज्याचे चित्रीकरण सध्या शांतीकेतन फिल्म्सच्या बॅनरखाली सुरू आहे. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण ती सध्या केवळ हिंदी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. अनन्या दत्ताने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'नाटोबार नॉट आऊट' या बंगाली चित्रपटातून केली, ज्यात तिने ज्येष्ठ अभिनेत्री रायमा सेन आणि मून मून सेन यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारून आपले कौशल्य दाखवले. त्यानंतर, तिने 'गॉड ओन्ली नोज' आणि 'डन्नो व्हाय ३' सारख्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि प्रत्येक भूमिकेत एक वेगळी छाप सोडली. अनन्या दत्ता यांची नाट्यक्षेत्रातही एक समृद्ध कारकीर्द आहे, जिथे त्यांनी भरत दाभोळकर यांच्या 'बॉटम्स अप गँग'सोबत 'ओह नो, नॉट अगेन' (१५० हून अधिक प्रयोग), 'मंकी बिझनेस' (१०० हून अधिक प्रयोग), 'फनी थिंग कॉल्ड लव्ह', 'गॉट टू बी ऐश्वर्या' आणि ...

फाइंडेबिलिटी सायन्सेसची एसईआयसी २०२६ सोबत भागीदारी

साखर, इथेनॉल आणि बायोएनर्जी क्षेत्रातील एआय-आधारित परिवर्तनाला नवी चालना  मुंबई। फाइंडेबिलिटी सायन्सेसने शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स २०२६ (एसईआयसी २०२६) सोबत एक्सक्लुझिव्ह टेक पार्टनर म्हणून भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे भारतातील साखर, इथेनॉल आणि बायोएनर्जी क्षेत्रांमध्ये एआय-आधारित परिवर्तनाला गती देण्यात कंपनीची भूमिका अधिक बळकट झाली आहे. भारत अधिक कार्यक्षम, स्वच्छ ऊर्जा मार्ग आणि स्मार्ट औद्योगिक विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना, ही भागीदारी फाइंडेबिलिटी सायन्सेस आणि स्टोमाटा लॅब्स यांना या महत्त्वाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणते. कृषी एआय, प्रोसेस इंटेलिजन्स आणि प्रेडिक्टिव्ह निर्णयप्रक्रिया यांच्या मदतीने शेतीपासून ते कारखान्यापर्यंत संपूर्ण क्षेत्राचे आधुनिकीकरण कसे साधता येईल, यावर ही भागीदारी लक्ष केंद्रित करते. फाइंडेबिलिटी सायन्सेसचे व्हाइस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर (सीओई) मंदार कुलकर्णी म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये आणि कृषी पुरवठा साखळीत कार्य करणारी एआय सोल्यूशन्स विकसित करत आहोत. साखर उद्योग सध...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...

प्रियंका अग्रवाल: मॉडेलिंगपासून चित्रपटांपर्यंतचा एक प्रेरणादायी आणि कठोर परिश्रमावर उभारलेला प्रवास

मुंबई। भारतीय चित्रपट, फॅशन आणि जाहिरात उद्योगातील आपल्या अष्टपैलू आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रियंका अग्रवाल, या क्षेत्रात एक वेगाने उदयास येणारे नाव बनली आहे. मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून, प्रियंकाने आपले कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. प्रियंका अग्रवालने विल्स इंडिया फॅशन वीक आणि लॅक्मे इंडिया फॅशन वीक यांसारख्या मोठ्या फॅशन इव्हेंट्समध्ये रॅम्प वॉक करून आपली प्रतिभा अगदी सुरुवातीच्या काळातच दाखवून दिली. त्यानंतर तिने अनेक नामांकित फॅशन डिझायनर्ससोबत काम केले आणि मॉडेलिंग उद्योगात आपले एक भक्कम स्थान निर्माण केले. आपल्या चित्रपट कारकिर्दीत, प्रियंका 'रेडिओ' (२०१५), '१९७१: बियॉन्ड बॉर्डर्स' (२०१७) आणि 'युद्धभूमी १९७१ भारत सीमा' (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने '1971: बियॉन्ड बॉर्डर्स' या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अरुणोदय सिंगच्या विरुद्ध मुख्य भूमिका साकारली, जिथे तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. प्रियांका अग्रवालने द...

