आता Type C चार्जिंगसह, फक्त 949 रुपयांमध्ये उपलब्ध
मुंबई। भारतात टेक्नॉलॉजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळखली जाणारी अग्रगण्य टेक ब्रँड आयटेलने नुकताच आपला नवीन फीचर फोन Ace 3 Heera लाँच केला आहे. फीचर फोन युजर्सना मॉडर्न सुविधा देण्याच्या उद्देशाने तयार केलेला हा Ace 3 Heera आता जास्त वेगवान, विश्वासार्ह आणि कोणत्याही अडचणीशिवाय चार्जिंग अनुभव देतो. आयटेलने आता आपल्या संपूर्ण फीचर फोन पोर्टफोलिओमध्ये Type C चार्जिंग आणलं आहे - आणि असं करणारी ती भारतातील पहिली फीचर फोन ब्रँड ठरली आहे. भारतात लाखो फीचर फोन युजर्स अजूनही जुन्या Micro-USB केबलमध्ये अडकलेले आहेत. आयटेल ने आपल्या एंट्री-लेव्हल फीचर फोन सेगमेंटमध्येही Type-C चार्जिंग आणून लोकांचं रोजचं आयुष्य सोपं केलं आहे - आता एकाच केबलने स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्ही चार्ज करता येतील, आणि घरात अनेक चार्जर ठेवण्याची कटकटही कमी होईल. आयटेल Ace 3 Heera ब्लू, पर्पल आणि ब्लॅक अशा सुंदर रंगांमध्ये उपलब्ध आहे - आणि आता संपूर्ण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये फक्त ₹949 मध्ये मिळतो. यासोबतच आयटेल फीचर फोनमध्ये कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टसाठी १ वर्षाची काउंटर रिप्लेसमेंट ऑफरही देत आहे.
लाँचच्या वेळी बोलताना, आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले, "टेक्नॉलॉजीचं काम आयुष्य सोपं करणं आहे, गुंतागुंतीचं करणं नाही. आम्ही अशी ब्रँड आहोत ज्यांनी आपल्या विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या प्रॉडक्ट्समधून भारतासाठी टेक्नॉलॉजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. लाखो भारतीयांसाठी वेगवेगळ्या फोनसाठी वेगवेगळे चार्जर बाळगणं ही रोजची डोकेदुखी होती. Ace 3 Heera सोबत आम्ही फक्त आणखी एक फीचर फोन लाँच करत नाही आहोत - आम्ही आमच्या संपूर्ण फीचर फोन पोर्टफोलिओमध्ये युनिव्हर्सल Type-C चार्जिंगच्या दिशेने भारताचं नेतृत्व करत आहोत."
सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर) च्या अलीकडच्या रिपोर्टमध्ये - "द रायजिंग रोल ऑफ ड्युरॅबिलिटी, रिलायबिलिटी अँड अफोर्डबीलीटी इन इंडियाज डिव्हाईस मार्केट" - आयटेलचं जबरदस्त परफॉर्मन्स समोर आलं आहे - फीचर फोनमध्ये ०.६५ आणि स्मार्टफोनमध्ये ०.८६ स्कोअर, जो या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त आहे. शिवाय, ८५% ग्राहकांना वाटतं की त्यांना पैशांचा पुरेपूर मोबदला मिळतो, ८१% लोक आयटेल ला मजबुती आणि टिकाऊपणाशी जोडतात, ७९% जणांना त्याचं डिझाईन आवडतं, आणि ७४% जण त्याला एक विश्वासार्ह ब्रँड मानतात.
Ace 3 Heera मध्ये १००० एमएएचची बॅटरी आहे, सोबतच एआय बॅटरी ऑप्टिमायझेशनही आहे जे स्मार्टपणे पॉवर मॅनेज करून दिवसभर विश्वासार्ह परफॉर्मन्स देतं. यात सुपर बॅटरी मोडसुद्धा आहे, ज्यामुळे बॅटरी कमी असतानाही युजर्स कनेक्टेड राहू शकतात. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी आयटेल Heera मध्ये ब्लूटूथ सपोर्टही आहे, ज्यामुळे वायरलेस पेअरिंग सोपं होतं. यात ऑटो कॉल रेकॉर्डिंग फीचरही आहे, ज्यामुळे महत्त्वाचं संभाषण सहज सेव्ह करता येतं. एंटरटेनमेंटसाठी यात वायरलेस एफएम रेडिओ आहे, ज्यात रेकॉर्डिंग फंक्शनही आहे - म्हणजे इयरफोनशिवायही आवडते कार्यक्रम ऐकता आणि सेव्ह करता येतात.
या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डद्वारे ३२ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येतं, ज्यामुळे गाणी, फोटो आणि फाईल्ससाठी भरपूर जागा मिळते. मेमरी कार्डवरून थेट रिंगटोन सेट करणं आणि कॉन्टॅक्ट फोटो/आयकॉन लावणं अशा फीचर्समुळे तो पर्सनलाइझ करणं आणखी सोपं होतं. याशिवाय, इंग्रजी आणि हिंदी दोन्ही सपोर्ट करणारा किंग टॉकर व्हॉईस असिस्टंट, आणि २०० पर्यंत कॉन्टॅक्ट्स सेव्ह करण्याची सुविधा - या सगळ्यामुळे आयटेल Ace 3 Heera रोजच्या संवादासाठी एक स्मार्ट, प्रॅक्टिकल आणि युजर-फ्रेंडली फीचर फोन ठरतो.
Type-B चा जमाना छान गेला. आता त्याला अधिकृतपणे निरोप दिला गेला आहे. फीचर फोन्समध्ये Type-C युगात तुमचं स्वागत आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें