सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून 'ऑल-न्यू हाइलक्स'चे अनावरण

आकर्षक नवीन रूप, प्रगत कनेक्टिव्हिटी आणि दमदार कामगिरीचा उत्तम संगम 

मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आपल्या प्रतिष्ठित 'ऑल-न्यू हाइलक्स' (Hilux) या वाहनाच्या भारतातील अनावरणाची घोषणा केली. देशातील आपल्या एसयूव्ही श्रेणीला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. टोयोटाच्या विश्वासार्हता, टिकाऊपणा आणि उत्कृष्ट गुणवत्तेच्या परंपरेचे प्रतीक असलेली ही नवव्या पिढीतील हाइलक्स रग्ड टिकाऊपणा आणि अष्टपैलू कामगिरी सादर करण्यासाठी विशेषरीत्या डिझाइन करण्यात आली आहे.

आयएमव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित, ऑल-न्यू हाइलक्स हे वाहन अत्यंत खडतर कामांसाठी टिकाऊ, शहरी ड्रायव्हिंगसाठी आरामदायक आणि साहसी प्रवासासाठी सक्षम असण्यासोबतच उत्कृष्ट अष्टपैलू उपयुक्तता प्रदान करते. ही लवचिकता टोयोटाच्या 'मोबिलिटी फॉर ऑल' या कटिबद्धतेला बळकट करते, तसेच ग्राहकांशी असलेले आजीवन नाते अधिक दृढ करते.

या नव्या अनावरणाबाबत बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझु योशिमुरा म्हणाले, "टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये ग्राहक-केंद्रितता म्हणजे ग्राहकांच्या आजच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या भविष्यातील आकांक्षांसाठी सज्ज राहणे होय. भारतातील जवळपास तीन दशकांच्या प्रवासात, आम्ही आमच्या ग्राहकांचे ऐकून, भविष्यात गुंतवणूक करून आणि विश्वास, गुणवत्ता व विश्वासार्हतेवर आधारित मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करून सातत्याने प्रगती केली आहे. आमच्या 'मोबिलिटी फॉर ऑल' या व्हिजनने प्रेरित होऊन, आम्ही दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या ग्राहकांचा विश्वास जिंकणारी उत्पादने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ऑल-न्यू हाइलक्स ही दिशा अधिक मजबूत करते."

उत्पादनाच्या वैशिष्ट्यांवर बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट (सेल्स-सर्व्हिस-यूज्ड कार बिझनेस) सबरी मनोहर म्हणाले, "ऑल-न्यू हाइलक्सचे बाह्य आणि अंतर्गत डिझाइन 'टफ अँड एजाइल' संकल्पनेअंतर्गत करण्यात आले आहे, ज्यामध्ये 'मजबुती आणि चपळता' यांचा मिलाफ आहे. २.८-लिटर इंजिन, टोयोटाची प्रसिद्ध ४डब्ल्यूडी क्षमता, १२.३-इंच इन्फोटेनमेंट सिस्टीमसह आय-कनेक्टसारखे प्रगत कनेक्टेड तंत्रज्ञान आणि सात एअरबॅग्ससह सर्वसमावेशक सुरक्षा फीचर्सच्या बळावर ही नवी हाइलक्स ग्राहकांच्या अपेक्षांवर खरी उतरेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे."

'टफ अँड एजाइल' डिझाइन व बाह्यस्वरूप:
"टफ अँड एजाइल" संकल्पनेअंतर्गत डिझाइन केलेली ऑल-न्यू हाइलक्स दणकट मजबुती आणि डायनॅमिक चपळता एकत्र आणते. याचे बोल्ड फ्रंट-एंड "सायबर सुमो" संकल्पनेपासून प्रेरित आहे, जे सुमो कुस्तीमधील प्रतिष्ठित प्री-कॉम्बॅट पोश्चर (लढाईपूर्वीची मुद्रा) दर्शवते. नवीन डिझाइन केलेला फ्रंट बंपर, पियानो ब्लॅक अॅक्सेंट, वेलकम फंक्शनसह एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉग लॅम्प्स आणि वैशिष्ट्यपूर्ण डे-टाईम रनिंग लाईट्स याचे आधुनिक स्वरूप अधिक निखरतात. याशिवाय अलॉय व्हील्स, अॅरोडायनामिक स्टेबिलायझिंग फिन, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल व रिट्रॅक्टेबल ओआरव्हीएम्स, एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्प्स आणि शार्प-फिन अँटेना यामुळे वाहनाची दृश्यमानता आणि स्थिरता अधिक वाढते.

शक्तिशाली आणि सहज परफॉर्मन्स:
या वाहनात १५० केडब्ल्यू आणि ५०० एनएम टॉर्क देणारे २.८-लिटर BS6 फेझ २ डिझेल इंजिन ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. ८०-लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह हे वाहन महामार्ग, शहरी रस्ते आणि आव्हानात्मक रस्त्यांवर दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी अत्यंत कार्यक्षम आहे.

उत्कृष्ट ४X४ ऑफ-रोडिंग क्षमता:
टोयोटाची प्रगत फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम (हाय - एच४ आणि लो - एल४ रेंज) कोणत्याही भूप्रदेशावर सहज मात करते. इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक आणि डाऊनहिल असिस्ट कंट्रोल याच्या ऑफ-रोड क्षमतेला अधिक बळकट करतात. डबल विशबोन (फ्रंट) आणि लीफ स्प्रिंग (रिअर) सस्पेंशनमुळे प्रवासात उत्कृष्ट रोड ग्रिप आणि स्मूथ राइड मिळते.

