सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते.

५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल.

अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते. ७६,०६९ चौरस फूट (ज्यापैकी ४१,६४० चौरस फूट क्षेत्र आच्छादित आहे) जागेवर पसरलेले हे अत्याधुनिक वर्कशॉप उच्‍च कार्यक्षमता आणि जलद सेवेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये ५७ सर्व्हिस बे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये धुणे आणि साफसफाईसाठीच्या ८ स्वतंत्र विभागांचा समावेश आहे. तसेच, वाहनांच्या सुलभ हालचालीसाठी १०० पार्किंग बे तयार करण्यात आले आहेत. ९० प्रशिक्षित व्यावसायिकांच्या टीमसह हे केंद्र वार्षिक ४०,००० वाहनांची सर्व्हिसिंग करण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे या क्षेत्रातील ग्राहकांसाठी सेवा अधिक सुलभ होणार आहे.

वेस्ट कोस्ट किया हा देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा, तसेच अहमदाबाद, गांधीनगर व हिंमतनगरमध्ये प्रबळ उपस्थिती असलेला कियाचा भारतातील तिसरा सर्वात मोठा डीलर समूह आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ग्वांगु ली म्हणाले, "आमच्या ५०० व्या सर्व्हिस वर्कशॉपचे उद्घाटन हा अभिमानास्पद टप्पा आहे, ज्‍यामधून आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो. ही उपलब्धी फक्त नेटवर्कच्या विस्तारापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक किया ग्राहकाला त्यांच्या कार मालकीच्या प्रवासात सोयीस्कर सेवा, पारदर्शकता आणि विश्वासाचा अनुभव मिळेल याची खात्री देणारी आहे. आम्ही आमच्या नेटवर्कचा विस्तार करत असताना आमचे भविष्यासाठी सज्ज, शाश्वत आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विक्रीपश्चात्त परिसंस्‍था प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित आहे."

किया इंडियाने आता ३९१ शहरांमध्ये ८०० सेवा केंद्रांपर्यंत (मोबाईल टचपॉईंट्ससह) आपली उपस्थिती वाढवली आहे, हे देशातील सर्वात व्यापक विक्रीपश्चात्त नेटवर्क बनले आहे. ५००व्या वर्कशॉपच्या या टप्प्यामुळे कियाची उपस्थिती विशेषतः अशा बाजारपेठांमध्ये अधिक मजबूत झाली आहे, जिथे आधी ब्रँडचे प्रतिनिधीत्व नव्हते, ज्यामुळे हा ब्रँड ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

सलग चार वेळा ९ थरांची सलामी देत बाल गोपाल गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

कांजूरमार्ग पूर्वच्या बाल गोपाल गोविंदा पथकाचा दहीहंडी उत्सवात डंका; ईशान्य मुंबईत अभिमानाची कामगिरी मुंबई : दहीहंडी उत्सवातील थरार, साहस आणि गोविंदांच्या जिद्दीचे दर्शन घडवत बाल गोपाल गोविंदा पथक, कांजूरमार्ग पूर्व यांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात या पथकाने तब्बल चार वेळा ९ थरांची मानवी मनोरा रचना यशस्वीपणे साकारत आपल्या शिस्तबद्ध आणि दमदार कामगिरीची छाप उमटवली. विशेष म्हणजे, विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवात बाल गोपाल गोविंदा पथकाने ९ थरांची रचना करत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. पहिल्या प्रयत्नात मोहन चिराठ, नाहूर, दुसऱ्या प्रयत्नात राधा फाउंडेशन, चेंबूर, तिसऱ्या प्रयत्नात विक्रोली, कन्नमवार नगर येथे ९ थर यशस्वीरीत्या रचण्यात आले. तर चौथ्या वेळी कांजूरमार्ग पूर्व येथे ९ थरांचा मनोरा रचना साकारत पथकाने आपल्या कामगिरीवर कळस चढवला. या ऐतिहासिक यशामागे पथकातील गोविंदांची अथक मेहनत, नियमित सराव, शिस्त, एकजूट आणि परस्परांवरील विश्वास यांचा मोठा वाटा आहे. पथकाला कोच राजू लाखन बाबू पाटणकर आणि कोच विनोद वांगणे यांचे मोलाचे मार्ग...