सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सोमानी सिरॅमिक्स’कडून नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण

मुंबई। जगातील १२ वी सर्वांत मोठी टाइल्स उत्पादक आणि भारतातील टाइल्स, बाथवेअर; तसेच होम अँड बिल्डिंग सोल्युशन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड’ने आपल्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले आहे. घराच्या आणि इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व गरजा एकाच छताखाली पूर्ण करणारे केंद्र म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

ही नवीन ओळख ‘सोमानी’चा गेल्या पाच दशकांतील प्रवास अधोरेखित करते. केवळ टाइल्स उत्पादक ते आधुनिक जीवनशैलीला आकार देणारा ब्रँड असा हा वेगवान बदल आहे. कंपनीचा विस्तारत असलेला पोर्टफोलिओ लक्षात घेऊन हा नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. ‘हा नवीन ब्रँड आमच्या ५५ वर्षांच्या प्रवासातील एक निर्णायक क्षण आहे. हे आमची नावीन्यपूर्ण वृत्ती, शाश्वतता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. आम्ही आजवर कमावलेला विश्वास, ताकद आणि व्याप्ती या नवीन ओळखीमध्ये सामावलेली आहे. याशिवाय पुढच्या पिढीचे नेतृत्व कंपनीला पुढे नेण्यासाठी सज्ज होत असताना, ही नवी ओळख आमची भविष्यातील दिशा अधिक स्पष्ट करते,’ अशी माहिती ‘सोमानी सिरॅमिक्स’चे एमडी आणि सीईओ अभिषेक सोमानी यांनी दिली.

नवीन लोगोमध्ये आधुनिक जागेतील प्रवाहीपणा दर्शवण्यासाठी मृदू आणि वळणदार रेषांचा (कर्व्ह) वापर करण्यात आला आहे. हा लोगो आता अधिक लवचीक आणि वास्तुशिल्पीय स्वरूपात सादर झाला आहे. लोगोमधील गडद लाल रंग ऊर्जा आणि व्याप्ती दर्शवतो. निळ्या रंगाचा बाण प्रगतीची दिशा आणि वेग दर्शवतो. ही रंगसंगती आत्मविश्वासपूर्ण आणि आधुनिक आहे. नवीन ब्रँड ओळखीनुसार ‘सोमानी’ या शब्दातील प्रत्येक अक्षराला विशेष अर्थ देण्यात आला आहे. स्केल, ओरिजिनॅलिटी, मोमेंटम, अशुरन्स, न्यू हॉरीझॉन्स आणि यंग.

ही नवीन ब्रँड ओळख आता रिटेल स्टोअर, पॅकेजिंग, जाहिराती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वत्र कार्यान्वित केली जाईल. त्यामुळे ग्राहकांसह वास्तुविशारद आणि डिझायनर्सना दर्जेदार अनुभव मिळेल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वाति अप्सरा राय तिच्या कठोर परिश्रम, प्रतिभा आणि समर्पणाच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण करत आहे

स्वाति अप्सरा राय ही एक प्रतिभावान मॉडेल, इन्फ्लुएन्सर आणि नृत्यांगना आहे, जी आता अभिनय विश्वात आपली ओळख निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे आणि इंस्टाग्रामवर तिचा एक मोठा आणि वेगाने वाढणारा चाहतावर्ग आहे. तिचे अनेक रील्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यांना लाखो व्ह्यूज आणि प्रशंसा मिळाली आहे. मॉडेलिंग व्यतिरिक्त, स्वातिने अनेक प्रतिष्ठित ब्रँड्ससाठी ब्रायडल शूट्स, ज्वेलरी मोहिमा आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिचे मनमोहक व्यक्तिमत्व, आकर्षक रूप, उत्कृष्ट नृत्यकौशल्य, प्रभावी हावभाव आणि साधी शैली तिला गर्दीत वेगळे ठरवते. तिच्या फॅशन सेन्स आणि शैलीचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जाते आणि अनेकजण तिला फॅशन आयकॉन मानतात. लहानपणापासूनच, स्वाति तिच्या मनमोहक व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी उपस्थितीमुळे जिथे कुठे जाते तिथे नेहमीच लक्ष वेधून घेते. तिला नेहमीच कलेची, विशेषतः नृत्याची आवड होती. तिच्याकडे नृत्याची नैसर्गिक प्रतिभा आहे आणि ती कोणतीही नृत्याची स्टेप किंवा हावभाव फक्त पाहून सहजपणे शिकू शकते. शालेय जीवनात, तिने सांस्कृतिक ...

मुनज़्जा सबुवाला ही करीना कपूर आणि कतरिना कैफ यांच्यापासून प्रेरित आहे

मॉडेल ते अभिनेत्री अशी वेगाने प्रगती करणारी मुनज़्जा सबुवाला लवकरच अनेक नवीन आणि मनोरंजक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. ती लवकरच रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. मुनज़्जाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि तिच्या संपूर्ण प्रवासात नेहमीच स्वावलंबनाला प्राधान्य दिले. तिच्या सुरुवातीच्या काळात, तिने तिच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळण्याचे काम केले. तिच्या कमाईचा वापर करून, तिने तिचे फोटोशूट वापरले आणि स्वतःचा पोर्टफोलिओ तयार केला. या आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने तिला पुढे नेले. यानंतर, मुनज़्जाने मॉडेलिंग असाइनमेंट, रॅम्प वॉक, प्रिंट शूट आणि जाहिरात मोहिमांमध्ये सतत काम केले. तिने मिस पुणे ही पदवी जिंकली आणि तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तिने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक प्रतिष्ठित मॉडेलिंग शोमध्ये भाग घेतला, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मॉडेलिंग उद्योगात मजबूत उपस्थिती निर्माण केल्यानंतर, ती आता एक अभिनेत्री म्हणून एका नवीन आणि श...

"मेरे कृष्ण" हे नाटक भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख प्रकरणांचा उलगडा करेल

मुंबई। "मेरे कृष्ण" - भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य प्रवासाचे चित्रण करणारा एक भव्य रंगमंच - सादर केला जाईल. या नाटकात भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत सौरभ राज जैन, राधा आणि महामायाच्या भूमिकेत पूजा बी. शर्मा आणि दुर्योधन आणि कंसाच्या भूमिकेत अर्पित रांका आहेत. हे नाटक राजीव सिंह दिनकर यांनी दिग्दर्शित केले आहे आणि विवेक गुप्ता, राजीव सिंह दिनकर आणि विष्णू पाटील यांनी निर्मिती केली आहे. हे नाटक डॉ. नरेश कात्यायन यांनी लिहिले आहे आणि मूळ संगीत उद्धव ओझा यांनी दिले आहे. २ तास ४५ मिनिटांच्या धावण्याच्या वेळेसह, "मेरे कृष्ण" हा एक तल्लीन करणारा नाट्य अनुभव आहे जो तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील दैवी, मानवी आणि तात्विक पैलूंमधून प्रवास करायला घेऊन जातो. हे नाटक भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख प्रकरणांचे चित्रण करणाऱ्या २० जीवंत दृश्यांमधून उलगडते - वृंदावनातील बालपणापासून ते द्वारकेतील त्यांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत. कालातीत तत्वज्ञानावर आधारित असले तरी, त्याची कथानक शैली मनोरंजक, दृश्यदृष्ट्या समृद्ध आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी आहे - नाट्य, संगीत,...