सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंगची गॅलेक्सी झेड सिरीज आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध

मुंबई। सॅमसंगने घोषणा केली आहे की, त्यांची नवीन फोल्डेबल गॅलेक्सी झेड सिरीज आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या श्रेणीमध्ये सर्वोत्तम कंटेंट वापरासाठी गॅलेक्सी झेड फोल्ड८, प्रगत उत्पादकता व निर्मितीसाठी गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, आणि सॅमसंगचे आजवरचे सर्वात स्लिम फ्लिप डिवाईस गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांचा समावेश आहे. फोल्डेबल इनोव्हेशनच्या सात पिढ्यांवर आधारित ही सिरीज गॅलेक्सी एआयद्वारे संचालित आहे, ज्यामध्ये पारदर्शकता, गोपनीयता आणि वापरकर्त्याचे नियंत्रण कायम ठेवून कमी स्टेप्समध्ये टास्क्स पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी जेमिनी इंटेलिजन्सचा समावेश आहे.

“गेल्या सात पिढ्यांपासून आमच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सना मिळालेला प्रतिसाद सॅमसंगचे या श्रेणीतील नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध करतो, ज्याची सुरुवात आम्हीच केली होती. ग्राहक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि वैयक्तिकृत गॅलेक्सी एआय अनुभवांसाठी सॅमसंग फोल्डेबल्स निवडत आहेत, जे उत्पादकता आणि सर्जनशीलतेला सक्षम करतात. अत्याधुनिक हार्डवेअर इंजिनिअरिंग आणि टिकाऊ डिझाइनसह हे डिवाईसेस मेड इन इंडिया आहेत आणि त्यांना देशातील आमच्या आरअँडडी क्षमतांचे पाठबळ लाभले आहे, ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे नवनवीन शोध घेण्यास मदत होत आहे,'' *असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे प्रेसिडंट आणि सीईओ जेबी पार्क म्हणाले.* 

गॅलेक्सी झेड फोल्ड८: सर्वोत्तम व्ह्यूइंग अनुभवावर लक्ष केंद्रित करणारा नवीन फोल्डेबल अनुभव:

गॅलेक्सी झेड फोल्ड८ क्विक कव्हर-स्क्रीन परस्परसंवादापासून ते अनफोल्ड केल्यावर सर्वोत्तम व्ह्यूइंग, वाचन आणि गेमिंगमध्ये सहजतेने बदल करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. ४८०० एमएएच बॅटरीसह फक्त २०१ ग्रॅम वजन असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका गॅलेक्सी झेड फोल्ड आहे. नवीन फ्लेक्स टायटॅनियम डिस्प्ले स्ट्रक्चर क्रिज दृश्यमानता कमी करते आणि टिकाऊपणा सुधारते, तर मुख्य डिस्प्ले ३००० नीट्सपर्यंतच्या पीक ब्राईटनेसपर्यंत पोहोचतो. सिस्टममधील ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरा, ड्युअल रेकॉर्डिंग आणि माय फॅनकॅम वैशिष्ट्ये विविध सीन्समधील कंटेंट कॅप्चर आणि एडिट करणे सोपे करतात.

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा: उत्पादकतेसाठी सर्वात प्रगत फोल्डेबल:

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा सॅमसंगच्या सर्वोच्च दर्जाची कार्यक्षमता फोल्डेबल श्रेणीमध्ये घेऊन येतो, ज्यामध्ये मोठा ८-इंच मुख्य डिस्प्ले, प्रगत कॅमेरा सिस्टम आणि आव्हानात्मक वर्कफ्लोसाठी बनवलेले हार्डवेअर एकत्र केले आहे. हा डिवाईस फक्त ४.१ मिमी पातळ आहे आणि याचे वजन २१५ ग्रॅम आहे, ज्यामुळे हे सॅमसंगचे आजवरचे सर्वात स्लिम फोल्ड डिझाइन बनले आहे. एचडीआरसह २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि सुधारित नाईटोग्राफीसह नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स कोणत्याही प्रकाशात अधिक सुस्पष्टता देतात, तर नवीन एपीव्ही कोडेक आणि सिने एलयूटी टूल्ससह ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग क्रिएटर्सना अधिक नियंत्रण देतात. स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ फॉर गॅलेक्सी प्लॅटफॉर्म आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरीद्वारे संचालित हा डिवाईस दिवसभराचे काम आणि कंटेंट निर्मितीला पाठबळ देतो.

गॅलेक्सी झेड फ्लिप८: एआय-नेटिव्ह फ्लिप अनुभव:

गॅलेक्सी झेड फ्लिप८ जलद परस्परसंवाद आणि वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो एआय-नेटिव्ह फ्लेक्सविंडोभोवती निर्माण करण्‍यात आला आहे, जे कव्हर स्क्रीनवर थेट अॅप्स, माहिती आणि जेमिनी इंटेलिजन्स घेऊन येते. १८० ग्रॅम वजन आणि फक्त ६.१ मिमी पातळ असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि हलका फ्लिप डिवाईस आहे. सॅमसंगच्या प्रोव्हिज्युअल इंजिनद्वारे संचालित असलेला ५० मेगापिक्सल कॅमेरा तपशीलवार पोर्ट्रेट आणि नैसर्गिक स्किन टोन्स प्रदान करतो, तर फ्लेक्स मोड, होरायझन लॉकसह सुपर स्टेडी, फ्लिपशॉट आणि कव्हर स्क्रीन मिरर हँड्स-फ्री, तसेच कव्हर-स्क्रीन फोटोग्राफीला पाठबळ देतात.