किया इंडियाने किया कनेक्ट नूतनीकरणाचा १ लाखांचा टप्पा पार केला

मुंबई। किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने देशात १,००,००० हून अधिक पेड किया कनेक्ट नूतनीकरणाचा टप्पा ओलांडल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने कनेक्टेड कार सबस्क्रिप्शनच्या बाबतीत ३० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रिटेंशन (ग्राहक टिकवून ठेवण्याचे प्रमाण) नोंदवले आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून कियाच्या इंटेलिजेंट मोबिलिटी परिसंस्‍थेप्रती ग्राहकांचा वाढता कल आणि निरंतर सहभाग दिसून येतो. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या तीन वर्षांच्या मोफत सबस्क्रिप्शन कालावधीनंतरही ग्राहकांनी या सेवेला पसंती दिली आहे. जागतिक स्तरावर, कियाने जवळपास ९७ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नोंदणी दर राखला आहे, ज्‍यामधून ग्राहकांमध्‍ये कनेक्टेड तंत्रज्ञानाची वाढती गरज दिसून येते. हे यश कियाच्या कनेक्टेड परिसंस्‍थेचे दीर्घकालीन मूल्य आणि ग्राहक निष्ठा अधोरेखित करते. नूतनीकरणाचा हा वाढता ओघ स्पष्ट बदलाचे संकेत देतो, ते म्‍हणजे ग्राहक आता केवळ सुरुवातीचा वापर न करता कनेक्टेड तंत्रज्ञानाला त्यांच्या दैनंदिन ड्रायव्हिंग अनुभवाचा अविभाज्य भाग बनवत आहेत. या टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्त करत सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्...

महाराष्ट्रात महिला बँक प्रतिनिधी उपक्रमाचा विस्तार

रॉयनेट सोल्युशनकडून महिलांसाठी आर्थिक सेवा व रोजगाराच्या नव्या संधी  मुंबई। रॉयनेट सोल्युशन प्रायवेट लिमिटेड ही एक नामांकित कॉर्पोरेट बिझनेस कॉरस्पॉन्डंट (सीबीसी) कंपनी आहे. नुकतेच या कंपनीने महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे तीन महिला बँक प्रतिनिधी (बँक सखी) केंद्रांचे उद्घाटन केले. हा उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक समावेशनाला चालना देत, शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देतो. प्रत्येक केंद्रामार्फत ३,००० हून अधिक ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळणार असून, महिला बीसी सखींसाठी सशक्त आणि शाश्वत उपजीविकेची संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून त्यांना दरमहा ८,००० रुपये ते ५०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत डिजिटल व्यवहार आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देत, डिजिटल इंडिया सारख्या राष्ट्रीय उद्दिष्टांना हातभार लावतो आहे. सातत्यपूर्ण सेवा वितरण आणि प्रभावी समुदाय सहभागाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या भक्कम संधी उपलब्ध करून देत आहे. रॉयनेट आ...

मोहम्मद जावेदने ४० हून अधिक म्युझिक व्हिडिओंची निर्मिती केली आहे

प्रतापगढ़/कुंडा। उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा भागातील एका तरुणाने बॉलिवूडच्या जगात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मूळचा मौली, कुंडा (प्रतापगढ़) येथील मोहम्मद जावेदने आपल्या आवड आणि मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. मोहम्मद जावेदच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात प्रयागराज (इलाहाबाद) येथे झाली, जिथे त्याने आपल्या कारकिर्दीचा पाया घातला. लहानपणापासूनच त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा होती, जे स्वप्न त्याने सत्यात उतरवले आहे. आजपर्यंत जावेदने ४० हून अधिक म्युझिक व्हिडिओंची निर्मिती केली आहे. त्याने टी-सिरीज, झी म्युझिक, व्हाईट हिल, व्हीनस आणि बी4यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केले आहे. त्याने एका वेब सिरीजचीही यशस्वी निर्मिती केली आहे. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे आणि तो सतत नवीन प्रकल्पांवर काम करत आहे. त्याची मेहनत आणि समर्पणाने त्याला हळूहळू यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवले आहे. मोहम्मद जावेद म्हणतात की ही तर फक्त सुरुवात आहे आणि ते नजीकच्या भविष्यात मोठ्या पडद्यावर दणक्यात पद...

नॉलेज मरीन अँड इंजिनियरिंग वर्क्स लिमिटेडची मोठी कामगिरी

भारताचा सर्वात मोठा बॅकहो ड्रेजर ‘रिवर पर्ल ४७’ जेएनपीए येथे तैनात  मुंबई। नॉलेज मरीन अँड इंजिनियरिंग वर्क्स लिमिटेड (केएमइडब्ल्यू) यांनी ‘रिवर पर्ल ४७' या भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक खोल भारतीय ध्वजांकित, स्व-चालित बॅकहो ड्रेजरच्या कार्यान्वयनाची घोषणा केली आहे. हा ड्रेजर ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबतच्या कराराअंतर्गत जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए) येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण समावेशामुळे केएमइडब्ल्यूच्या विशेष ड्रेजिंग फ्लीटची ताकद अधिक बळकट झाली असून, देशभरातील जटिल सागरी पायाभूत सुविधा व बंदर विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची कंपनीची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. रिवर पर्ल ४७ मध्ये जपानमध्ये निर्मित कोमात्सु पीसी२००० हे हेवी-ड्युटी एक्स्कॅव्हेटर बसविण्यात आले आहे. हे सुमारे २०० टन क्षमतेचे हायड्रॉलिक यंत्र असून, उच्च कार्यक्षमतेसह ड्रेजिंग, माइनिंग आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी डिझाइन केलेले आहे. हा एक्स्कॅव्हेटर हायड्रॉलिक पद्धतीने चालणाऱ्या तीन-पायांच्या स्पड बार्जवर बसविण्यात आला असून, ती दुहेरी इंजिनांनी सुसज्ज आहे....