सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

बिजनेस लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

सॅमसंगकडून आधुनिक एआय आणि प्रगत कॅमेरासह 'गॅलेक्सी एस२६ एफई' लाँच

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एस२६ एफईची (Galaxy S26 FE) घोषणा केली. वन यूआय ९ सह लाँच होणारा हा या सिरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे, जो पहिल्या दिवसापासून अधिक वापरकर्त्यांपर्यंत नवीन प्रीमियम गॅलेक्सी अनुभव पोहोचवतो. सुधारित कॅमेरा क्षमता आणि अधिक संदर्भ-जागरूक गॅलेक्सी एआयसह हा स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या दररोज फोटो काढणे, क्रिएट करणे आणि कनेक्ट होण्याचा अनुभव अधिक समृद्ध करतो. वापरकर्ते ज्या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात त्यांना एका पातळ आणि हलक्या डिझाइनमध्ये समाविष्ट करत गॅलेक्सी एस२६ एफई आयकॉनिक गॅलेक्सी एस अनुभव पुढे घेऊन जातो. गॅलेक्सी एस२६ एफई ब्ल्यूबेरी, ग्रॅफाइट आणि पिस्ताचियो या तीन रंगांमध्ये निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल. "गॅलेक्सी एस२६ एफई गॅलेक्सी एस सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येक वैशिष्ट्य वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणेल," असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाईल एक्सपिरियन्स (एमएक्स) बिझनेसचे...

लोणावळ्यात अमावी सोबत सुरु केले 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज'

ताजचे लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पदार्पण मुंबई । भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे ' ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड 'अमावी' च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा ...

बोटने एआय-सक्षम स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेसच्या नव्या युगाची सुरुवात केली

मुंबई। गुगल क्लाऊड आणि इमॅजिन मार्केटिंग, भारतातील आघाडीच्या ऑडिओ आणि वेअरेबल ब्रँड्सपैकी एक असलेल्या बोट ची पॅरेंट कंपनी, पुढील पिढीतील ‘क्रेस्ट एआय’ स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेसमध्ये गुगल जेमिनी द्वारे समर्थित एआय-फर्स्ट फीचर्स आणण्यासाठी भागीदारी करत आहेत. क्रेस्ट एआय प्लॅटफॉर्म अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अत्यंत प्रतिसादक्षम एआय सोबत एकत्रित करून एआय इनोव्हेशन आणि दैनंदिन उपयुक्ततेला पुढील स्तरावर घेऊन जातो. ग्राहक आपल्या डिव्हाइसेसशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये जेमिनी लाईव्ह चे इंटिग्रेशन करण्यात येणार आहे, ज्यामुळे हायपर-पर्सनलाइज्ड आणि व्हॉइस-ड्रिव्हन अनुभव मिळेल. वापरकर्ते क्रेस्ट एआय -सक्षम डिव्हाइसेससोबत नैसर्गिक आणि सहज संवाद साधू शकतील. यामुळे पारंपरिक हार्डवेअर आणि अॅम्बियंट एआय कम्प्युटिंग यांच्यातील दरी कमी होईल. या सहकार्याचा उद्देश भारतातील विविध बोलीभाषांमध्ये लाखो वापरकर्त्यांपर्यंत प्रीमियम एआय फीचर्सची उपलब्धता सुलभ करणे हा आहे. गुगल क्लाऊडच्या मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि Gemini Enterprise...

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनानिमित्त 'बोट'च्या नव्या शॉर्ट फिल्ममध्ये अरबाज खानचा मजेशीर अंदाज

मुंबई। येत्या २८ ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड ' बोट' (boAt) ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'ब्लिंकिट' (Blinkit) आणि प्रसिद्ध अभिनेते-निर्माते अरबाज खान यांच्या सहकार्याने एका नव्या डिजिटल मोहिमेची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर सध्या या शॉर्ट फिल्मची जोरदार चर्चा सुरू असून, एका मजेशीर उपरोधाद्वारे प्रेक्षकांना "एक सर्वोत्तम भाऊ कसा असावा?" याचा विचार करायला लावला आहे. मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमधील मजेशीर डिजिटल फिल्म : मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आलेल्या या डिजिटल फिल्ममध्ये अरबाज खान हातात माइक घेऊन बॉलिवूडच्या 'ऑल-टाईम फेव्हरेट भाई' बनण्याच्या स्टाइलचे पृथक्करण करताना दिसतो. रात्री १ वाजताचे ट्विट्स, ठरवून मारलेले डायलॉग्स, आणि हिरोसारखा रुबाब दाखवणे म्हणजे प्रेम नव्हे, हे तो आपल्या खास शैलीत सांगतो. स्वतः अरबाजने ही भूमिका साकारल्यामुळे हा विनोद अधिकच रंगतो. बॉलिवूडमधील 'युनिव्हर्सल भाई' या प्रतिमेवर भाष्य करत जेव्हा अरबाज कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो, "मी भाईचा भ...

प्रत्येक जीवनशैलीसाठी बेस्ट फोल्डेबल 'गॅलेक्सी झेड सिरीज'

मुंबई। सॅमसंगचे नवीन इनोव्हेशन्स गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा दोन वेगवेगळ्या जीवनशैलींनुसार तयार केलेल्या डिझाइनद्वारे बेस्ट फोल्डेबल करू शकणार्‍या कार्यक्षमतेला नव्या उंचीवर घेऊन जातात. तुम्ही मनोरंजनात मग्न असाल, एकाच वेळी अनेक कामे (मल्टीटास्किंग) करत असाल किंवा कंटेंट क्रिएशन करत असाल, हे डिवाईसेस तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन आणि कार्यक्षमतेचा उत्तम मेळ साधतात. गॅलेक्सी झेड फोल्ड८ हा उत्कृष्ट शोध आणि कंटेंटच्या अनुभवासाठी बेस्ट फोल्डेबल ठरतो. त्याची पुनर्रचित डिझाइन बंद असताना डिवाईसला अधिक कॉम्पॅक्ट रूप देते, तर डिवाईस उघडल्यावर एक मोठी स्क्रीन मिळते, जी कंटेंट पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध करते. या डिवाईसची ४:३ मुख्य स्क्रीन चित्रपट, गेमिंग आणि सोशल मीडियासाठी मनमोहक व्ह्यूइंग अनुभव देते, तर डिवाईस ३:४ ओरिएंटेशनमध्ये फिरवल्यास वाचन आणि ब्राउझिंगसाठी उत्तम ठरतो. फक्त २०१ ग्रॅम वजनाचा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका गॅलेक्सी झेड फोल्ड आहे, जो सुलभ हाताळणी व ४,८०० एमएएच बॅटरीसह येतो. ही बॅटरी २६ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅकचा आनंद देते. त्या...

भारतातील ॲक्च्युएरिअल क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आयएआयकडून नवीन उपक्रमांची घोषणा

मुंबई। 'ॲक्च्युअरीज ॲक्ट, २००६ ' अंतर्गत स्थापन झालेली वैधानिक संस्था 'इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरीज ऑफ इंडिया' (आयएआय) ने 'ॲक्च्युअरीज डे २०२६' चे औचित्य साधून ॲक्च्युएरिअल क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आणि विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योग क्षेत्र, धोरणकर्ते व सर्वसामान्य जनतेमधील सहभाग वाढवण्यासाठी अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली. 'कोर्टयार्ड बाय मॅरियट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट' येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) अतिरिक्त सचिव डॉ. देबाशिष पृष्टी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी आयएआयच्या अध्यक्षा प्रीती चंद्रशेखर, उपाध्यक्ष अनुराग रस्तोगी, आयएआयच्या मानद सचिव आशा मुरली, इंटरनॅशनल ॲक्च्युएरिअल असोसिएशन (आयएए) चे अध्यक्ष माईक लोम्बार्डी आणि कार्तिकेय कंडोई (एफआयएआय, एफआयए, एफसीए) हेदेखील उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना 'इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरीज ऑफ इंडिया'च्या अध्यक्षा प्रीती चंद्रशेखर म्हणाल्या, "भारत जसा आपल्या सामाजिक सुरक्षा चौकटीचा विस्तार करत आहे आ...

२७ ऑगस्ट रोजी लॉन्च होणार गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन डिवाईस

मुंबई। गॅलेक्सी एस२६ सिरीजने आतापर्यंतच्या सर्वात दमदार कॅमेरा आणि एआय नाविन्यतांसह नवा मापदंड प्रस्थापित केला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना दररोज फोटो कॅप्चर करणे, कंटेंट तयार करणे आणि कनेक्ट राहणे अधिक सोपे झाले आहे. २७ ऑगस्ट रोजी, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन डिवाईसची ओळख करून देण्यासाठी 'गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६' आयोजित करेल. कॅमेऱ्यापासून एआयपर्यंत आणि अद्ययावत वन युआयसह गॅलेक्सी एस२६ चे मुख्य अनुभव, ज्यांना आपल्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे ते शोधायचे आहे अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने याचे डिझाइन करण्यात आले आहे. हा गॅलेक्सी इव्हेंट भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजता (केएसटीनुसार रात्री ९:०० वाजता) सॅमसंगडॉटकॉम आणि सॅमसंगच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल.

ओडोमॉसने ‘डेंग्यूमुक्त भारत’ अभियानाची सुरुवात करत दिवसा डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी जनजागृतीला दिली चालना

पावसाळ्यात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने देशव्यापी अभियानाची सुरुवात मुंबई। डाबर च्या समूहातील भारतातील क्रमांक १ वैयक्तिक वापरासाठीचे डास प्रतिबंधक उत्पादन असलेल्या ओडोमॉसने ‘डेंग्यूमुक्त भारत’ या देशव्यापी जनजागृती अभियानाची सुरुवात केली. नागरिकांमध्ये डेंग्यूपासून बचावाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच दिवसा डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांपासून संरक्षण घेण्याची गरज अधोरेखित करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शाळांमधील जनजागृती कार्यक्रम आणि समुदाय सहभागाच्या उपक्रमांद्वारे पावसाळ्याच्या काळात दररोज डासांपासून संरक्षण घेण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून बचावाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकारण्यास प्रोत्साहन देणे, हा ओडोमॉसच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे. ग्राहक शिक्षण आणि समुदाय जनजागृती कार्यक्रमांद्वारे कुटुंबांना डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांपासून सुरक्षित...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

सेझरॅककडून दोन नवीन ब्रँड्स अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट लाँच

मुंबई। सेझरॅक कंपनी या जगातील सर्वात मोठ्या डिस्टिल्ड स्पिरिट्स कंपनीने भारतात दोन नवीन अमेरिकन व्हिस्की ब्रँड्सच्या लाँचची घोषणा केली - डबल गोल्ड ब्लेंडेड व्हिस्की ‘अमेरिकन वुल्फ' आणि कोणत्याही कृत्रिम फ्लेवरशिवाय बनवलेली ‘साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्की'. दोन्ही ब्रँड्सची सुरुवात पुणे, नागपूर आणि नाशिकमधून होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये विस्तार केला जाईल. हे दुहेरी लाँच सेझरॅकचे जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की बाजारपेठ भारतातील आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या माध्यमातून भारतीय ग्रेन आणि माल्ट स्पिरिट्सच्या मिश्रणासह अमेरिकन व्हिस्कीची खास चव भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. "भारत व्हिस्कीची उत्सुकता वाढवणारी आणि वेगाने बदलणारी बाजारपेठ आहे आणि भारतातील ग्राहकांना अमेरिकन व्हिस्कीची चव, तिचे वैशिष्ट्य आणि वारशाची ओळख करून देण्याची एक मोठी संधी आम्हाला येथे दिसते," असे सेझरॅकचे ग्लोबल मार्केटिंग व्हॉइस प्रेसिडेंट डिएगो बिआंची म्हणाले. "अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न क...

किया इंडियाने नवीन अकॅडमीसह डीलर ट्रेनिंग नेटवर्कचा विस्तार केला

मुंबई। किया इंडिया या देशातील प्रमुख मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आज अहमदाबाद, गुजरात येथील सुपरनोव्हा किया येथे आपल्या नवीन डीलर ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन केले. दरमहा जवळपास २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली ही अकॅडमी विक्री (सेल) आणि सेवा (सर्व्हिस) विभागांमधील कुशल व तज्ज्ञ डीलर टीम्स विकसित करण्याच्या किया इंडियाच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. ही अकॅडमी ग्रुप डीलरशिपमधील विक्री आणि सेवा टीम्ससाठी डीलर-नेतृत्वित लेव्हल-१ प्रशिक्षण उपक्रम राबवण्यास सक्षम करते. स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा निर्माण करून किया इंडिया नवीन कर्मचारीवर्गाचे जलद समावेशन, विद्यमान टीम्सच्या कौशल्यामध्ये सतत वाढ आणि मध्यवर्ती प्रशिक्षणावरील अवलंबित्व कमी करणे सुनिश्चित करते. हा दृष्टिकोन डीलरशिप पातळीवर कर्मचाऱ्यांची स्थिरता सुधारण्यासोबत भूमिकांवर आधारित सखोल प्राविण्य निर्माण करण्यास मदत करतो. या उपक्रमामुळे ठिकाण कोणतेही असो, ग्राहकांना स्पष्ट संवाद, जलद सर्व्हिस टर्नअराउंड वेळ, समान सर्व्हिस मानक आणि अधिक सुलभ मालकीहक्काचा अनुभव मिळण्यास मदत होईल. सध्याच्या...

बोटने अवांते बार प्राईम साउंडबार सिरीज लाँच केली

मुंबई। भारतातील प्रथम क्रमांकाचा ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड बोट ने आपल्या नवीन अवांते बार प्राईम साउंडबार मालिकेच्या लाँचची घोषणा केली. रोजच्या मनोरंजनाला अधिक उत्कृष्ट आणि तल्लीन करणारा अनुभव देण्यासाठी कंपनीने आपल्या होम ऑडिओ पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. या श्रेणीमध्ये अवांते बार प्राईम डीए६००, अवांते बार प्राईम बी४५० आणि अवांते बार प्राईम थंडर-डी यांचा समावेश आहे. ही मालिका ६०० व्हॉटपर्यंतचा बोट सिग्नेचर साऊंड, ५.२-चॅनेल सराउंड साऊंड, डॉल्बी तंत्रज्ञान आणि ड्युअल सबवूफर्स एकत्रित आणते, ज्यामुळे चित्रपट, थेट क्रीडा सामने (लाइव्ह स्पोर्ट्स), गेमिंग आणि संगीतासाठी संपूर्ण कक्षात व्यापून राहणारा दमदार ध्वनी अनुभव मिळतो. फ्लॅगशिप मॉडेल अवांते बार प्राईम डीए६०० व्हॉटचा बोट सिग्नेचर साऊंड आणि ५.२-चॅनेल सराउंड साऊंड प्रदान करते; यात डॉल्बी ॲटमॉस, ड्युअल वायर्ड सबवूफर्स आणि ड्युअल रिअर सॅटेलाइट स्पीकर्स समाविष्ट आहेत. अवांते बार प्राईम बी४५० व्हॉट साऊंड आउटपुट आणि ५.२-चॅनेल सराउंड साऊंडसह ड्युअल वायर्ड सबवूफर्स व रिअर सॅटेलाइट स्पीकर्स प्रदान करते. अवांते बार प्राईम थंडर-डी रोजच...

पर्नोड रिकार्डकडून वंचित तरुणांना शिक्षण व रोजगाराची मोठी संधी

२५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ११.६८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती  मुंबई। पर्नोड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (पीआरआयएफ) ने युथ ड्रीमर्स फाउंडेशनसोबत भागीदारी करून वंचित समुदायातील तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि अर्थपूर्ण रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याचे कार्य अधिक वेगाने पुढे नेले आहे. २०१९ पासून सुरू असलेल्या 'PRIF शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील २,५७६ विद्यार्थ्यांना यशस्वीपणे सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत थेट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ६.९१ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्ती योजनांद्वारे आणखी ४.७७ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ११.६८ कोटी रुपयांचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ आर्थिक मदत न देता तरुणांना शिक्षणापासून थेट रोजगारापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शिष्यवृत्तीसोबतच मार्गदर्शन, करिअर गाईडन्स आणि रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांना सक्षम करण्यासाठी पीआ...

10,000+ अधिक शिकाऊ उमेदवारांना कौशल्य-प्रशिक्षण देण्यासाठी आणि डिजिटल कार्यबलाची सज्जता बळकट करण्यासाठी सेल्सफोर्स आणि त्रिपुरा सरकारचे सहकार्य

मुंबई। सेल्सफोर्स, जे क्रमांक #1 चे एजेंटिक CRM* आहे आणि त्रिपुरा सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग (DIT) यांनी आज संपूर्ण राज्यामध्ये डिजिटल कौशल्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कार्यबलाची सज्जता बळकट करण्यासाठी एका सहयोगाची घोषणा केली. आगरतळा येथे आयोजित डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2026 या मध्ये वरील उपक्रमाची घोषणा करण्यात आली. सेल्सफोर्सच्या ट्रेलहेड या ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थी, युवावर्ग, सरकारी कर्मचारी आणि उद्योजक यांना AI आधारित अर्थव्यवस्थेसाठी सज्ज करण्यात मदत करून, हा उपक्रम त्रिपुराच्या व्यापक डिजिटल परिवर्तनाच्या अजेंड्याला बळ देतो. 2027 पर्यंत 10,000 पेक्षा अधिक शिकणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे. AI सार्वजनिक सेवा, कार्यस्थळे आणि व्यवसायांना नव्याने आकार देत असताना, या सहकार्याचा उद्देश हाच आहे, कि शिकणाऱ्यांनी व्यावहारिक डिजिटल आणि तंत्रज्ञान कौशल्यं ह्या बाबतीत सुसज्ज होणे, जी भविष्यामधील कामासाठी जास्तीत जास्त गरजेची आहेत. नवशिकाऊ आणि मध्यम पातळीवरील शिकणाऱ्यांसाठी तयार केलेल्या, स्व-गत...

कॉईनडीसीएक्सची दैनिक आणि मासिक एसआयपी सुविधा

अवघ्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीसह क्रिप्टो गुंतवणूक केली अधिक सुलभ  मुंबई। भारतातील प्रमुख क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या कॉईनडीसीएक्सने आपल्या 'दैनिक एसआयपी' सुविधेची घोषणा केली आहे. कंपनीच्या आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या मासिक एसआयपी सुविधेचा हा एक नवीन विस्तार असून, याद्वारे वापरकर्त्यांना आता दररोज अवघ्या १०० रुपयांपासून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करता येईल. ही नवीन सुविधा गुंतवणूक प्रक्रियेस सोपी, स्वयंचलित आणि सहज ठेवण्यासोबतच, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अधिक नियमितता प्रदान करते. याव्यतिरिक्त, कॉईनडीसीएक्सने एक्सआयआरआर ट्रॅकिंग देखील सुरू केले आहे. हे उद्योग क्षेत्रातील एक मानक मूल्य आहे, जे आवर्ती (रिकरिंग) गुंतवणुकीतून मिळणाऱ्या वार्षिक परताव्याचे अचूक चित्र मांडते आणि वेळेनुसार पोर्टफोलिओच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करण्यास वापरकर्त्यांना मदत करते. या सुधारणेबाबत बोलताना, कॉईनडीसीएक्सचे एक्झिक्युटिव्ह व्हीपी - ग्रोथ अँड क्रिप्टो बिझनेस हेड, मिनाल ठुकराल म्हणाले, "एसआयपी हे कॉईनडीसीएक्स वरील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक उत्पादनांपैकी एक राहिले आहे आणि दैनिक तसेच मा...

बोटचा सिनेहेड एफ१ मालिकेसह स्मार्ट प्रोजेक्टरच्या श्रेणीत प्रवेश

मुंबई। बोटने सिनेहेड एफ१ मालिकेच्या सादरीकरणासह स्मार्ट प्रोजेक्टरच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. या मालिकेत सिनेहेड एफ१ आणि एफ१ प्रो या दोन प्रोजेक्टरचा समावेश आहे. या प्रोजेक्टरमध्ये गुगल टीव्ही ५.०, ४के गुणवत्तेला समर्थन देणारे १०८०पी पूर्ण एचडी मूळ चित्ररिझोल्यूशन आणि डॉल्बी ऑडिओसह स्वयंचलित मांडणीची सुविधा देण्यात आली आहे. चित्रपट, ओटीटी, क्रीडा आणि संगणकीय खेळांचा आनंद घेण्यासाठी तयार करण्यात आलेले हे दोन्ही प्रोजेक्टर १२० इंचांपर्यंतच्या पडद्याला समर्थन देतात. यामध्ये १०,००० हून अधिक अनुप्रयोगांचा वापर, गुगल सहाय्यक, मुलांसाठी स्वतंत्र वापर पद्धती तसेच नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसारख्या प्रमाणित अनुप्रयोगांची सुविधा उपलब्ध आहे. एफ१ प्रो मध्ये ५०० एएनएसआय ल्यूमेन्सची प्रकाशमानता आणि १० वॅटचा ध्वनिक्षेपक देण्यात आला आहे, तर एफ१ मध्ये ३०० एएनएसआय ल्यूमेन्सची प्रकाशमानता आणि ६ वॅटचा ध्वनिक्षेपक आहे. दोन्ही प्रोजेक्टरमध्ये स्वयंचलित केंद्रबिंदू समायोजन, स्वयंचलित कोन सुधारणा आणि अडथळे ओळखून त्यानुसार चित्र समायोजित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सिनेहेड एफ१ प्रो ची किंमत ३२,९९...

सॅमसंगच्या नव्या 'गॅलेक्सी झेड' सिरीज आणि स्मार्टवॉचेसची भारतात विक्री सुरू

मुंबई। सॅमसंगचे आठव्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८, तसेच नवीन वीअरेबल्स गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ आणि गॅलेक्सी वॉच९ आजपासून भारतातील रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहक हे डिवाईसेस Samsung.com , अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात. गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ ला भारतातील ग्राहकांकडून प्रचंड मागणी मिळाली आहे, तसेच लाँच झाल्यानंतर अवघ्या ७२ तासांत सॅमसंगला २,७१,००० प्री-ऑर्डर्स मिळाल्या आहेत. गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रामध्ये मोठा ८-इंच मुख्य डिस्प्ले आहे. हा डिवाईस फक्त ४.१ मिमी पातळ आहे, ज्यामुळे हे सॅमसंगचे आजवरचे सर्वात स्लिम फोल्ड डिझाइन बनले आहे. एचडीआरसह २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि सुधारित नाईटोग्राफीसह नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स कोणत्याही प्रकाशात अधिक सुस्पष्टता देतात. हा डिवाईस स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ फॉर गॅलेक्सी प्लॅटफॉर्म आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरीद्वारे संचालित आहे. ४८०० एमएएच ब...

अकुम्सतर्फे आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरीची नोंद; उत्पन्नात वार्षिक १४.९ टक्के वाढ

मुंबई: भारतातील सर्वात मोठी कंत्राटी विकास आणि निर्मिती संस्था (सीडीएमओ) असलेल्या ' अकुम्स ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड' ने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले असून, आर्थिक वर्ष २०२७ ची दमदार सुरुवात केली आहे. कंत्राटी निर्मिती व्यवसायातील सातत्यपूर्ण गती, सुधारलेली कार्यक्षमता आणि ग्राहकांकडून असलेली मजबूत मागणी याच्या बळावर कंपनीने महसूल, महसुली नफा आणि निव्वळ नफ्यात उत्तम वाढ नोंदवली आहे. अकुम्सने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत १,१६७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, जो आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील १,०२४ कोटी रुपयांच्या तुलनेत १३.९ टक्के जास्त आहे. व्याज, कर आणि घसारापूर्व नफा वार्षिक ३५.४ टक्क्यांनी वाढून१७५ कोटी रुपयांवर गेला आहे. तर नफ्याचे प्रमाण १२.६ टक्क्यांवरून १५.० टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. करोत्तर नफा १०१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत ६५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. निव्वळ नफ्याचे प्रमाणही ६.२ टक्क्यांवरून वरून ८.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. या तिमाहीत कंत्राटी निर्मिती व्यवसाय हा...

आयटेलने नवीन फीचर फोन Ace 3 Heera लाँच केला

आता Type C चार्जिंगसह, फक्त 949 रुपयांमध्ये उपलब्ध  मुंबई। भारतात टेक्नॉलॉजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळखली जाणारी अग्रगण्य टेक ब्रँड आयटेलने नुकताच आपला नवीन फीचर फोन Ace 3 Heera लाँच केला आहे. फीचर फोन युजर्सना मॉडर्न सुविधा देण्याच्या उद्देशाने तयार केलेला हा Ace 3 Heera आता जास्त वेगवान, विश्वासार्ह आणि कोणत्याही अडचणीशिवाय चार्जिंग अनुभव देतो. आयटेलने आता आपल्या संपूर्ण फीचर फोन पोर्टफोलिओमध्ये Type C चार्जिंग आणलं आहे - आणि असं करणारी ती भारतातील पहिली फीचर फोन ब्रँड ठरली आहे. भारतात लाखो फीचर फोन युजर्स अजूनही जुन्या Micro-USB केबलमध्ये अडकलेले आहेत. आयटेल ने आपल्या एंट्री-लेव्हल फीचर फोन सेगमेंटमध्येही Type-C चार्जिंग आणून लोकांचं रोजचं आयुष्य सोपं केलं आहे - आता एकाच केबलने स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्ही चार्ज करता येतील, आणि घरात अनेक चार्जर ठेवण्याची कटकटही कमी होईल. आयटेल Ace 3 Heera ब्लू, पर्पल आणि ब्लॅक अशा सुंदर रंगांमध्ये उपलब्ध आहे - आणि आता संपूर्ण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये फक्त ₹949 मध्ये मिळतो. यासोबतच आयटेल फीचर फोनमध्ये कोणत्याही मॅन्य...