सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंगच्या नव्या 'गॅलेक्सी झेड' सिरीज आणि स्मार्टवॉचेसची भारतात विक्री सुरू

मुंबई। सॅमसंगचे आठव्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८, तसेच नवीन वीअरेबल्स गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ आणि गॅलेक्सी वॉच९ आजपासून भारतातील रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहक हे डिवाईसेस Samsung.com, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात. गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ ला भारतातील ग्राहकांकडून प्रचंड मागणी मिळाली आहे, तसेच लाँच झाल्यानंतर अवघ्या ७२ तासांत सॅमसंगला २,७१,००० प्री-ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रामध्ये मोठा ८-इंच मुख्य डिस्प्ले आहे. हा डिवाईस फक्त ४.१ मिमी पातळ आहे, ज्यामुळे हे सॅमसंगचे आजवरचे सर्वात स्लिम फोल्ड डिझाइन बनले आहे. एचडीआरसह २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि सुधारित नाईटोग्राफीसह नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स कोणत्याही प्रकाशात अधिक सुस्पष्टता देतात. हा डिवाईस स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ फॉर गॅलेक्सी प्लॅटफॉर्म आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरीद्वारे संचालित आहे.

४८०० एमएएच बॅटरीसह फक्त २०१ ग्रॅम वजन असलेला गॅलेक्सी झेड फोल्ड८ सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका गॅलेक्सी झेड फोल्ड आहे. नवीन फ्लेक्स टायटॅनियम डिस्प्ले स्ट्रक्चर क्रिज दृश्यमानता कमी करते आणि टिकाऊपणा सुधारते, तर मुख्य डिस्प्ले ३००० नीट्सपर्यंतच्या पीक ब्राईटनेसपर्यंत पोहोचतो. सिस्टममधील ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरा, ड्युअल रेकॉर्डिंग आणि माय फॅनकॅम वैशिष्ट्ये विविध सीन्समधील कंटेंट कॅप्चर आणि एडिट करणे सोपे करतात. फोल्ड केलेले असताना गॅलेक्सी झेड फोल्ड८ ची १०:१६ कव्हर स्क्रीन मेसेजिंग, सोशल मीडिया, वेब ब्राउझिंग आणि शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ पाहण्यासारख्या टास्क्ससाठी डिझाइन केली आहे. अनफोल्ड केल्यावर, ४:३ मुख्य डिस्प्ले गेम्स आणि चित्रपटांसाठी मोठा व्ह्यूइंग एरिया प्रदान करतो आणि १६:९ कंटेंटसाठी न वापरलेली स्क्रीन जागा कमी करतो.

गॅलेक्सी झेड फ्लिप८ चे वजन फक्त १८० ग्रॅम आहे आणि फक्त ६.१ मिमी पातळ असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि हलका फ्लिप डिवाईस आहे. सॅमसंगच्या प्रोव्हिज्युअल इंजिनद्वारे संचालित असलेला ५० मेगापिक्सल कॅमेरा तपशीलवार पोर्ट्रेट आणि नैसर्गिक स्किन टोन्स प्रदान करतो, तर फ्लेक्स मोड, होरायझन लॉकसह सुपर स्टेडी, फ्लिपशॉट आणि कव्हर स्क्रीन मिरर हँड्स-फ्री, तसेच कव्हर-स्क्रीन फोटोग्राफीला पाठबळ देतात.

गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ हे सॅमसंगचे आजवरचे सर्वात सक्षम स्मार्टवॉच आहे. हे स्मार्टवॉच शक्तिशाली बनावटीसोबत ट्रेल रनिंग आणि डायव्हिंगसह विविध उपक्रमांसाठी विशेष ट्रॅकिंग मोड एकत्रित करते. नवीन ट्रेल रन वैशिष्ट्य धावपटूंना त्यांच्या वेगाचे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी उंची, चढाईची प्रगती आणि जमिनीच्या स्थितीचा प्रभाव मोजते. विद्यमान स्वेट लॉस वैशिष्ट्यामध्ये नवीन जोडलेले न्यूट्रिशन अलर्ट शरीराच्या वजनाच्या तुलनेत घामाच्या रूपात झालेल्या पाण्याच्या नुकसानाची पाहणी करून पाण्याची गरज किती आहे याचा अंदाज लावते. हे प्रोफेशनल डायव्हिंगसाठी देखील मदत करते.

गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ मध्ये ८०० एमएएच बॅटरी, क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगन एलिट प्लॅटफॉर्म दिला आहे; तसेच घराबाहेर अधिक चांगल्या दृश्यमानतेसाठी (व्हिजिबिलिटी) ५००० नीट्सपर्यंतच्या पीक ब्राईटनेसला सपोर्ट करणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे वॉच त्याची शॉक-रेजिस्टंट टायटॅनियम बनावट कायम ठेवते, तर मऊ आणि हलके बँड्स सतत वापरादरम्यान आराम वाढवण्यासाठी डिझाइन केले आहेत.

