सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सेझरॅककडून दोन नवीन ब्रँड्स अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट लाँच

मुंबई। सेझरॅक कंपनी या जगातील सर्वात मोठ्या डिस्टिल्ड स्पिरिट्स कंपनीने भारतात दोन नवीन अमेरिकन व्हिस्की ब्रँड्सच्या लाँचची घोषणा केली - डबल गोल्ड ब्लेंडेड व्हिस्की ‘अमेरिकन वुल्फ' आणि कोणत्याही कृत्रिम फ्लेवरशिवाय बनवलेली ‘साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्की'. दोन्ही ब्रँड्सची सुरुवात पुणे, नागपूर आणि नाशिकमधून होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये विस्तार केला जाईल. हे दुहेरी लाँच सेझरॅकचे जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की बाजारपेठ भारतातील आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या माध्यमातून भारतीय ग्रेन आणि माल्ट स्पिरिट्सच्या मिश्रणासह अमेरिकन व्हिस्कीची खास चव भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

"भारत व्हिस्कीची उत्सुकता वाढवणारी आणि वेगाने बदलणारी बाजारपेठ आहे आणि भारतातील ग्राहकांना अमेरिकन व्हिस्कीची चव, तिचे वैशिष्ट्य आणि वारशाची ओळख करून देण्याची एक मोठी संधी आम्हाला येथे दिसते," असे सेझरॅकचे ग्लोबल मार्केटिंग व्हॉइस प्रेसिडेंट डिएगो बिआंची म्हणाले. "अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्कीद्वारे आम्ही बाजारपेठेत दोन अतिशय वेगळ्या प्रकारची उत्पादने आणत आहोत, ज्यातील एक धाडस, महत्त्वाकांक्षा आणि व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे, तर दुसरे सहजता आणि सुलभतेवर आधारित आहे. भारतात व्हिस्कीच्या विविध आणि वेगळ्या अनुभवांसाठी नक्कीच वाव आहे, या आमच्या विश्वासाचेच प्रतिनिधीत्व ही उत्पादने एकत्रितपणे करतात."

अमेरिकन वुल्फ: व्हिस्कीची नवीन श्रेणी
अमेरिकन वुल्फ अद्वितीय मिश्रणाद्वारे भारतातील ग्राहकांसाठी व्हिस्कीची नवीन श्रेणी घेऊन येत आहे. यात कोणत्याही कृत्रिम फ्लेवरचा वापर न करता अस्सल अमेरिकन व्हिस्कीचे वैशिष्ट्य आणि निवडक भारतीय ग्रेन व माल्ट स्पिरिट्स एकत्र केले आहेत. ठाम आणि वेगळी ओळख असणारी अमेरिकन वुल्फ आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या आजच्या व्हिस्की प्रेमींसाठी तयार करण्यात आली आहे. नीट, बर्फासोबत किंवा सोड्यासोबत आनंद घेता येईल अशा पद्धतीने डिझाइन केलेली ही व्हिस्की अमेरिकन व्हिस्कीपासून प्रेरित असलेली बोल्ड चव भारतातील बाजारपेठेत आणते. अमेरिकन वुल्फ सुरुवातीला ७५० मिली, १८० मिली आणि ९० मिली या पॅकमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये ७५० मिली बाटलीची किंमत संबंधित राज्याचे कर आणि किमतींच्या नियमांनुसार साधारण १,०७० रूपये असेल.

साउदर्न कम्फर्ट: अमेरिकन व्हिस्कीची सहज आणि सुलभ चव
१५० वर्षांहून अधिक काळ अमेरिकन वारसा लाभलेली साउदर्न कम्फर्ट नवीन आणि आकर्षक स्वरूपात भारतात परतत आहे. १९९० च्या दशकातील या व्हिस्कीच्या पूर्वीच्या उपस्थितीमुळे भारतातील अनेक ग्राहकांसाठी हे नाव ओळखीचे आहे. साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्की सहज, सोपा आणि आरामदायी अनुभव देण्यासाठी अमेरिकन व्हिस्कीला भारतीय माल्ट आणि ग्रेन स्पिरिटसोबत मिश्रित करते. "गेट कम्फर्टेबल" या भावनेवर आधारित ही व्हिस्की बर्फासोबत किंवा तिच्या चवीचा पूर्ण आनंद घेण्यासाठी थोडे पाणी मिसळून पिण्यासाठी बनवण्यात आली आहे. साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्की सुरुवातीला ७५० मिली पॅकमध्ये उपलब्ध असेल आणि त्यानंतर १८० मिली व ९० मिली या पॅकमध्ये येईल. ७५० मिली बाटलीची किरकोळ किंमत संबंधित राज्याचे कर आणि किमतींच्या नियमांनुसार साधारण १,५०० रूपये असेल.

"भारत जगातील सर्वात मोठी व्हिस्कीची बाजारपेठ आहे आणि येथील ग्राहक आता नवनवीन प्रकार, आंतरराष्ट्रीय ट्रेंड्स आणि वेगळे पर्याय सातत्याने शोधत आहेत," असे सेझरॅकचे ग्लोबल मार्केटिंग व्हॉइस प्रेसिडेंट डिएगो बिआंची म्हणाले. "भारतातील ग्राहक अमेरिकन जीवनशैली, मनोरंजन आणि संस्कृतीकडून अधिकाधिक प्रेरणा घेत आहेत, तसतसे तीच शैली त्यांच्या ग्लासमध्ये आणण्याची स्पष्ट संधी आम्हाला दिसते. अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट हे दोन्ही ब्रँड्स याच संकल्पनेवर आधारित आहेत, फक्त दोन वेगवेगळ्या प्रसंगांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत."

ऑगस्ट २०२६ पासून पुणे, नागपूर आणि नाशिकमधील स्टोअर्सच्या शेल्फवर, तसेच निवडक बार आणि हॉटेल्समध्ये अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर उर्वरित वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...