सीधे मुख्य सामग्री पर जाएं

महाराष्ट्रात महिला बँक प्रतिनिधी उपक्रमाचा विस्तार

रॉयनेट सोल्युशनकडून महिलांसाठी आर्थिक सेवा व रोजगाराच्या नव्या संधी 

मुंबई। रॉयनेट सोल्युशन प्रायवेट लिमिटेड ही एक नामांकित कॉर्पोरेट बिझनेस कॉरस्पॉन्डंट (सीबीसी) कंपनी आहे. नुकतेच या कंपनीने महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे तीन महिला बँक प्रतिनिधी (बँक सखी) केंद्रांचे उद्घाटन केले. हा उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक समावेशनाला चालना देत, शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देतो. प्रत्येक केंद्रामार्फत ३,००० हून अधिक ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळणार असून, महिला बीसी सखींसाठी सशक्त आणि शाश्वत उपजीविकेची संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून त्यांना दरमहा ८,००० रुपये ते ५०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत डिजिटल व्यवहार आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देत, डिजिटल इंडिया सारख्या राष्ट्रीय उद्दिष्टांना हातभार लावतो आहे. सातत्यपूर्ण सेवा वितरण आणि प्रभावी समुदाय सहभागाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या भक्कम संधी उपलब्ध करून देत आहे. रॉयनेट आपल्या देशभरातील १,५०० पेक्षा अधिक बँक सखींच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला गती देत असून, भारत सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत भरीव योगदान देत आहे.

महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी, शहरी व ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणारी, तीन बँक सखी केंद्रे पंजाब अँड सिंध बँक आणि नैनीताल बँक यांच्या भागीदारी आणि सहयोगाने सुरू करण्यात आली. नवी दिल्ली येथील बँक सखी केंद्राचे उद्घाटन रॉयनेट सोल्यूशन या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. समीर माथुर यांच्या हस्ते करण्यात आले असून, हे केंद्र स्थलांतरित कामगार, फेरीवाले आणि लघु व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे.

रॉयनेट सोल्यूशन प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर माथुर म्हणाले, “रॉयनेटमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की आर्थिक समावेशनाची सुरुवात तळागाळातून होते, आणि महिलांचे सशक्तीकरण हे अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बँक सखी केंद्रांच्या या उपक्रमाद्वारे आम्ही शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करताना वंचित घटकांपर्यंत औपचारिक बँकिंग सेवा पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुनर्प्रतिष्ठा करीत आहोत. योग्य परिसंस्था आणि सातत्यपूर्ण सहभागाच्या बळावर बँक सखी दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची क्षमता ठेवतात, ज्यामुळे हा केवळ सेवा उपलब्धतेचा मॉडेल नसून आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारा प्रभावी मार्ग ठरतो. भारतभरातील अधिकाधिक समुदायांपर्यंत हा मॉडेल विस्तारण्यावर आमचा ठाम भर राहील.”

बँक सखी केंद्र शेवटच्या घटकासाठी बँक सेवा केंद्र म्हणून कार्य करत असून, मायक्रो-एटीएम, बायोमेट्रिक स्कॅनर आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप्स यांसारख्या डिजिटल साधनांच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक सेवा पुरवतात. या सेवांमध्ये खाते उघडणे, शिल्लक चौकशी, रोख जमा व पैसे काढणे, निधी हस्तांतरण, एटीएम व्यवहार, पासबुक प्रिंटिंग, पेन्शन वितरण, मनरेगा वेतन देयक तसेच कर्ज अर्जासाठी सहाय्य यांचा समावेश असून, यामुळे ग्राहकांना त्यांच्या परिसरातच सोयीस्कर व विश्वासार्ह बँकिंग सुविधा उपलब्ध होत आहेत.

