सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाकडून जून महिन्यातील आजपर्यंतच्‍या सर्वोच्च विक्रीची नोंद

१९ टक्के वाढीसह २४,५५२ युनिट्सची विक्री 

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आपल्या स्थापनेपासून जून महिन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च विक्री जाहीर केली आहे. जून २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या २०,६२५ युनिट्सच्‍या तुलनेत यंदा जून महिन्यात २४,५५२ युनिट्सची घाऊक विक्री झाली आहे, ज्‍यामध्‍ये वार्षिक १९ टक्‍के वाढ नोंदवण्यात आली आहे. या प्रबळ कामगिरीमधून कंपनीचा सातत्यपूर्ण विकास आणि कंपनीच्‍या प्रगत उत्पादन श्रेणीला ग्राहकांकडून मिळणारी चांगली पसंती दिसून येते.

वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत किया इंडियाने १,६३,७४९ युनिट्सची विक्री केली, जी कंपनीची पहिल्‍या सहामाहीमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या १,४२,१३९ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यात वार्षिक १५.२ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे.

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींनुसार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो. कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मिड-सादझ एसयूव्ही, रिक्रिएशनल वेईकल्‍स आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स अशा संतुलित उत्पादन श्रेणीच्या जोरावर कंपनीने भारतातील पॅसेंजर वेईकल बाजारपेठेमधील महत्त्वाच्या आणि वेगाने वाढणाऱ्या सेगमेंटमध्ये आपले स्थान अढळ ठेवले आहे. या कामगिरीमधून तंत्रज्ञानावर आधारित, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी ग्राहकांची वाढती पसंती देखील निदर्शनास येते, जे आता किया ब्रँडचे मुख्य वैशिष्ट्य बनले आहे.

किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे सीनियर व्हाईस-प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले, “वर्षातील पहिल्या सहामाहीची एका नव्या विक्रमी पातळीवर सांगता करणे आणि जून महिन्यात आजवरची सर्वोच्च विक्री नोंदवणे हा किया इंडियासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्‍प्‍यामधून ग्राहक आमच्या ब्रँडवर सतत दाखवत असलेला विश्वास दिसून येतो. नवीन सेल्टोस, सोनेट (Sonet) आणि कॅरेन्स क्लॅव्हिस यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे, तसेच एमवाय२६ सिरॉसला देखील ग्राहकांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. कियाचे विद्यमान ग्राहक नवीन सेल्टोस खरेदी करून स्वतःला अपग्रेड करत आहेत हे पाहणे विशेष आनंदाचे आहे, ज्यामुळे आमच्या उत्पादनांच्या प्रबळ मूल्याची क्षमता पुन्‍हा एकदा दिसून आली आहे. अनुकूल सरकारी धोरणे, ईव्हीचा वाढता स्वीकार आणि आम्ही अलीकडेच सुरू केलेला बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) प्रोग्राम यांच्या पाठबळामुळे क्लॅव्हिस ईव्हीला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत पाऊल ठेवताना आम्ही नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी, ग्राहकांचा मालकीचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

किया इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. कंपनीची सर्वात यशस्वी मिड-साइझ एसयूव्ही नवीन सेल्टोस तिच्या आकर्षक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानासह सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे, जिला ५-स्टार भारत एनसीएपी रेटिंग मिळाले असून ती भारतातील सर्वाधिक स्कोअर करणारी आयसीई कार ठरली आहे. सोनेट, कॅरेन्स, क्लॅव्हिस आणि एमवाय२६ किया सिरॉस या मॉडेल्सनी देखील ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत कंपनीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शाश्वत मोबिलिटीला चालना देण्यासाठी कियाने क्लॅव्हिस ईव्हीच्या माध्यमातून प्रीमियम इलेक्ट्रिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारे बनवले आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी किया इंडियाचे जाळे आज देशातील ४०७ शहरांमध्ये ८९२ टचपॉइंट्सपर्यंत विस्तारले आहे; ज्यामध्ये त्वरित पेमेंट आणि विनासायास एक्सचेंजची सुविधा देणारे १३३ सर्टिफाइड प्री-ओन्ड आउटलेट्स देखील समाविष्ट आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...