गॅलेक्सी वॉच९ हे सॅमसंगचे दैनंदिन वापराचे स्मार्टवॉच म्हणून डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये आराम, दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी लाईफ आणि सतत आरोग्य ट्रॅकिंगवर भर देण्यात आला आहे. हे वॉच सॅमसंगचे कुशन-आकाराचे डिझाइन कायम ठेवताना अॅल्युमिनियम केसचा वापर करते. गॅलेक्सी वॉच९ क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन एलिट प्लॅटफॉर्मवर चालते. यामध्ये दिवसभर वापरासाठी ४० मिमी व्हेरिएंटमध्ये ३९० एमएएच बॅटरी आणि ४४ मिमी व्हेरिएंटमध्ये ४४५ एमएएच बॅटरी दिली आहे. याचा डिस्प्ले ३००० नीट्सपर्यंत ब्राइटनेस देतो, ज्यामुळे प्रखर प्रकाशातही माहिती पाहणे सोपे होते. हे वॉच ४० मिमी आणि ४४ मिमी आकारात उपलब्ध असेल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आइस मेक रेफ्रिजरेशनच्या दुसऱ्या तिमाहीत महसुलात 41% वाढ; कंपनी पुन्हा नफ्यात

Q2 FY27 मध्ये एकत्रित महसूल ₹207.38 कोटी; पहिल्या सहामाहीत 49% वाढीसह महसूल ₹386.26 कोटींवर अहमदाबाद: रेफ्रिजरेशन आणि कोल्ड-चेन सोल्यूशन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आइस मेक रेफ्रिजरेशन लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार महसूलवाढ नोंदवली असून, तिमाही स्तरावर पुन्हा नफ्यात पुनरागमन केले आहे. 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित व्यवसायातून मिळालेला महसूल 40.6% वाढून ₹207.38 कोटी झाला. मागील वर्षी याच तिमाहीत तो ₹147.49 कोटी होता. कंपनीने Q2 FY27 मध्ये ₹2.71 कोटींचा एकत्रित करपश्चात नफा (PAT) नोंदवला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील ₹2.02 कोटींपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, Q1 FY27 मध्ये तोटा नोंदवल्यानंतर कंपनीने पुन्हा नफ्यात प्रवेश केला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (H1 FY27) कंपनीचा एकत्रित महसूल 49.1% वाढून ₹386.26 कोटी झाला, तर मागील वर्षी याच कालावधीत तो ₹258.99 कोटी होता. H1 FY27 मधील PAT ₹1.05 कोटी राहिला, जो मागील वर्षी ₹0.55 कोटी होता. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पी. पटेल म्हणाले, “Q2 FY27 मधी...

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना सढळ हातांनी पुढे

मुंबई : महाराष्ट्राचा कणा असलेला बळीराजा आज निसर्गाच्या लहरीपणाशी आणि कठीण काळाशी झुंज देत आहे. अशा या संकटकाळात अन्नदात्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य तेजिंदर सिंग तिवाना हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा देण्यासाठी सढळ हातांनी मदतीचा ओघ घेऊन पुढे सरसावले आहेत. दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या माणसांसोबत वाटून घेण्याच्या भावनेतून नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹२,५०,००० (अडीच लाख रुपये) चा भरीव निधी सुपूर्द केला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.  यावेळी तजिंदर सिंग तिवाना म्हणाले, “शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध! अन्नदात्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी दिवाळी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देऊन मी माझी जबाबदारी पूर्ण केली.” देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निवारण आणि शेतकरी कुटुंबां...

केदार शिंदे दिग्दर्शित "गणा धाव रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: भक्तांच्या हाकेला धावून येणारा बाप्पा आपण नेहमीच पाहिला आहे. पण यावेळी खुद्द बाप्पाच भक्तांना हाक घालणार असेल तर? देव आणि भक्त यांच्या नात्याला एक अनपेक्षित वळण देणाऱ्या या अनोख्या संकल्पनेची झलक बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘ गणा धाव रे’ या आगामी मराठी चित्रपटामधून पाहायला मिळणार आहे. नुकताच या कमाल सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटातून गणेशोत्सवाचा उत्साह, श्रद्धेचे विविध रंग आणि माणुसकीचा हळवा पदर एका रंजक कथेतून उलगडणार आहे. गणपती बाप्पा म्हणजे केवळ आराध्य दैवत नाही, तर प्रत्येक भक्ताच्या मनात वसलेला विश्वास! गणेशोत्सवाचा जल्लोष, बाप्पाच्या आगमनाची ओढ, मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराच्या आयुष्याशी जोडलेल्या भावना आणि गणरायाशी जोडलेल्या श्रद्धेच्या विविध छटा ट्रेलरमधून अनुभवायला मिळतात. ट्रेलरमध्ये दिसणारी निसर्गरम्य दृश्यं, गणेशोत्सवाच्या उत्साहाने भारलेलं वातावरण आणि कथेला साजेसं श्रवणीय संगीत चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करतं. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या या चित्रपटात भरत जाधव, प्रणाली घोगरे, भार्गवी चिर...