गॅलेक्सी एआय सादर करत आहे अधिक वैयक्तिक आणि प्रोअॅक्टिव्ह अनुभव:

नवीन गॅलेक्सी झेड सिरीज गॅलेक्सी एआयच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये नाऊ ब्रीफ आणि नाऊ नज वापरकर्त्याच्या दैनंदिन दिनचर्या आणि गरजांवर आधारित संबंधित माहिती आणि सुचवलेल्या पुढील स्टेप्स समोर आणतात. जेमिनी इंटेलिजन्स वापरकर्त्यांना कमी स्टेप्समध्ये विनंतीपासून पूर्ण कामापर्यंत पोहोचण्यास मदत करते, ज्यामध्ये आता ४९ अॅप्लिकेशन्स आणि सर्व्हिसेसमध्ये अॅप ऑटोमेशनला पाठबळ दिले आहे, आणि जेमिनीमधील नोटबुक नोट्स, इमेजेस व रेकॉर्डिंग्जची रचनाबद्ध सारांशांमध्ये मांडणी करते.

अनुभवामध्ये समाविष्ट केलेली सुरक्षा आणि गोपनीयता:

नवीन गॅलेक्सी झेड सिरीज गॅलेक्सी एआयमधील विस्तारित गोपनीयता नियंत्रणांसह बहुस्तरीय सुरक्षितता देते. सॅमसंग नॉक्स प्रत्येक डिवाईसला चिप स्तरापासून सुरक्षित करते, ज्यामध्ये नॉक्स एन्हान्सड एन्क्रिप्टेड प्रोटेक्शन आणि नॉक्स वॉल्ट वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवतात. वन युआय ९ चे नवीन एआय असिस्टंट अॅक्टिव्हिटी डॅशबोर्ड वापरकर्त्यांना एआय क्रियांचा सेंट्रल व्ह्यू देते, तर एन्हान्सड प्रायव्हसी अलर्ट्स संभाव्य गोपनीयता जोखमींबद्दल माहिती देऊन अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण प्रदान करतात.

किंमत आणि उपलब्धता:
सॅमसंग गॅलेक्सी झेड सीरीज अंतर्गत गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ हे मॉडेल्स ग्रॅफाइट, क्रीम, व्हॉयलेट शॅडो, ग्रीन शॅडो, लव्हेंडर, पिस्ताचिओ, पिंक आणि मिंट अशा आकर्षक रंगांमध्ये (काही ऑनलाइन एक्सक्लूसिव्ह पर्यायांसह) उपलब्ध आहेत.

प्रिमियम गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्राचे १२/२५६ जीबी व्हेरिएंट १९९,९९९ रुपयांना, १२/५१२ जीबी व्हेरिएंट २१९,९९९ रुपयांना आणि उच्च क्षमतेचे १६/१ टीबी व्हेरिएंट २५९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच गॅलेक्सी झेड फोल्ड८ चे १२/२५६ जीबी व्हेरिएंट १७९,९९९ रुपयांना, १२/५१२ जीबी व्हेरिएंट १९९,९९९ रुपयांना तर १६/१ टीबी व्हेरिएंट २३९,९९९ रुपयांना बाजारात मिळणारे आहे. याशिवाय कॉम्पॅक्ट डिझाइन असलेल्या गॅलेक्सी झेड फ्लिप८ च्या १२/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १२४,९९९ रुपये आणि १२/५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत १४४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

प्री-ऑर्डर ऑफर्स:
सॅमसंग गॅलेक्सी झेड सीरिजच्या प्री-ऑर्डरवर ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स आणि सोप्या ईएमआयचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ या दोन्ही मॉडेल्सवर ग्राहकांना १०,००० रुपयांची अपग्रेड ऑफर किंवा ९,००० रुपयांची बीसीबी/युपीआय ऑफर निवडता येईल. तसेच, गॅलेक्सी झेड फ्लिप८ वर ५,००० रुपयांची अपग्रेड ऑफर किंवा ४,००० रुपयांची बीसीबी/युपीआय ऑफर दिली जात आहे. याशिवाय, तिन्ही मॉडेल्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी शून्य डाउन-पेमेंटसह ३० महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट एनबीएफसी ईएमआय किंवा शून्य डाउन-पेमेंटसह ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट बैंक ईएमआयचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

जगद्गुरु शंकराचार्य श्री त्रिकालभवंत सरस्वती जी महाराज यांच्या हस्ते राजयोगी बी.के. हरिलाल भानुशाली यांचा सत्कार

