10,000+ अधिक शिकाऊ उमेदवारांना कौशल्य-प्रशिक्षण देण्यासाठी आणि डिजिटल कार्यबलाची सज्जता बळकट करण्यासाठी सेल्सफोर्स आणि त्रिपुरा सरकारचे सहकार्य
मुंबई। सेल्सफोर्स, जे क्रमांक #1 चे एजेंटिक CRM* आहे आणि त्रिपुरा सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग (DIT) यांनी आज संपूर्ण राज्यामध्ये डिजिटल कौशल्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कार्यबलाची सज्जता बळकट करण्यासाठी एका सहयोगाची घोषणा केली. आगरतळा येथे आयोजित डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2026 या मध्ये वरील उपक्रमाची घोषणा करण्यात आली. सेल्सफोर्सच्या ट्रेलहेड या ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थी, युवावर्ग, सरकारी कर्मचारी आणि उद्योजक यांना AI आधारित अर्थव्यवस्थेसाठी सज्ज करण्यात मदत करून, हा उपक्रम त्रिपुराच्या व्यापक डिजिटल परिवर्तनाच्या अजेंड्याला बळ देतो. 2027 पर्यंत 10,000 पेक्षा अधिक शिकणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे.
AI सार्वजनिक सेवा, कार्यस्थळे आणि व्यवसायांना नव्याने आकार देत असताना, या सहकार्याचा उद्देश हाच आहे, कि शिकणाऱ्यांनी व्यावहारिक डिजिटल आणि तंत्रज्ञान कौशल्यं ह्या बाबतीत सुसज्ज होणे, जी भविष्यामधील कामासाठी जास्तीत जास्त गरजेची आहेत. नवशिकाऊ आणि मध्यम पातळीवरील शिकणाऱ्यांसाठी तयार केलेल्या, स्व-गतीच्या शिक्षणाच्या मदतीने, सहभागी झालेल्यांना CRM, व्यवसाय विश्लेषण, तंत्रज्ञानाची मूलतत्त्वे आणि इतर अनेक विषयांमध्ये मार्गदर्शित असे शिक्षणाचे मार्ग उपलब्ध होतील. शिकणाऱ्यांना प्लॅटफॉर्म हाताळण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षण प्रवासामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी सेल्सफोर्स, ऑनलाइन मार्गदर्शन संसाधने सुद्धा प्रदान करेल.
माहिती तंत्रज्ञान संचालनालय सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि कौशल्य विकास संस्थांच्या माध्यमातून सहभागी झालेल्यांची ओळख पटवून त्यांची निवड करेल; शिवाय संपूर्ण राज्यभरात या कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करून त्याचा विस्तार करेल.
ही भागीदारी त्रिपुराच्या डिजिटल प्रशासन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उद्योजकता यांमधील निरंतर गुंतवणुक यांवर आधारित आहे. राज्य सरकार आगरतळा या ठिकाणी त्रिपुरा IT आणि डेटा इकोसिस्टम झोन (TIDEZ) विकसित करत असून, त्यासोबतच IT पार्क आणि AI सेंटर ऑफ एक्सलन्स उभे करण्याचे नियोजनही करत आहे; तसेच सार्वजनिक प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जात आहे. राज्याने आपला ई-ऑफिस उपक्रम फक्त एका वर्षापेक्षा थोड्या अधिक कालावधीमध्ये राज्य सचिवालयापासून ते पंचायत राज व्यवस्थेच्या तिन्ही स्तरांपर्यंत विस्तारित केला आहे — जी भारतातील अशा प्रकारची सर्वात वेगवान अंमलबजावणी ठरली आहे. या डिजिटल पायाला सुलभ आणि उद्योगाच्या गरजांना सुसंगत अशा शिक्षण-प्रशिक्षणाची जोड देऊन, सेल्सफोर्स आणि त्रिपुरा सरकार जास्तीत जास्त लोकांना राज्याच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक अशी कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत.
त्रिपुरा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव, IAS अधिकारी किरण गिट्टे म्हणाले, "सेल्सफोर्ससोबतची आमची भागीदारी ही त्रिपुराच्या डिजिटल प्रवासातीमधील एक महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे. धोरणात्मक पाया आधीच भक्कम असल्यामुळे, या सहयोगाने आमचे विद्यार्थी, सरकारी कर्मचारी आणि उद्योजक यांना भविष्यासाठी आवश्यक असलेली डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यात मदत होईल; तसेच यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि सर्वसमावेशक विकासाला चालना मिळेल. एक स्वावलंबी IT परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि त्रिपुरातीमधील मनुष्यबळाला त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने, एका जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपनीसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."
त्रिपुरा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक जया राहुल गेशन B. IFS म्हणाले, "त्रिपुरामध्ये दरवर्षी तरुण प्रतिभेची मोठी फळी तयार होत असते; या प्रतिभेला जागतिक पातळीवर उपयुक्त ठरेल अशा कौशल्यांशी जोडणे हे आमचे प्राधान्य आहे. सेल्सफोर्ससोबतच्या भागीदारीमुळे आम्हाला TIDEZ, IT पार्क आणि AI सेंटर ऑफ एक्सलन्समधील आमच्या गुंतवणुकीला कौशल्य विकासाची जोड देणे शक्य झाले आहे; यामुळे आमची कार्यशक्ती उद्योगांसाठी अधिक दृश्यमान आणि मौल्यवान ठरेल."
सेल्सफोर्स - दक्षिण आशियाच्या अध्यक्षा आणि CEO अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, "भारताच्या डिजिटल विकासाची पुढील लाट देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवान लोकांच्या माध्यमातून आकाराला येईल. डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच कौशल्य विकासावर त्रिपुराने दिलेला भर, या विकासाला सर्वसमावेशक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ट्रेलहेडच्या माध्यमातून, व्यावहारिक शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी मदत करतानाच; वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक अशा क्षमता विकसित करणाऱ्या विद्यार्थी, सरकारी कर्मचारी आणि उद्योजकांना पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो."
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें