सीधे मुख्य सामग्री पर जाएं

बोटने एआय-सक्षम स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेसच्या नव्या युगाची सुरुवात केली

मुंबई। गुगल क्लाऊड आणि इमॅजिन मार्केटिंग, भारतातील आघाडीच्या ऑडिओ आणि वेअरेबल ब्रँड्सपैकी एक असलेल्या बोट ची पॅरेंट कंपनी, पुढील पिढीतील ‘क्रेस्ट एआय’ स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेसमध्ये गुगल जेमिनी द्वारे समर्थित एआय-फर्स्ट फीचर्स आणण्यासाठी भागीदारी करत आहेत.

क्रेस्ट एआय प्लॅटफॉर्म अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अत्यंत प्रतिसादक्षम एआय सोबत एकत्रित करून एआय इनोव्हेशन आणि दैनंदिन उपयुक्ततेला पुढील स्तरावर घेऊन जातो. ग्राहक आपल्या डिव्हाइसेसशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये जेमिनी लाईव्ह चे इंटिग्रेशन करण्यात येणार आहे, ज्यामुळे हायपर-पर्सनलाइज्ड आणि व्हॉइस-ड्रिव्हन अनुभव मिळेल. वापरकर्ते क्रेस्ट एआय -सक्षम डिव्हाइसेससोबत नैसर्गिक आणि सहज संवाद साधू शकतील. यामुळे पारंपरिक हार्डवेअर आणि अॅम्बियंट एआय कम्प्युटिंग यांच्यातील दरी कमी होईल.

या सहकार्याचा उद्देश भारतातील विविध बोलीभाषांमध्ये लाखो वापरकर्त्यांपर्यंत प्रीमियम एआय फीचर्सची उपलब्धता सुलभ करणे हा आहे. गुगल क्लाऊडच्या मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि Gemini Enterprise Agent Platform वरील जेमिनी लाईव्हच्या मल्टीमॉडल क्षमतांचा वापर करून, बोटचे ‘क्रेस्ट एआय डिव्हाइसेस इंटेलिजंट कंपॅनियन म्हणून काम करतील. हे डिव्हाइसेस रिअल टाइममध्ये प्रादेशिक भाषिक बारकावे, संदर्भ आणि जटिल प्रश्न समजून घेण्यास सक्षम असतील.

“व्हॉइस हा माणसांच्या संवादाचा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे आणि एआय सोबत संवाद साधण्याचा सर्वात नैसर्गिक मार्गही तोच बनेल, असा आमचा विश्वास आहे. बोट कडे एक अनोखी संधी आहे, कारण आमची लाखो उपकरणे आधीच लोकांच्या कानात आहेत. क्रेस्ट एआयच्या माध्यमातून उपयुक्त एआय अनुभव थेट या माध्यमापर्यंत पोहोचवणे आणि परवडणाऱ्या तसेच दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या उपकरणांद्वारे ते लाखो ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे, ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. ही आमची पहिली पायरी आहे आणि जसजसे आम्ही शिकत जाऊ आणि ही प्रणाली विकसित करत राहू, तसतसा हा अनुभव अधिक समृद्ध आणि अधिक सक्षम बनवत राहू.”- समीर मेहता, सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक, बोट.

बोटचे सीईओ गौरव नय्यर म्हणाले, “बोट मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्येकासाठी सुलभ व्हावे, असे धाडसी आणि प्रभावी काहीतरी निर्माण करणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे. आमच्या क्रेस्ट एआय डिव्हाइसेसमध्ये गुगलचे जेमिनी इंटिग्रेट करून आम्ही मोठी झेप घेत आहोत. आम्ही बेसिक व्हॉइस असिस्टंटच्या पुढे जाऊन सामान्य व्हॉइस क्वेरीज, डिव्हाइस कंट्रोल, म्युझिक प्लेबॅक, प्रोडक्टिव्हिटी, भाषांतर आणि FAQ सपोर्टसाठी इंटेलिजंट, संवादात्मक एजंट्स तयार करत आहोत. गुगल क्लाऊड सोबतची भागीदारी आम्हाला हा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर साकारण्यास आणि भारतासह जगभरातील अॅम्बियंट कम्प्युटिंगचे भविष्य नव्याने परिभाषित करण्यास सक्षम करेल.”

‘क्रेस्ट एआय डिव्हाइसेसचे गुगल वर्कस्पेस सोबतही इंटिग्रेशन केले जाईल. त्यामुळे बोट ऑडिओ डिव्हाइसेस हँड्स-फ्री प्रोडक्टिव्हिटी कंपॅनियनमध्ये रूपांतरित होतील. वापरकर्ते व्हॉइसच्या माध्यमातून Gmail, Tasks आणि कॅलेंडर मॅनेज करू शकतील. क्रेस्ट ट्रान्सलेट रिअल टाइममध्ये द्विमार्गी भाषांतराची सुविधा देईल, ज्यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधता येईल. तर क्रेस्ट आस्क दैनंदिन ऐकण्याच्या अनुभवामध्ये संवादात्मक इंटेलिजन्स आणेल. यामुळे वापरकर्ते संदर्भ समजून घेणाऱ्या नैसर्गिक संवादाच्या माध्यमातून शिकू, कल्पना मांडू, प्रश्न विचारू किंवा सहज गप्पा मारू शकतील.

