सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आयटेलकडून फीचर फोन्ससाठी काऊंटर रिप्लेसमेंटची घोषणा

मुंबई। आयटेल हा भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान ब्रँड टिकाऊपणा, विश्वसार्हता आणि परवडणाऱ्या किमतींसाठी ओळखला जातो. हा ब्रँड भारतातील आपल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करत आहे. आयटेलने आता १५ कोटींच्या व्‍यापक ग्राहकवर्गाचा टप्पा गाठला आहे आणि हा त्यांच्या परिवर्तनीय प्रवासातील महत्त्वाचा टप्‍पा ठरला आहे. हे यश साजरे करण्यासाठी, आयटेलने त्यांच्या फीचर फोन्सवर कोणत्याही उत्‍पादन डिफेक्टसाठी उत्‍साहवर्धक १ वर्षाची काऊंटर रिप्लेसमेंट ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी बोनान्‍झा आहे. गेल्या दशकात, आयटेलने परवडणाऱ्या किमतीत टिकाऊ आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली, ज्‍यासह ग्राहकांशी दृढ नाते निर्माण केले आहे आणि भारतातील बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

भारतातील १० वर्षांचा प्रवास आणि काऊंटर रिप्लेसमेंट सुविधेच्या लाँचबद्दल मत व्‍यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले, "भारतात १० वर्षे पूर्ण करणे आणि १५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचणे हा आयटेलमधील आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आमचे भागीदार, टीम आणि ग्राहक यांची अविरत समर्पितता व पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. आजच्‍या या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून आम्ही काळासह मिळवलेला विश्वास दिसून येतो. आम्हाला फीचर फोन्ससाठी काऊंटर रिप्लेसमेंट सुविधा सुरू करताना अभिमान वाटत आहे. हा उपक्रम प्रत्‍यक्ष आमच्या ग्राहकांच्या प्रतिसादातून साकारला आहे. ग्राहकांचे प्रत्येक मत आणि त्यांच्याशी होणारा प्रत्येक संवाद आमच्या नाविन्यपूर्ण बदलांना दिशा देतो. आम्ही हा प्रवास सुरू केला, तेव्हा डिजिटल जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या व्‍यक्तींसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय होते. आम्ही यापुढेही टिकाऊ, विश्वासार्ह आणि परवडणारी उत्पादने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्‍यासाठी आयटेल ब्रँड संपूर्ण भारतात ओळखला जातो."

ब्रँडच्‍या या प्रवासामधून सखोल उद्देश दिसून येतो, तो म्‍हणजे यापूर्वी स्‍मार्ट तंत्रज्ञानाशी फारसा संबंध न आलेल्‍या भारतातील लाखो व्‍यक्तींना डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांपासून घरगुती उपकरणे शोधणाऱ्या कुटुंबांपर्यंत, ग्राहकांना जगाशी जोडून ठेवण्यात या ब्रँडने अविभाज्य भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावर, आयटेल आता ८० हून अधिक देशांमध्ये उपस्थित आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फीचर फोन्स, स्मार्टफोन, टीव्ही, सौर उत्पादने, पर्सनल ग्रूमिंग उत्पादने आणि घरगुती उपकरणांचा समावेश आहे. उत्पादनांच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा ठेवून हा ब्रँड ग्राहकांच्या दैनंदिन तंत्रज्ञान गरजा पूर्ण करत आहे, तसेच भारताच्‍या वाढत्या डिजिटल महत्त्वाकांक्षांना सातत्याने पाठबळ देत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार  मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...

आयटेलने लॉन्च केला 'सिटी ३०० ५जी' स्मार्टफोन

परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दमदार बॅटरी परफॉर्मन्स  मुंबई: भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेल ने आयटेल सिटी ३०० ५जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. तरुण आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा स्मार्टफोन १४,९९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे. परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दिवसभर साथ देणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्सपासून मुक्त सॉफ्टवेअरचा अनुभव देण्याचा सिटी ३०० ५जी चा प्रयत्न आहे. सिटी ३०० ५जी मध्ये १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं अधिक सहज आणि प्रतिसादक्षम होतं. टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसरमुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेला इंटरफेस यामुळे फोन वापरण्याचा अनुभव स्वच्छ, सोपा आणि त्रासमुक्त राहतो. त्यामुळे फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा स्मार्ट...