सीधे मुख्य सामग्री पर जाएं

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे.

सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बांधणी, सातत्यपूर्ण कामगिरी, व्यावहारिक डिझाइन आणि विश्वासार्ह सर्व्हिस असलेले डिव्हाइस पसंत करत आहेत. सीएमआरच्या अभ्यासानुसार, ग्राहक ब्रँडला दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता, सुलभ वापर आणि विश्वासार्हतेशी जोडतात, तर उच्च ड्यूरेबिलिटी आणि सुरक्षा मापदंड शहरी व उदयोन्मुख बाजारात खरेदी निर्णयांवर प्रभाव टाकत आहेत.

आयटेलने सीएमआर ड्यूरेबिलिटी इंडेक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, फिचर फोन्समध्ये ०.६५ आणि स्मार्टफोन्समध्ये ०.८६ गुणांकन मिळवले आहे. विशेषतः विश्वासार्हता आणि सर्व्हिस स्कोअरमध्ये या ब्रँडने सातत्याने उच्‍चांक गाठला आहे.

आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले की, कंपनीच्या प्रत्येक उत्पादनाच्या केंद्रस्थानी टिकाऊपणा आहे आणि खरे नाविन्य उत्पादन किती काळ टिकते यावर ठरते. सीएमआरकडून मिळालेली मान्यता आयटेलच्या टिकाऊपणा व विश्वासार्हतेची पुष्टी करते, तसेच विविध किंमत श्रेणींमध्ये ब्रँडचे वचन सातत्याने पाळल्याचे दर्शवते.

फिचर फोन विभागात आयटेल ९१% गुणांसह टिकाऊपणात आघाडीवर असून एचएमडी (८९%) आणि लावा (८६%) पुढे आहेत. स्मार्टफोनमध्ये आयटेल ८५% गुणांसह दुसऱ्या, तर विवो ८४% सह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामुळे आयटेलने दोन्ही श्रेणींमध्ये टॉप-३ मध्ये स्थान मिळवले आहे. सध्याच्या वापरकर्त्यांमध्ये परवडणारी किंमत (५८%), विश्वासार्हता (५६%) आणि टिकाऊपणा (५३%) यावर ब्रँड मजबूत ठरतो. तसेच ८५% वापरकर्त्यांना व्हॅल्यू फॉर मनी, ८१% मजबूती, ७९% डिझाइन आणि ७४% विश्वासार्हता मान्य आहे.

स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये ब्रँडने ०.८८ असा उच्च स्कोअर मिळवत विश्वासार्ह कामगिरी आणि दैनंदिन टिकाऊपणावरचा भर अधोरेखित केला आहे. सर्वेक्षणानुसार ५१% ग्राहक भविष्यात आयटेल फिचर फोन घेण्यास इच्छुक असून एचएमडी (४३%) आणि लावा (२९%) पुढे आहेत. स्मार्टफोनसाठीही ३०% ग्राहकांनी आयटेलला पसंती दर्शवली आहे. सीएमआर अहवालानुसार, भारतात टिकाऊपणा आता खरेदीनंतरचा दिलासा नसून खरेदी निर्णयातील महत्त्वाचा घटक बनला आहे.

नवीन सीएमआर ड्यूरेबिलिटी इंडेक्समध्ये भारतातील १३ शहरांमधील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील २,०८६ फिचर फोन आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांसह नवी दिल्ली, मुंबई, लखनऊ, जयपूर, म्हैसूर, कोईम्बतूर, नाशिक, गंगटोक, हरिद्वार आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. हा इंडेक्‍स खऱ्या आयुष्यातील टिकाऊपणाचे विविध पैलू एकाच गुणांकात सादर करतो, ज्‍यामुळे डिवाईसची दैनंदिन विश्वासार्हता अचूकपणे दिसून येते. या इंडेक्‍सचे उच्‍च मूल्य ग्राहकांचा दृढ विश्वास दाखवते, जो सातत्यपूर्ण कामगिरी आणि खात्रीशीर सर्व्हिस सपोर्टमुळे निर्माण झाला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

अल्केमने हेअर ग्रोथ सिरम 'रेनोशिया एक्सो' लॉन्च केले

मुंबई। अल्केम लॅबोरेटरीज लि .ने रेनोशिया एक्सो™ लाँच करण्याची घोषणा केली, जे एका सर्वसमावेशक वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे हेअर फॉलिकलचे (केसांच्या मुळांचे) आरोग्य आणि चेतना टिकवून ठेवण्यासाठी विकसित केलेले नेक्स्ट-जनरेशन हेअर रीजनरेशन उपचार तंत्रज्ञान आहे. केस गळती ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या त्वचारोगविषयक समस्यांपैकी एक म्हणून समोर आली आहे, ज्याचा परिणाम केवळ वाढत्या वयाच्या व्यक्तींवर नाही, तर अनुवंशिकता, जीवनशैलीतील बदल, पर्यावरणीय तणाव आणि आरोग्यशैलीतील बदलांमुळे वाढत्या तरुण वर्गावरही होत आहे. वर्षानुवर्षे उपचारांचे पर्याय वाढले असले तरी, केस गळती अनेक जैविक घटकांच्या एकत्रित प्रभावामुळे होते हे सर्वज्ञात आहे. तरीदेखील अनेक उपचार अद्याप केसांच्या वाढीच्या चक्राच्या केवळ मर्यादित घटकांवर भर देतात. या लाँचबाबत मत व्यक्त करत अल्केमचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप सिंग म्हणाले, “केसांच्या पुनरुज्जीवनाचे विज्ञान गेल्या दशकात लक्षणीयरित्या विकसित झाले आहे आणि त्याचप्रमाणे केस पातळ होण्यामागील कारणांची आपली समजही वाढली आहे. यावर फॉलिक्युलर मिनिअॅचरायझेशन, बदललेले सेल्यूलर ...