सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंगने शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली

बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स 

मुंबई। सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली आहे. या सेलच्या निमित्ताने सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेल्या या ऑफर्स ग्राहकांना खात्रीशीर बचतीसह दीर्घकालीन मूल्य प्रदान करतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि एआय आधारित जीवनशैलीकडे अपग्रेड करणे सोपे होईल.

सॅमसंग आपल्या बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर विशेष फायदे देत आहे, ज्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळू शकते. ग्राहकांना मनःशांती मिळावी, दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च कमी व्हावा आणि वस्तू खरेदीचा एकंदरीत अनुभव सुखद व्हावा, हा या फायद्यांमागचा उद्देश आहे.

या शुभ अक्षय्य तृतीया ऑफर्स ३१ मे २०२६ पर्यंत सॅमसंगडॉटकॉम, आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्‍स आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्‍ये उपलब्ध असतील.

सॅमसंगचे बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेस स्मार्ट, सर्वोत्तम आणि ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. वैयक्तिक गरजांनुसार कूलिंग करण्यापासून कनेक्टेड होम मॅनेजमेंटपर्यंत या अप्‍लायन्‍सेसमध्‍ये प्रगत एआय आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे.

विश्वासार्हता वाढवण्यासाठी, सॅमसंगच्या २०२६ बीस्‍पोक एआय एअर कंडिशनर श्रेणीमध्ये स्मार्टथिंग्स होम केअर एकीकृत करण्यात आले आहे. हे एक प्रो-अॅक्टिव्ह मॉनिटरिंग आणि प्रतिबंधात्मक देखभाल सोल्यूशन आहे, जे अप्‍लायन्‍सच्या कामगिरीचा सतत मागोवा घेते, गॅस गळती किंवा फिल्टर साफ करण्याची गरज यांसारख्या संभाव्य समस्या शोधते आणि वापरकर्त्यांना अलर्ट करते.

एआय व्हिजन इनसाइड तंत्रज्ञान असलेले बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर्स फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू ओळखून आणि कनेक्टेड इकोसिस्टमशी विनासायासपणे एकीकृत होऊन किचनमधील अन्‍न व्यवस्थापन अधिक स्मार्ट करतात.

सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्समध्ये एआय वॉश वैशिष्ट्य आहे, जे कपड्यांचे वजन व कापडाचा प्रकार स्‍मार्टपणे ओळखून पाणी, डिटर्जंटचा वापर आणि वॉश सायकल्सचे अचूक नियोजन करते, ज्यामुळे कपडे उत्तमरित्‍या स्‍वच्‍छ धुतले जातात.

या अप्‍लायन्‍सेसमध्‍ये सॅमसंगचे स्मार्टथिंग्स फॅमिली केअर हे विशेष वैशिष्‍ट्य देखील आहे, जे अॅक्टिव्हिटी नोटिफिकेशन्स, औषधांबाबत रिमाइंडर्स आणि लोकेशन-आधारित अलर्ट्स देते. यामुळे कुटुंबांना उत्तम काळजी, कनेक्टिव्हिटी आणि मनःशांती मिळण्यास मदत होते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार  मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...

आयटेलने लॉन्च केला 'सिटी ३०० ५जी' स्मार्टफोन

परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दमदार बॅटरी परफॉर्मन्स  मुंबई: भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेल ने आयटेल सिटी ३०० ५जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. तरुण आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा स्मार्टफोन १४,९९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे. परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दिवसभर साथ देणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्सपासून मुक्त सॉफ्टवेअरचा अनुभव देण्याचा सिटी ३०० ५जी चा प्रयत्न आहे. सिटी ३०० ५जी मध्ये १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं अधिक सहज आणि प्रतिसादक्षम होतं. टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसरमुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेला इंटरफेस यामुळे फोन वापरण्याचा अनुभव स्वच्छ, सोपा आणि त्रासमुक्त राहतो. त्यामुळे फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा स्मार्ट...