सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अक्षयकल्प ऑर्गेनिकचा मुंबई आणि पुण्यात प्रवेश

दक्षिण भारतात सुरू झालेला भारताचा आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँडचा प्रवास आता महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे 

मुंबई। भारतातील आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँड (सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादन ब्रँड) अक्षयकल्प ऑर्गेनिकने आज मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दक्षिण भारतातील लोकप्रिय ब्रँडपासून संपूर्ण भारतातील घराघरात पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या आणि स्वच्छ पोषण व शेतकरी सक्षमीकरण या दोन तत्त्वांवर उभारलेल्या अक्षयकल्प ऑर्गेनिककडून महाराष्ट्रात त्यांच्या प्रमाणित सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादनांचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक तसेच त्यांची वेगाने वाढणारी उच्च-प्रथिनांची श्रेणी यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा उरलेला साका किंवा गाळ, अन्न खराब होऊ नये, जास्त काळ टिकावे आणि त्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी वापरली जाणारी संरक्षक द्रव्ये आणि कृत्रिम अॅडिटिव्ह्सपासून पूर्णपणे मुक्त आहेत.

या विस्ताराची वेळ विशेष महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात दूध भेसळ आणि अन्नसुरक्षेबाबत चिंता अजूनही कायम आहे. त्यातून पारंपरिक दुग्ध पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि अन्न किंवा दुग्धजन्य उत्पादन कुठून आले, कसे तयार झाले, कोणत्या टप्प्यांतून गेले याचा पूर्ण मागोवा घेण्यातील कमतरता ठळकपणे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीदरम्यान शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी काही वेळा हानिकारक पदार्थांचा वापर केला जातो. परंतु त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत गंभीर धोके निर्माण होतात. परिणामी, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ग्राहक दुधासारख्या दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींसाठी स्वच्छ, पडताळणीयोग्य आणि विश्वासार्ह स्रोतांचा शोध घेत आहेत.

अक्षयकल्प ऑर्गेनिक बाकीच्यांपेक्षा वेगळे ठरते याचे कारण म्हणजे ट्रेसेबिलिटी, गुणवत्ता आणि केवळ उत्पादन घेणे नव्हे तर शेतजमीन आणि परिसंस्था अधिक सक्षम आणि टिकाऊ बनवणे हे उद्दिष्ट असलेली रीजनरेटीव्ह शेतीप्रती असलेली त्यांची सखोल बांधिलकी. दुधाचा प्रत्येक थेंब  प्रशिक्षित सेंद्रिय शेतकरी-उद्योजकांच्या नेटवर्कमधून मिळवला जातो आणि प्रत्येक टप्प्यावर कृत्रिम हस्तक्षेपाशिवाय प्रक्रिया केली जाते. ब्रँडचा दृष्टिकोन केवळ प्रमाणपत्रापुरता मर्यादित नसून मातीचे आरोग्य पुनर्संचयित करणारी, प्राण्यांच्या स्वास्थ्याला प्राधान्य देणारी आणि शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक स्थिरता निर्माण करणारी शेती व्यवस्था उभारण्यावर केंद्रित आहे. ग्राहकांसाठी याचा अर्थ त्यांना मिळणारे दूध कुठून येते आणि त्याची निर्मिती कशाप्रकारे केली जाते याबाबत असलेली संपूर्ण पारदर्शकता असा होतो. 

या विस्ताराबाबत बोलताना अक्षयकल्प ऑर्गेनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक शशी कुमार म्हणाले, “सेंद्रिय दुग्धशेती ही केवळ कल्पना नाही, तर ती एक विस्तारक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मॉडेल आहे हे सिद्ध करण्यात आम्ही 16 वर्षे घालवली आहेत. त्यातून शेतकऱ्यांसाठी वास्तविक मूल्य आणि कुटुंबांसाठी खरी सुरक्षितता निर्माण होते. आमची बांधिलकी नेहमीच सोपी आणि साधी सरळ राहिली आहे. त्यात कोणतेही शॉर्टकट नाहीत, पळवाटा नाहीत. दक्षिणेत ग्राहक आमच्यावर विश्वास ठेवतात कारण आम्ही त्यांना स्पष्टपणे दाखवतो की त्यांचे दूध कुठून येते, ते कोण तयार करतो आणि ते कसे बनवले जाते. तोच विश्वास, पारदर्शकता आणि तडजोड न केलेली गुणवत्ता आम्ही आता मुंबई आणि पुण्यात आणत आहोत. हे केवळ नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याबद्दल नाही, तर अन्न कसे पिकवले जाते, कसे मिळवले जाते आणि कसे वापरले जाते यासाठी नवे मापदंड निर्माण करण्याबद्दल आहे.”

महाराष्ट्रातील प्रवेश हा देशभरातील मजबूत गतीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. अक्षयकल्प ऑर्गेनिक चालू आर्थिक वर्षाचा शेवट 550–600 कोटी रु. उत्पन्नासह करण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या उच्च-प्रथिनयुक्त दुग्धजन्य उत्पादनांना असलेली मजबूत मागणी आणि भारतीय महानगरांमध्ये स्वच्छ-लेबल अन्नपदार्थांचा वाढता अंगिकार याचे हे द्योतक आहे. हैदराबादमध्ये या ब्रँडने वार्षिक 70% पेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. त्यातून प्रगत शहरी बाजारपेठांमध्ये स्वच्छ दुग्धजन्य उत्पादनांची वाढती मागणी दिसून येते. मुंबई आणि पुण्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कंपनी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधा, वितरण आणि प्रक्रिया क्षमतेत करत आहे. अक्षयकल्प ऑर्गेनिकच्या राष्ट्रीय विकास धोरणातील जे महाराष्ट्राचे महत्त्व यातून दिसून येते. 

अक्षयकल्प ऑर्गेनिकच्या मॉडेलचा केंद्रबिंदू म्हणजे त्यांचा फार्मर-एंटरप्रेन्योरशिप (शेतकरी -उद्योजकता) उपक्रम. हा उपक्रम छोट्या दुग्धशेतकऱ्यांना प्रशिक्षित सेंद्रिय उद्योजकांमध्ये रूपांतरित करतो. शेतकऱ्यांना योग्य माहिती, पशुवैद्यकीय सेवा, आर्थिक साक्षरता आणि प्रीमियम दरात खात्रीशीर खरेदीची हमी दिली जाते. त्यामुळे उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणारी स्वयंपूर्ण व्यवस्था तयार होते. शहरी कुटुंबांसाठी अक्षयकल्प ऑर्गेनिकची निवड म्हणजे केवळ स्वच्छ दुग्ध उत्पादनांचा वापर करणे एवढेच नाही तर पर्यावरण संवर्धनाच्या जोडीला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणाऱ्या व्यवस्थेला पाठबळ देणे आहे. 

बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि आता मुंबई व पुणे या शहरांमध्ये कार्यरत असलेले अक्षयकल्प ऑर्गेनिक हळूहळू प्रादेशिक क्षेत्रात अग्रणी राहण्यापासून राष्ट्रीय ब्रँडकडे वाटचाल करत आहे. हा राष्ट्रीय ब्रँड विश्वास, शाश्वतता यावर आधारित असून प्रत्येक भारतीय कुटुंबापर्यंत स्वच्छ, अस्सल अन्न पोहोचवण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे. 

अक्षयकल्पा ऑर्गेनिक : https://akshayakalpa.org/

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...