आधुनिक केबिन आणि प्रगत तंत्रज्ञान:
गाडीच्या आत सॉफ्ट-टच अपहोल्स्ट्री, मेटॅलिक अॅक्सेंट, आणि एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले कॉकपिट दिलेले आहे. १२.३-इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले (अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह), नवीन ऑप्टिट्रॉन मेटल-टोन कॉम्बीमीटर, टोयोटा आय-कनेक्ट तंत्रज्ञान, ८-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, पीएम२.५ एअर फिल्टरेशन, पुश स्टार्ट/स्टॉप आणि तीन ड्राईव्ह मोड (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट) यांमुळे प्रवाशांना आरामदायी व जोडलेला अनुभव मिळतो.

सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था:
सुरक्षेसाठी यात सात एसआरएस एअरबॅग्स, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेक असिस्टसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इमर्जन्सी ब्रेक सिग्नल, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज आणि जिओए बॉडी स्ट्रक्चर दिलेले आहे. याव्यतिरिक्त, पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि टीपीएमएस (TPMS) ड्रायव्हरचा आत्मविश्वास वाढवतात.

रंग आणि आकर्षक किती:
ऑल-न्यू हाइलक्स ६ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे: सुपर व्हाईट, प्लॅटिनम पर्ल व्हाईट, अॅटिट्यूड ब्लॅक+, इमोशनल रेड, सल्फर मेटॅलिक+ आणि ॲश. याशिवाय विविध ओरिजिनल एक्सेसरीजद्वारे ग्राहक हे वाहन कस्टमाइझ करू शकतात. तिचे प्रकार आणि एक्स-शोरूम किमती ४X२ जीएक्स, एटी (३१,९९,००० रुपये), ४X४ जीएक्स, एटी (३३,६९,००० रुपये) आणि ४X४ व्हीएक्स, एटी (३६,६९,००० रुपये) अशा ठेवण्यात आल्या आहेत

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

५ वर्षांपासून कानात येणाऱ्या 'हृदयाच्या ठोक्यांसारख्या' आवाजापासून मुक्ती

जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार  मुंबई। महाराष्ट्रातील जळगावमधील एका २५ वर्षीय महिलेला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा "व्हूशिंग" असा आवाज येत होता. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे झालेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला या त्रासापासून पूर्णपणे आराम मिळाला आहे. या महिला रुग्णाच्या केसमधून निदर्शनास येते की, रक्तवाहिन्यांशी संबंधित मूळ कारण ओळखून अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर पल्साटाईल टिनिटसच्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात. या महिला रुग्णाला हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा सतत व्हूशिंग आवाज येत होता. वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही आणि विविध चाचण्या व उपचार करूनही तिला कायमस्वरूपी आराम न मिळता हा त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने मुंबईत येऊन जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा, एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर शाह यांच्या टीमने रुग्णाची एमआरआय व एमआरव्ही तपासणी...

सॅमसंगचा बीस्‍पोक एआय विंडफ्री एसीद्वारे स्मार्ट कूलिंगचा अनुभव

मुंबई। लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २३ मॉडेल्‍स, तसेच ४-स्‍टार व्‍हेरिएण्‍ट्स असलेली नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमतता आणि प्रीमियम डिझाइनवर लक्ष केंद्रित करते. भारतातील कुटुंबांना वाढत्‍या तापमानाचा आणि सतत बदलत असलेल्‍या हवामान स्थितींचा सामना करावा लागत असताना एअर कंडिशनिंगबाबत अपेक्षा साध्‍या कूलिंगपलीकडे जात आहेत. सॅमसंगची १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२६ लाइनअप या परिवर्तनाचे निराकरण करते, जेथे या लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रीमियम डिझाइन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. हे एअर कंडिशनर्स रूममधील स्थिती आणि वापरकर्त्‍याच्‍या पसंतीशी सर्वोत्तमपणे जुळून जातात, जेथे योग्‍य कूलिंग व आरामदायीपणा देतात. रूममध्‍ये त्‍वरित कूलिंग निर्माण करायचे असल्‍यास एआय फास्‍ट व विंडफ्री कूलिंग+ वैशिष्‍ट्ये साह्य करतात, तर ड्राय कम्‍फर्ट मोड भारतातील मान्‍सूनच्‍या काळात आर्द्रतेवर देखरेख ठेवत...

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई। ज्येष्ठ पत्रकार आणि 'मुंबई तरंग' (गुजराती आणि हिंदी वृत्तपत्र) तसेच 'वेस्टर्न इंडिया टाइम्स' (इंग्रजी दैनिक) चे मुख्य संपादक, दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वश्रुत आहे की, दिलीप पटेल हे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या निःपक्षपाती आणि निर्भीड लेखनासाठी ओळखले जातात. ते मुंबईत, तसेच दिल्लीसह संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनता, सरकार आणि प्रशासनाशी सक्रियपणे संवाद साधतात. कामगार, शेतकरी आणि सैनिकांचा आवाज नेहमीच उठवणाऱ्या, तसेच सरदार साहेबांच्या 'सामर्थ्यवान भारताचा पाया, सरदारांचे विचार' आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीची पक्षाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने गुजरातमध्ये पक्षाला आणखी बळकटी मिळेल.