सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंगने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली

मुंबई। सॅमसंग इंडियाने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये विविध विभागांतील २३ मॉडेल्सचा समावेश आहे आणि त्यांची किंमत ३२,९४० रुपयांपासून सुरू होते. हे नवीन एसी एआय फास्ट आणि कंफर्ट कूलिंग तंत्रज्ञानाने सज्ज आहेत, तसेच एआय एनर्जी मोड ३० टक्‍क्‍यांपर्यंत ऊर्जेची बचत करतात.

सॅमसंगची एआय फास्ट व कंफर्ट कूलिंग यंत्रणा वापरकर्त्याच्या वापराच्या पद्धतींचे आणि रूममधील परिस्थितीचे आपोआप विश्‍लेषण करते. त्यानंतर त्वरित थंडावा देण्यासाठी फास्ट कूलिंग मोड सक्रिय करते, ज्यामुळे ग्राहकांना कडक उन्हात त्वरित थंडावा आणि आराम मिळतो.

रूममधील तापमान इच्छित पातळीपर्यंत खाली आले की, एआय तंत्रज्ञान आपोआप विंडफ्री™️/ड्राय कंफर्ट मोडवर स्विच होते, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गरजेनुसार थंडावा कायम राखला जातो. हे तंत्रज्ञान हजारो सूक्ष्म छिद्रांमधून अतिशय हलक्या स्‍वरूपात थंड हवा पसरवून खोलीतील हवामान संतुलित राखते, ज्यामुळे अंगावर येणारे थंड हवेचे थेट आणि बोचरे झोत टाळले जातात. संपूर्ण कार्यप्रणाली दरम्यान एआय सतत रूममधील परिस्थिती आणि वापरकर्त्याच्या आवडीनिवडींचे विश्‍लेषण करून कूलिंगमध्ये सुधारणा करत राहते.

स्मार्ट थिंग्स एकीकरणामुळे हे बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी घरातील कूलिंग अधिक स्मार्ट आणि कनेक्टेड बनवते. वापरकर्ते स्मार्ट थिंग्स अॅपद्वारे दूरूनही तापमान नियंत्रित करू शकतात, विजेच्या वापराचे निरीक्षण करू शकतात आणि एसीचे कार्य स्वयंचलित करू शकतात. यामध्ये एनर्जी मॉनिटरिंग, व्हॉइस कंट्रोल, वेलकम/अवे केअर आणि स्मार्ट थिंग्स होम केअर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी ग्राहकांच्या सोयीसाठी आणि मनःशांतीसाठी सक्रिय नियंत्रण व देखभाल सुनिश्चित करतात.

एआय एनर्जी मोड वापराच्या पद्धती आणि पर्यावरणीय परिस्थितीचे विश्‍लेषण करून कॉम्प्रेसरची कार्यक्षमता सुधारतो, ज्यामुळे ऊर्जेच्या वापरात ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट होते. या नवीन एसी श्रेणीमध्‍ये कमाल कूलिंग आणि ऊर्जा कार्यक्षमता यांचे संयोजन आहे. या एसीमधील प्रगत इन्व्हर्टर तंत्रज्ञान अतिशय कडक तापमानातही स्थिर कामगिरी सुनिश्चित करते, ज्यामुळे हे एसी भारतातील वैविध्यपूर्ण हवामानासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. बीस्‍पोक एआय एअर कंडिशनर्सची ही नवीन श्रेणी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि सॅमसंग डॉटकॉमसह प्रमुख रिटेल आउटलेट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती

मुंबई: नवी मुंबईस्थित एफएमसीजी कंपनी मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, भारतातील प्रसिद्ध शेफ, पाककला तज्ज्ञ आणि रेस्टॉरेंटर शेफ हरपाल सिंह सोखी हे कंपनीसोबत इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जोडले गेले आहेत. ते कंपनीच्या प्रमुख ब्रँड इंची (Inchi)चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही काम पाहणार आहेत. 2017 मध्ये स्थापन झालेल्या आणि निखिल भारती, आर. पी. चटर्जी आणि मनीष पार्डीवाला यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंचीने अल्पावधीतच इंडो-चायनीज सेगमेंटमध्ये लोकप्रिय घरगुती ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ब्रँडकडे 100 हून अधिक उत्पादनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. यामध्ये शेजवान डिप आणि स्प्रेड्स, नूडल्स, सॉसेस, गॉरमे आणि इन्स्टंट सूप्स तसेच खास कुकिंग मसाल्यांचा समावेश आहे. या उत्पादनांमुळे घरच्या घरी रेस्टॉरंटसारख्या इंडो-चायनीज पदार्थांची चव सहज अनुभवता येते. या धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर निखिल भारती म्हणाले, “उत्पादनांची मोठी आणि ग्राहकांना आवडणारी...