सीधे मुख्य सामग्री पर जाएं

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते।

हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे।

‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो।

मर्यादित साधनसामग्री आणि कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाच्या सादरीकरणाची आणि विषयाची प्रशंसा होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत अथर्व युनिव्हर्सिटी आणि अथर्व स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनच्या विद्यार्थी, शिक्षक आणि टीमचा मोलाचा सहभाग आहे. या यशानंतर वर्षा राणे  आणि त्यांची टीम पुढील फीचर फिल्मच्या तयारीत गुंतली असून त्यांच्या सर्जनशील प्रवासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे।

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

सलग चार वेळा ९ थरांची सलामी देत बाल गोपाल गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

कांजूरमार्ग पूर्वच्या बाल गोपाल गोविंदा पथकाचा दहीहंडी उत्सवात डंका; ईशान्य मुंबईत अभिमानाची कामगिरी मुंबई : दहीहंडी उत्सवातील थरार, साहस आणि गोविंदांच्या जिद्दीचे दर्शन घडवत बाल गोपाल गोविंदा पथक, कांजूरमार्ग पूर्व यांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात या पथकाने तब्बल चार वेळा ९ थरांची मानवी मनोरा रचना यशस्वीपणे साकारत आपल्या शिस्तबद्ध आणि दमदार कामगिरीची छाप उमटवली. विशेष म्हणजे, विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवात बाल गोपाल गोविंदा पथकाने ९ थरांची रचना करत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. पहिल्या प्रयत्नात मोहन चिराठ, नाहूर, दुसऱ्या प्रयत्नात राधा फाउंडेशन, चेंबूर, तिसऱ्या प्रयत्नात विक्रोली, कन्नमवार नगर येथे ९ थर यशस्वीरीत्या रचण्यात आले. तर चौथ्या वेळी कांजूरमार्ग पूर्व येथे ९ थरांचा मनोरा रचना साकारत पथकाने आपल्या कामगिरीवर कळस चढवला. या ऐतिहासिक यशामागे पथकातील गोविंदांची अथक मेहनत, नियमित सराव, शिस्त, एकजूट आणि परस्परांवरील विश्वास यांचा मोठा वाटा आहे. पथकाला कोच राजू लाखन बाबू पाटणकर आणि कोच विनोद वांगणे यांचे मोलाचे मार्ग...