सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाकडून ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ चे आयोजन

मुंबई। ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण आणि फायदेशीर मालकीहक्क अनुभव देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ कर किया इंडियाने किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ ची घोषणा केली आहे. हा कॅम्प ३ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना जागतिक दर्जाची विक्रीपश्चात सेवा, वेईकलची सर्वसमावेशक केअर आणि विशेष फायदे सहज उपलब्ध करून देण्यावर ब्रँडचा असलेला भर लक्षात घेऊन हा उपक्रम ३६५ शहरांमधील कियाच्या ५२१ अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्समध्ये राबवला जाईल.

या सर्व्हिस कॅम्पदरम्यान किया इंडिया ग्राहकांसाठी अनेक विशेष फायदे देत आहे. यामध्ये कार केअर सर्व्हिसेसवर २० टक्‍के सूट, एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजवर १० टक्‍क्‍यांपर्यंत सूट, रिटेल रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) प्लॅन्सवर १० टक्‍के सूट, पार्ट्स व लेबर चार्जवर (मजुरी) १० टक्‍के सूट आणि किया जेन्युइन अॅक्सेसरीजवर १० टक्‍के सूट समाविष्ट आहे. कियाच्या अधिकृत सर्व्हिस नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सोयीस्कर, उत्तम सुरक्षा आणि किफायतशीर दरात वेईकलची देखभाल करता यावी, यासाठी या मूल्यवर्धित सेवा डिझाइन केल्या आहेत.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे कस्टमर एक्सपिरियन्सचे व्हाईस प्रेसिडेंट भीमसेन गुलाबानी म्हणाले, "किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ मधून ग्राहकांना विनासायास व वैविध्‍यपूर्ण मालकीहक्क अनुभव देण्याप्रती आमची दृढ कटिबद्धता दिसून येते. या देशव्यापी उपक्रमाद्वारे आमचा ग्राहकांना त्यांचे वेईकल्‍स उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यास मदत करण्‍याोबत पारदर्शक, सुलभ आणि फायदेशीर विक्रीपश्चात सेवा देऊन त्यांच्याशी दीर्घकालीन संबंध दृढ करणे हा उद्देश आहे. आम्ही आमच्या सर्व्हिसचे दर्जेदार मानक सुधारत असताना ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या आणि भारतातील अत्यंत विश्वासार्ह मोबिलिटी ब्रँड म्हणून कियाचे स्थान प्रबळ करणाऱ्या अनुभवांची निर्मिती करण्यावर आमचा भर कायम आहे."

या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून ग्राहकांना वेईकल्‍सची मोफत ३६-पॉइंट हेल्थ चेक-अप सुविधा देखील मिळेल. यामध्ये वेईकलचा बाह्य भाग (एक्‍स्‍टीरिअर), अंतर्गत भाग (इंटीरिअर), इंजिन कंपार्टमेंट आणि अंडरबॉडी यांसारख्या महत्त्वपूर्ण भागांची तपासणी केली जाईल. संभाव्य समस्या वेळीच ओळखून वेईकलचे आयुष्य वाढवणे, तसेच सुरक्षितता, उत्तम कामगिरी आणि ड्रायव्हिंगचा आत्मविश्वास सुनिश्चित करणे हा या सर्वसमावेशक तपासणीचा उद्देश आहे.

हा उपक्रम वेईकलच्‍या प्रतिबंधात्मक देखभालीला प्रोत्साहन देण्यासाठी, अधिकृत सर्व्हिस नेटवर्कसोबत ग्राहकांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे सर्व्हिस मानक प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

याव्यतिरिक्त, ग्राहक आकर्षक एक्सचेंज ऑफर्ससोबत मोफत युज्‍ड-कारच्या मूल्यमापन सेवांचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना कियाच्या पोर्टफोलिओमधील भविष्यातील गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचे पर्याय पडताळून पाहता येतील.

ग्राहकांच्या अपेक्षा बदलत आहेत, तसे किया इंडिया सर्व्हिसमधील उत्कृष्टता, सुलभता आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून आपली विक्रीपश्चात परिसंस्‍था अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ उपक्रम ग्राहकांचा कार मालकीचा अनुभव अधिक उंचावून आणि भारतातील सर्वात विश्वासार्ह आफ्टरसेल्स सर्व्हिस ब्रँड बनण्याच्या कियाच्या उद्दिष्टाला पाठबळ देऊन हीच कटिबद्धता अधोरेखित करतो.

आपले सर्व्हिस नेटवर्क, डिजिटल क्षमता आणि ग्राहक सहभाग उपक्रमांमध्ये सातत्याने गुंतवणूक करून किया इंडिया ग्राहकांना ड्रायव्हिंगइतकाच कार बाळगण्याचा अनुभव आनंददायी आणि फायदेशीर करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच आफ्टरसेल्स क्षेत्रात उत्कृष्टतेचे नवीन मापदंड स्थापित करत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...