सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पुणे प्लांटमध्ये नव्या टायगुनचे उत्पादन सुरू

मुंबई। स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने आपल्या अत्याधुनिक पुणे प्लांटमध्ये नव्या फॉक्सवैगन टायगुनचे उत्पादन सुरू झाल्याची घोषणा केली. नवा टायगन “मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड” या ग्रुपच्या व्हिजनला अधिक बळकटी देतो. उच्च लोकलायझेशन, अचूक उत्पादन प्रक्रिया आणि भारतीय ग्राहकांच्या गरजांचा सखोल अभ्यास यांचा संगम या नव्या टायगनमध्ये दिसून येतो.

नवा फॉक्सवैगन टायगुन आपल्या पूर्वसुरीने घातलेल्या मजबूत पायावर आधारित असून आकर्षक नव्या डिझाइन एलिमेंट्समुळे दमदार आणि ताजेतवाने लूक देतो. टायगनच्या नव्या आवृत्तीत धारदार डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स आहेत. भारतीय रस्त्यांच्या विविध परिस्थितींना अनुरूप असा हा वाहन असून, व्हॉल्क्सवॅगनच्या युरोपियन ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, उत्कृष्ट आराम आणि तडजोड न करणारी ५-स्टार सेफ्टी या डीएनएला कायम ठेवतो.

“या घडामोडीवर भाष्य करताना, पियूष अरोरा, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले, “नव्या फॉक्सवैगन टायगुन चे उत्पादन सुरू होणे हे भारतातील आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन व्यवस्थेच्या परिपक्वतेचे प्रतीक आहे. भारतीय उत्पादन केंद्रे जागतिक दर्जाची वाहने उच्च लोकलायझेशनसह तयार करण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे आम्ही भारतातील तसेच निर्यात बाजारातील ग्राहकांच्या मागण्या त्वरित पूर्ण करू शकतो. टायगन हे या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे, जे व्हॉल्क्सवॅगनच्या जागतिक मानकांनुसार इंजिनिअर केले गेले असून भारतात कार्यक्षमतेवर, गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून तयार केले गेले आहे. नव्या टायगनचे उत्पादन सुरू करताना आम्ही भारताला ग्रुपसाठी एक महत्त्वाचे उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून अधिक मजबूत करत आहोत.”

नितीन कोहली, ब्रँड डायरेक्टर, फॉक्सवैगन इंडिया यांनी सांगितले “लॉन्चपासूनच टायगनने आमच्या एसयूव्ही स्ट्रॅटेजीला बळ दिले आहे. भारतीय ग्राहकांच्या आकांक्षांना प्रतिसाद देत आमच्या उत्पादन पोर्टफोलिओला मजबूत करण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका आहे. नवा टायगन आमच्या मॉडेल लाइन-अपच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनचा केंद्रबिंदू आहे, जो अर्थपूर्ण वाढ घडवून आणेल. चाकण प्लांटमध्ये नव्या टायगनचे उत्पादन सुरू होणे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. प्रीमियम जर्मन इंजिनिअरिंग असलेले उत्पादन भारतीय ग्राहकांना देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे. आम्हाला खात्री आहे की नवा टायगन आपल्या पूर्वसुरीच्या यशावर आधारित राहून ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावेल.”

२०२१ मध्ये पदार्पण केल्यापासून फॉक्सवैगन टायगुन ने डायनॅमिक परफॉर्मन्स, उत्कृष्ट आराम आणि मजबूत सुरक्षिततेमुळे भारतात तसेच जागतिक बाजारात विश्वासार्ह एसयूव्ही म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत भारतात १,४३,००० हून अधिक युनिट्स तयार झाले असून त्यापैकी सुमारे ३० टक्के निर्यात करण्यात आले आहेत. आता नव्या टायगनचे उत्पादन सुरू झाल्यामुळे व्हॉल्क्सवॅगनच्या एसयूव्ही पोर्टफोलिओला आणखी बळ मिळणार आहे. नवा टायगन डिझाइन, उपयुक्तता, आराम आणि परफॉर्मन्स यांचा उत्तम संगम साधून ग्राहकांना ताजेतवाने अनुभव देणार आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...