सीधे मुख्य सामग्री पर जाएं

केनडियर सोबत साजरा करा मदर्स डे !

मुंबई। मदर्स डे म्हणजे केवळ एक दिवसाचे सेलिब्रेशन नाही, तर आईने केलेले अगणित त्याग आणि ते करत असताना तिची ती सहज-सुंदर वागणूक, जी अनेकदा आपल्या नजरेतून सुटते, या सगळ्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आईचे शांत समर्पण आणि तिचे निस्वार्थ प्रेम शब्दांत मांडणे कठीण आहे, पण एक देखणा दागिना तिच्या चेहऱ्यावर नक्कीच अद्वितीय चमक आणू शकतो असा दागिना जो ती केवळ खास प्रसंगीच नाही, तर दररोज मोठ्या अभिमानाने मिरवू शकेल.

आईला भेट दिला जाणारा दागिना हा केवळ एक अलंकार नसून, आठवणींची एक सुंदर ठेव बनेल. हे दागिने आईच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहेत, जे तिच्या प्रत्येक रूपाला रोजच्या रोज असो वा एखादा खास सोहळा, अधिक खुलवतात. आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती असते, हे दागिने तिच्या महतीचे एक सुंदर प्रतिबिंब आहेत.

कल्याण ज्वेलर्सचा लाइफस्टाइल ब्रँड 'केनडियर' खास विचारपूर्वक साकारलेले आणि परिधान करायला सहजसोपे दागिने सादर करत आहे. अगदी नाजूक नक्षीकामापासून ते प्रभावी कलाकुसरीपर्यंत, हे डिझाइन्स आईबद्दलचे तुमचे प्रेम कोणत्याही बडेजावाशिवाय, अत्यंत साधेपणाने आणि आदराने व्यक्त करतात.

स्टायलिश आणि तितकीच सहज- 'रॅली' डायमंड अँड फॅन्सी जेमस्टोन रिंग 'केनडियर' ची ही 'रॅली' रोझ गोल्ड रिंग म्हणजे साधेपणा आणि सौंदर्याचा एक सुरेख संगम आहे.

प्लेन ग्लिमर डायमंड 'व्ही' रिंग- शार्प आणि मॉडर्न लूक असलेली ही 'व्ही-शेप' अंगठी तिच्या साधेपणासाठी विशेष लोकप्रिय आहे.

क्लासिक ट्रेंड डायमंड कफ ब्रेसलेट- कलाकुसर आणि रंगांचा एक सुंदर मिलाफ 'केनडियर'चे हे रोझ गोल्ड ब्रेसलेट त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बनावटीसाठी ओळखले जाते.

एन चॅटींग फ्लोरल डायमंड आणि जेमस्टोन ब्रेसलेट- साधेपणा आणि रंगांच्या किमयेने नटलेले, 'केनडियर'चे हे रोझ गोल्ड ब्रेसलेट दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच वजनाला हलके आहे.

आर्मीडा डायमंड इयररिंग्स- स्टायलिश आणि चमकदार! 'केनडियर'चे हे गोल्ड इयररिंग्स त्यांच्या लाटांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी ओळखले जातात.

जिसेल डायमंड डँगल इयररिंग्स- वैशिष्ट्यपूर्ण घडण आणि मोहक चमक, 'जिसेल' डायमंड इयररिंग्स प्रत्येक लूक खुलवतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

५ वर्षांपासून कानात येणाऱ्या 'हृदयाच्या ठोक्यांसारख्या' आवाजापासून मुक्ती

जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार  मुंबई। महाराष्ट्रातील जळगावमधील एका २५ वर्षीय महिलेला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा "व्हूशिंग" असा आवाज येत होता. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे झालेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला या त्रासापासून पूर्णपणे आराम मिळाला आहे. या महिला रुग्णाच्या केसमधून निदर्शनास येते की, रक्तवाहिन्यांशी संबंधित मूळ कारण ओळखून अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर पल्साटाईल टिनिटसच्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात. या महिला रुग्णाला हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा सतत व्हूशिंग आवाज येत होता. वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही आणि विविध चाचण्या व उपचार करूनही तिला कायमस्वरूपी आराम न मिळता हा त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने मुंबईत येऊन जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा, एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर शाह यांच्या टीमने रुग्णाची एमआरआय व एमआरव्ही तपासणी...

अल्केमने हेअर ग्रोथ सिरम 'रेनोशिया एक्सो' लॉन्च केले

मुंबई। अल्केम लॅबोरेटरीज लि .ने रेनोशिया एक्सो™ लाँच करण्याची घोषणा केली, जे एका सर्वसमावेशक वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे हेअर फॉलिकलचे (केसांच्या मुळांचे) आरोग्य आणि चेतना टिकवून ठेवण्यासाठी विकसित केलेले नेक्स्ट-जनरेशन हेअर रीजनरेशन उपचार तंत्रज्ञान आहे. केस गळती ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या त्वचारोगविषयक समस्यांपैकी एक म्हणून समोर आली आहे, ज्याचा परिणाम केवळ वाढत्या वयाच्या व्यक्तींवर नाही, तर अनुवंशिकता, जीवनशैलीतील बदल, पर्यावरणीय तणाव आणि आरोग्यशैलीतील बदलांमुळे वाढत्या तरुण वर्गावरही होत आहे. वर्षानुवर्षे उपचारांचे पर्याय वाढले असले तरी, केस गळती अनेक जैविक घटकांच्या एकत्रित प्रभावामुळे होते हे सर्वज्ञात आहे. तरीदेखील अनेक उपचार अद्याप केसांच्या वाढीच्या चक्राच्या केवळ मर्यादित घटकांवर भर देतात. या लाँचबाबत मत व्यक्त करत अल्केमचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप सिंग म्हणाले, “केसांच्या पुनरुज्जीवनाचे विज्ञान गेल्या दशकात लक्षणीयरित्या विकसित झाले आहे आणि त्याचप्रमाणे केस पातळ होण्यामागील कारणांची आपली समजही वाढली आहे. यावर फॉलिक्युलर मिनिअॅचरायझेशन, बदललेले सेल्यूलर ...

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई। ज्येष्ठ पत्रकार आणि 'मुंबई तरंग' (गुजराती आणि हिंदी वृत्तपत्र) तसेच 'वेस्टर्न इंडिया टाइम्स' (इंग्रजी दैनिक) चे मुख्य संपादक, दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वश्रुत आहे की, दिलीप पटेल हे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या निःपक्षपाती आणि निर्भीड लेखनासाठी ओळखले जातात. ते मुंबईत, तसेच दिल्लीसह संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनता, सरकार आणि प्रशासनाशी सक्रियपणे संवाद साधतात. कामगार, शेतकरी आणि सैनिकांचा आवाज नेहमीच उठवणाऱ्या, तसेच सरदार साहेबांच्या 'सामर्थ्यवान भारताचा पाया, सरदारांचे विचार' आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीची पक्षाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने गुजरातमध्ये पक्षाला आणखी बळकटी मिळेल.