सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी ची भारतात विक्री सुरू

कॅशबॅक ऑफर्स आणि झिरो डाऊन-पेमेंट योजना उपलब्ध 

मुंबई। सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए२७ ५जी स्मार्टफोनची विक्री सुरू झाल्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन आता सॅमसंग आऊटलेट्स, भागीदार स्टोअर्स, सॅमसंग डॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन लाइट ग्रीन, लाइट पिंक व ब्लॅक या तीन रंगांमध्ये आणि तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून, या सर्व मॉडेल्सवर ३,००० रुपयांचा 'मल्टी-बँक आणि यूपीआई कॅशबॅक' ऑफर दिला जात आहे. या ऑफरनंतर, फोनच्या सुरुवातीच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची नेट इफेक्टिव्ह प्राईस २८,९९९ रुपये आहे. त्याचा दुसरा व्हेरियंट ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज सह येतो, ज्याची नेट इफेक्टिव्ह प्राईस ३१,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, या सिरीजमधील सर्वात टॉप व्हेरियंट ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफरनंतर ३७,४९९ रुपये या नेट इफेक्टिव्ह प्राईसवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ६.७ इंच, १२० हर्ट्झ सुपर एएमओएईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला कॉर्निंग®️ गोरिला®️ ग्लास व्हिक्टस®️+ चे संरक्षण आहे. सुरळीत मल्टिटास्किंग आणि गेमिंगसाठी हा स्मार्टफोन ४एनएम स्नॅपड्रॅगन®️ ६ जेन ३ मोबाईल प्लॅटफॉर्मसह यूएफएस ३.१ स्टोरेज आणि एलपीडीडीआर५एक्स रॅमने सुसज्ज आहे.

या स्मार्टफोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ४के रेकॉर्डिंग आणि ओआयएस सपोर्ट असलेला ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरा, ५ मेगापिक्‍सल अल्ट्रावाईड लेन्स आणि २ मेगापिक्‍सल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. या कॅमेऱ्याला ऑब्जेक्ट इरेझर, एडिट सजेशन्स आणि माय फिल्टर सारख्या एआय टूल्सचा सपोर्ट आहे. उच्च दर्जाचे व्हिडिओ कॉल्स आणि पोर्ट्रेट्ससाठी या स्मार्टफोनमध्‍ये १२ मेगापिक्‍सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये सर्कल टू सर्च विथ गुगल, २२ भाषांमध्ये रिअल-टाइम वॉइस ट्रान्सक्रिप्शन आणि गुगल जेमिनी व परप्लेक्सिटी देखील आहे. तसेच, बिक्‍स्‍बीमुळे वापरकर्ते नैसर्गिक भाषेत बोलून डिवाईस सेटिंग्स नियंत्रित करू शकतात, तर लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमधील कॉल्सना सपोर्ट करते.

गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जेथे सहा वर्षांचे अँड्रॉइड ओएस आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. तसेच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्‍ये सॅमसंग नॉक्स उपलब्ध आहे. सॅमसंग वॉलेटमुळे टॅप अँड पे, यूपीआय पेमेंट आणि डिजिटल आयडी सुरक्षितपणे स्टोअर करणे सोपे होते

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...