सीधे मुख्य सामग्री पर जाएं

रितेश देशमुख यांच्या हस्ते वर्ल्ड रोबोट ओलंपियाड इंडिया मुंबई प्रादेशिक चॅम्पियनशिपचे उद्घाटन

मुंबई। वर्ल्ड रोबोट ओलंपियाड(डब्ल्यूआरओ) इंडिया मुंबई प्रादेशिक स्पर्धा २०२६ मध्ये युवा अभियंत्यांची प्रतिभा, त्यांची कल्पकता आणि नवनवीन तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या स्पर्धेत विविध भागांतील विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या जागतिक थीम रोबोट्स मीट कल्चर” वर आधारित आधुनिक रोबोटिक्स प्रकल्प सादर केले. अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी फ्युचर इनोव्हेटर्स एलिमेंटरी या श्रेणीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले. या दोघांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांनी तयार केलेले रोबोटिक्स प्रकल्प पाहिले. विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाबद्दलची आवड, सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता पाहून त्यांनी त्यांचे कौतुक केले. रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

इंडिया STEM फाउंडेशन (ISF) आणि नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स (NCSM) यांच्या संयुक्त विद्यमाने, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत फ्युचर इनोव्हेटर्स एलिमेंटरी’ आणि सिनियर’ या श्रेणीतील विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ परीक्षकांसमोर आपले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विविध टप्प्यांतील मूल्यांकनातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना आणि तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रकल्पांमधून रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सांस्कृतिक वारसा कसा जतन करता येतो, त्याचे चांगल्या पद्धतीने सादरीकरण कसे करता येते आणि त्याला नवीन स्वरूप कसे देता येते, हे दाखवण्यात आले. तसेच सर्जनशील विचार आणि अभियांत्रिकी कौशल्यांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता देखील या प्रकल्पांमधून दिसून आली.

मुंबई प्रादेशिक चॅम्पियनशिप ही फ्युचर इनोव्हेटर्स श्रेणीसाठी भारतभर आयोजित करण्यात येणाऱ्या दहा प्रादेशिक स्पर्धांपैकी एक आहे. या प्रादेशिक फेरीत निवड झालेल्या संघांना २६ ते २८ ऑगस्ट २०२६ दरम्यान जीएमआर एरिना, जीएमआर एअरोसिटी, हैदराबाद येथे होणाऱ्या वर्ल्ड रोबोट ओलंपियाड(डब्ल्यूआरओ) इंडिया राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली; देशातील परवडणाऱ्या घरांच्या बाजारात मंदीला छेद परवडणाऱ्या घरांच्या बाजारात राष्ट्रीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय विक्री मुंबई।  लखोटिया रियॅलिटीने सांगितले की, केवळ ५ आठवड्यांत त्यांच्या केवाळे येथील GPS (ग्रेटर पनवेल सुपरझोन) प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे रु. २५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली गेली आहेत. देशभरातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट होत असताना ही विक्री राष्ट्रीय कलाला छेद देणारी ठरली आहे. रु. २५ लाखांच्या घराच्या किमतीनुसार रु.२० लाखांच्या गृहकर्जावर अंदाजे रु. १७,००० मासिक ईएमआय येतो. त्यामुळे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ५०,०००–६०,००० असलेल्या कुटुंबांसाठी घरमालकीची संधी अधिक सुलभ होते. याउलट, मुंबईच्या मध्यवर्ती भागात किंमत-उत्पन्न गुणोत्तर १०:१ पेक्षा अधिक असल्याने, एवढी रक्कम सरासरी सदनिकेच्या खरेदीसाठीच्या आगाऊ रकमेचा क्वचितच पुरेशी ठरते. नाईट फ्रँकच्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी बाजारपेठांमध्ये रु. ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ...

बाईकवो आपल्या ताफ्यात १०,००० वाहनांची भर घालणार

मुंबई। बाईकवो ग्रीन टेक लिमिटेड (NSE: BIKEWO) ने २०२६-२७ या आर्थिक वर्षात आपल्या ऑपरेटिंग ताफ्यात जवळपास १०,००० वाहनांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी यासाठी ₹७६ कोटींहून अधिक किमतीच्या वॉरंट्सच्या प्रिफरेन्शियल इश्यूद्वारे निधी उभारणार आहे. हा विस्तार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि वितरणाच्या पलीकडे जाऊन ईव्ही मालमत्ता मालकी आणि लीजिंग, फ्लीट तैनाती, विशेष मोबिलिटी ॲप्लिकेशन्स, ऑपरेटिंग पार्टनरशिप्स, लाइफसायकल सपोर्ट आणि तंत्रज्ञान-आधारित लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमधील कंपनीच्या मोठ्या स्थित्यंतराचे प्रतिनिधित्व करतो. बाईकवोने या पुढील टप्प्याला "बाईकवो असेन्ड" असे नाव दिले आहे. या परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बायो एनर्जी डिव्हिजनसोबत विशेष इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी आणि तैनात करण्यासाठी झालेला एक मोठा करार. जीएसटीसह या करारांचे एकूण अंदाजे मूल्य सुमारे ₹६६.४६ कोटी असून, त्यांची वैधता जुलै २०२३ पर्यंत आहे. हे ट्रॅक्टर विशेष लोडर, कॅचर आणि ग्रॅबर उपकरणांनी सुसज्ज आहेत आणि कंपनी चालक व वाहन संचालन सेवा द...