मुंबई। राजस्थानातील माउंट अबू येथे ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय संत संमेलनाचे उद्घाटन सत्र ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आनंद सरोवर परिसरात आयोजित करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात भारतातील शंकराचार्य, महंत, संन्यासी, संत आणि आध्यात्मिक नेते उपस्थित होते, ज्यांनी या कार्यक्रमाची आध्यात्मिक प्रतिष्ठा वाढवली. त्याच प्रसंगी, गॉडलीवुड स्टुडिओ (ब्रह्माकुमारी, माउंट अबू) चे कार्यकारी संचालक राजयोगी बी.के. हरिलाल भानुशाली यांना जगद्गुरु शंकराचार्य श्री त्रिकालभवंत सरस्वती जी महाराज यांनी कौतुकाचे पत्र प्रदान केले. हा सन्मान सनातन धर्माच्या जतन, प्रसार आणि सेवेसाठी ब्रह्मा कुमारींच्या समर्पणाचे प्रतीक आहे. प्रयागराज महाकुंभ मेळा २०२५ च्या शुभ प्रसंगी, गॉडलीवुड स्टुडिओने कुंभस्थळी एक भव्य स्टुडिओ उभारला असल्याचे ज्ञात आहे. या स्टुडिओद्वारे, कुंभमेळ्यादरम्यान आयोजित केलेले सर्व सेवात्मक उपक्रम आणि आध्यात्मिक कार्यक्रम 'पीस न्यूज' द्वारे 'पीस ऑफ माइंड' टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जात होते, ज्यामुळे भारत आणि परदेशातील लाखो भाविक...

कॉस्मॉलॉजिस्ट बलदेवकृष्ण शर्मा यांचे 'नॅचरल युनिव्हर्स एक्सपेंशन' हे पुस्तक मुंबईत प्रकाशित झाले

हे पुस्तक विश्वासाठी एक धाडसी नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन देते मुंबई। प्रसिद्ध कॉस्मॉलॉजिस्ट आणि नवोन्मेषक बलदेवकृष्ण शर्मा यांचे 'नॅचरल युनिव्हर्स एक्सपेंशन' हे पुस्तक गुरुवारी मुंबईत एका आकर्षक कार्यक्रमात प्रकाशित झाले. हे पुस्तक हबलचा नियम आणि महास्फोट सिद्धांत यासारख्या दीर्घकालीन सिद्धांतांना आव्हान देणारे वैश्विक विस्ताराचे एक क्रांतिकारी नवीन मॉडेल सादर करते.  हे अग्रगण्य काम नैसर्गिक विश्व विस्तार कायदा सादर करते, एक नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यामध्ये वेळेला एक गंभीर चल म्हणून समाविष्ट केले जाते, हा घटक लेखक असा युक्तिवाद करतात की हबलच्या नियमात अनुपस्थित आहे. श्री. शर्मा यांच्या मते, या दुर्लक्षामुळे विश्वाच्या विस्ताराच्या सध्याच्या समजुतीमध्ये मूलभूत त्रुटी निर्माण होतात.  "नॅचरल युनिव्हर्स एक्सपेंशन लॉ या अंतरांना दूर करते आणि एक नवीन स्थिरांक, न्यू स्थिरांक सादर करते, जो विश्वाच्या गतिशीलतेचे अधिक चांगले स्पष्टीकरण देतो," असे ते पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी म्हणाले.  नैसर्गिक विश्वाचा विस्तार केवळ वैश्विक विस्ताराच्या यांत्रिकीमध्ये...

सिद्धा ग्रुपकडून वडाळा येथील सिद्धा स्कायच्या अंतिम टॉवरचे लॉन्चिंग; घरखरेदीदारांना १० लाखां रुपये पर्यंतचे विशेष सणासुदीचे लाभ

जीटीबी नगर मोनोरेल स्टेशनजवळील 2 आणि 3 BHK घरांसाठी विशेष नवरात्री ऑफर्स आणि 25:25:25:25 ही सुलभ पेमेंट योजना मुंबई: सिद्धा ग्रुपने वडाळा येथील आपल्या प्रतिष्ठित निवासी प्रकल्प सिद्धा स्कायच्या अंतिम टॉवरच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. यामुळे घरखरेदीदारांना या प्रकल्पात स्वतःचे घर घेण्याची शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, येथे प्रशस्त 2 आणि 3 BHK घरे तसेच सणासुदीनिमित्त विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. मुंबईतील उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात घर शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. या लॉन्चिंगअंतर्गत घरखरेदीदारांना १० लाखां रुपये पर्यंतचे लाभ मिळू शकतात. यामध्ये ८ लाखां रुपयेचा लॉन्च बेनिफिट आणि त्याव्यतिरिक्त २ लाखां रुपये पर्यंतची स्पॉट ऑफर सवलत समाविष्ट आहे. याशिवाय, प्रकल्पात विशेष नवरात्री ऑफर्स आणि 25:25:25:25 ही सुलभ पेमेंट योजना उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना घर खरेदीचे आर्थिक नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येईल. सर्व ऑफर्स लागू नियम व अटींच्या अधीन आहेत. अंतिम टॉवरच्या लॉन्चिंगनिमित्त ५०० हून अधिक चॅनेल पार्टनर्सच्या सहभागाने भव्य चॅ...