सीधे मुख्य सामग्री पर जाएं

होमलेनकडून सीबीडी बेलापूर नवी मुंबईमध्ये नवीन स्टुडिओचे उद्घाटन

नवी मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते. या लाँचसह, होमलेनने वेगाने वाढणाऱ्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित एंड-टू-एंड होम इंटीरियर सोल्यूशन्स आता घरमालकांच्या अधिक जवळ आणले आहेत.

हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. त्यांची स्थानिक बाजारपेठेतील सखोल समज आणि होमलेनचा तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन यामुळे नवी मुंबईतील घरमालकांना अधिक पारदर्शक, त्रासमुक्त व विनाव्यत्यय इंटीरियरचा अनुभव मिळण्यास मदत होईल.

होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, “नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे. या बाजारपेठेतील घरमालक आता अधिक पारदर्शकता, कामाचा वेग आणि विश्वासार्हतेची मागणी करत आहेत. आमचे तंत्रज्ञान-आधारित डिझाइन-टू-एक्झिक्युशन मॉडेलवर लक्ष केंद्रित आहे, जे इंटीरियरचा प्रवास अधिक सुलभ, अंदाज घेण्याजोगा आणि विस्तारक्षम बनवते.”

सर्वोत्तम स्‍टुडिओ म्हणून डिझाइन केलेली ही १,७५० चौरस फुटांची जागा ग्राहकांना मॉड्यूलर किचन, वॉर्डरोब आणि घराच्या संपूर्ण मांडणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देते. डिझाइन आणि अंमलबजावणीसाठी वन स्टॉप सोल्यूशन म्हणून होमलेन घरमालकांना नियोजनापासून वितरणापर्यंतची सर्व प्रक्रिया एकाच छताखाली पूर्ण करण्याची सुविधा देते.

या अनुभवाचा कणा म्हणजे स्‍पेसक्राफ्ट, जे होमलेनचे मालकी हक्‍क असलेले एआय-संचालित प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म रिअल-टाइम ३डी व्हिज्युअलायझेशन, त्वरित किंमत आणि डिझाइन प्रत्यक्ष घरात उतरवताना अचूकता सुनिश्चित करते.

बेलापूर स्टुडिओला भेट देणाऱ्या ग्राहकांना होमलेनच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवांचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये स्‍पेसक्राफ्टद्वारे एआय-आधारित डिझाइन व्हिज्युअलायझेशन, कोणताही छुपा खर्च नसलेली पारदर्शक किंमत, ४५ दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याची हमी, १० वर्षांची मटेरियल वॉरंटी तसेच कामाचे योग्य नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समर्पित डिझाइनर व प्रकल्प व्यवस्थापकाची उपलब्धता यांचा समावेश आहे.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत संतोष कुमार जे म्हणाले, “नवी मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आता संघटित इंटीरियर सोल्यूशन्सला अधिक पसंती दिली जात आहे. होमलेनसोबत सहयोग केल्यामुळे आम्हाला प्रिमियम, उच्‍च दर्जाचे डिझाइन आणि अंमलबजावणी एका सुव्यवस्थित पद्धतीने एकत्र आणता आली आहे, ज्यामुळे घरमालकांसाठी ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे.”

या लाँचसह, होमलेनने शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच सुलभ उपलब्धता, स्थानिक भागीदारी आणि तंत्रज्ञानावर आधारित सुव्यवस्थित इंटीरियर अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...