उदाहरणार्थ, Gmail आणि Google Calendar सोबतच्या इंटिग्रेशनद्वारे वापरकर्ता म्हणू शकतो, “त्या ईमेलला उत्तर देण्यासाठी मला मदत करा” किंवा “माझ्यासाठी एक मीटिंग शेड्यूल करा.”

गुगल क्लाऊड इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर शशी श्रीधरन म्हणाले, “बोट हा भारतातील आघाडीच्या वेअरेबल ब्रँड्सपैकी एक आहे आणि अत्याधुनिक एआय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न हा आम्ही पाठिंबा देऊ इच्छित असलेल्या इनोव्हेशनचे उत्तम उदाहरण आहे. भारतात व्हॉइस आणि स्थानिक भाषा हे एआय साठी पुढील महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि जेमिनी लाईव्ह हे शक्य करण्यास मदत करते. गुगल क्लाऊडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीने बोट ही सुविधा भारतातील लाखो वापरकर्त्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचवू शकते.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पीकेएफ इंडियाने 'ग्रीन वॉकॅथॉन'सह ५० वर्षे साजरी केली; देशभरात ५,००० झाडे लावण्याची प्रतिज्ञा

सामुदायिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या या उपक्रमात १३० हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. मुंबई। पीकेएफ इंडिया च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणाऱ्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून, पीकेएफ इंडिया ग्रुपने शनिवारी सकाळी मुंबईतील माझगाव येथील जोसेफ बाप्टिस्टा गार्डनमध्ये ' वॉक फॉर अ कॉज - ग्रीन एन्व्हायर्नमेंट ' (एका ध्येयासाठी पदयात्रा - हरित पर्यावरण) आयोजित केली. या कार्यक्रमात अधिक हरित आणि शाश्वत भविष्याच्या समर्थनासाठी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले. सकाळी ७:०० ते ९:३० या वेळेत आयोजित या वॉकॅथॉनमध्ये पीकेएफ श्रीधर अँड संथनम एलएलपी, पीकेएफ कन्सल्टिंग एलएलपी आणि पीकेएफ सर्व्हहब प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधित्व करणारे १३० हून अधिक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. हा उपक्रम समूहाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ५,००० झाडे लावण्याच्या व्यापक सुवर्ण महोत्सवी वचनबद्धतेचा एक भाग आहे, ज्यामुळे या सोहळ्याचा पर्यावरण आणि समुदाय-केंद्रित उद्देश अ...

जगातील सर्वात मोठ्या बालचित्रपट महोत्सवाची १० वी आवृत्ती मुंबईत साजरी झाली

मुंबई: जगातील सर्वात मोठ्या बालचित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या स्कूल सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (SCIFF) २०२६ च्या १० व्या आवृत्तीचा विशेष कार्यक्रम मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतीय वर्गांमध्ये जागतिक सिनेमा आणण्याच्या एका दशकाचा उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमात १०० हून अधिक विद्यार्थी, चित्रपट निर्माते, शिक्षक आणि चित्रपट उद्योगातील व्यावसायिक सहभागी झाले होते. मुलांमध्ये सर्जनशीलता, सहानुभूती आणि चिकित्सक विचारशक्ती वाढविण्यात सिनेमाच्या भूमिकेवर या कार्यक्रमात प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाला SCIFF ज्युरी सदस्य रश्मी सिंग, लेखिका-दिग्दर्शिका सौम्या तिवारी, ॲनिमेलाच्या सह-संस्थापिका ॲनी दोशी, चित्रपट निर्माते संकेत दीपक निकम, मयुरेश रवींद्र मोरे, रुमित अय्यर, हम्माद दानिश आणि अनेक तरुण चित्रपट निर्माते व सिनेमॅटोग्राफर उपस्थित होते. SCIFF चे महोत्सव संचालक आणि LXL आयडियाजचे संस्थापक व मुख्य शिकाऊ, सय्यद सुलतान अहमद म्हणाले, "गेल्या दहा वर्षांपासून, SCIFF ची दृष्टी केवळ मुलांना पडद्यासमोर आणणे ही नाही, तर ...

भारतात स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्ट तर्फे १०८ नेत्र-काळजी केंद्रे उभारली जाणार

मुंबई: देशभरातील दृष्टिहीन आणि गरजू रुग्णांना प्रगत, दर्जेदार आणि मोफत नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, ' स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्ट , सुपा' ४५० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून जागतिक दर्जाचे नेत्र रुग्णालय उभारणार आहे. ट्रस्टच्या ' व्हिजन फॉर एव्हरी होम' (प्रत्येक घरात दृष्टी) या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, संपूर्ण भारतात १०८ नेत्रोपचार केंद्रे सुरू करण्याची योजना असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.भावीन पटेल यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी पत्रकारांना आव्हान केले कि तुमच्याकडे कुठेही गरजू रुग्ण दृष्टीपथात आहेत त्यांना आमच्या कडे घेऊन या किंवा आम्हाला कळवा त्यांना आम्ही त्यांना आमच्या संस्थेत मोफत किंवा माफक दरात इलाज करू. स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक रुग्णाचे दुःख दूर करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हे आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम नेत्रसेवा सवलतीच्या दरात किंवा पूर्णपणे मोफत पोहोचवणे आहे. या प्रकल्पाच्या पहिल्य...