रॉयनेट महिला उद्योजकतेला बळकटी देत असून, महिलांच्या नेतृत्वाखालील आपल्या महिला ग्राहक सेवा केंद्राच्या स्वरूपात मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देत; शेवटच्या घटकापर्यंत शाश्वत रोजगारनिर्मितीला चालना दिली आहे. सध्या कंपनीने देशभरामध्ये २४,००० पेक्षा जास्त महिला ग्राहक केंद्र नेमलेले असून, या नेटवर्कमार्फत १ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक ग्रॉस ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूचे व्यवहार केले जात आहेत. यापैकी महिलांकडून कंपनीच्या एकूण सेवा केंद्रांपैकी २२% केंद्रांचे संचालन केले जात आहे. हे विस्तारणारे जाळे केवळ शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक सेवांची उपलब्धता वाढवत नाही, तर सातत्यपूर्ण उत्पन्ननिर्मिती आणि समुदाय सहभागाच्या माध्यमातून महिलांना स्थानिक अर्थव्यवस्थेत सक्रिय योगदान देण्यास सक्षम बनवत आहे.

या तीन बँक सखी केंद्रांच्या उद्घाटनासह, रॉयनेट देशभरातील आपल्या “बँक सखी” नेटवर्कला अधिक बळकट केले आहे. नामांकित वाणिज्य बँकांसाठी कॉर्पोरेट बिझनेस कॉरस्पॉन्डंट म्हणून कार्य करत असताना,  रॉयनेट बँकिंग संस्थां आणि वंचित घटकांमधील वित्तीय दरी कमी करत आर्थिक समावेशनाला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनानिमित्त 'बोट'च्या नव्या शॉर्ट फिल्ममध्ये अरबाज खानचा मजेशीर अंदाज

मुंबई। येत्या २८ ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड ' बोट' (boAt) ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'ब्लिंकिट' (Blinkit) आणि प्रसिद्ध अभिनेते-निर्माते अरबाज खान यांच्या सहकार्याने एका नव्या डिजिटल मोहिमेची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर सध्या या शॉर्ट फिल्मची जोरदार चर्चा सुरू असून, एका मजेशीर उपरोधाद्वारे प्रेक्षकांना "एक सर्वोत्तम भाऊ कसा असावा?" याचा विचार करायला लावला आहे. मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमधील मजेशीर डिजिटल फिल्म : मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आलेल्या या डिजिटल फिल्ममध्ये अरबाज खान हातात माइक घेऊन बॉलिवूडच्या 'ऑल-टाईम फेव्हरेट भाई' बनण्याच्या स्टाइलचे पृथक्करण करताना दिसतो. रात्री १ वाजताचे ट्विट्स, ठरवून मारलेले डायलॉग्स, आणि हिरोसारखा रुबाब दाखवणे म्हणजे प्रेम नव्हे, हे तो आपल्या खास शैलीत सांगतो. स्वतः अरबाजने ही भूमिका साकारल्यामुळे हा विनोद अधिकच रंगतो. बॉलिवूडमधील 'युनिव्हर्सल भाई' या प्रतिमेवर भाष्य करत जेव्हा अरबाज कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो, "मी भाईचा भ...

एमएनबी येथे २०० दृष्टिबाधित व्यक्तींसाठी स्वावलंबन आणि प्रतिभा ओळख कार्यक्रमाचे आयोजन

एमएनबी येथे २०० दृष्टिबाधित व्यक्तींसाठी स्वावलंबन आणि प्रतिभा ओळख कार्यक्रमाचे आयोजन मुंबई। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (एनएबी) इंडियाने, एम. एन. बानाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड (एमएनबी) आणि सीएबीएम यांच्या सहकार्याने, स्वावलंबन, सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले. या कार्यक्रमादरम्यान, ५० दृष्टिबाधित फेरीवाल्यांना त्यांची उपजीविका मजबूत करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत करण्यासाठी स्वयंरोजगार किटचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट दृष्टिबाधित खेळाडूंचा त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानही करण्यात आला. याप्रसंगी एनएबी आणि एमएनबीच्या दृष्टिबाधित संगीतकारांनी एक मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात अंदाजे २०० दृष्टिबाधित व्यक्तींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एनएबीचे अध्यक्ष विश्वस्त डॉ. विमल कुमार डेंगला यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि एनएबी व एमएनबी करत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये रिलायन्स फाउंडेशनचे उपाध्यक्...

लोणावळ्यात अमावी सोबत सुरु केले 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज'

ताजचे लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पदार्पण मुंबई । भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे ' ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड 'अमावी' च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा ...