सीधे मुख्य सामग्री पर जाएं

विजय सेल्सकडून शाओमी टीव्‍ही एस मिनी एलईडी सिरीजसाठी प्री-ऑर्डर सुरू

मुंबई। विजय सेल्‍स या भारतातील अग्रगण्य ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेनने नवीन लाँच झालेल्या शाओमी टीव्‍ही एस मिनी एलईडी सिरीजसाठी प्री-ऑर्डर सुरू करण्याची घोषणा केली आहे. ग्राहक या सिरीजसाठी विजय सेल्सची वेबसाइट विजय सेल्सडॉटकॉमवर आणि देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये बुकिंग करू शकतात.

भारतातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आपल्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करत विजय सेल्स ब्रँड शाओमीचा विशेष रिटेल सहयोगी बनला आहे. या सहयोगांतर्गत ज्या शहरांमध्ये विजय सेल्सची प्रत्यक्ष स्टोअर्स आहेत, तिथे नवीन एस मिनी एलईडी टेलिव्हिजन सिरीज लाँच केली जाणार आहे. ग्राहक आता फक्त २,००० रुपयांमध्ये विजय सेल्स डॉटकॉम या वेबसाइटवर किंवा विजय सेल्‍सच्‍या कोणत्याही स्टोअरमध्ये जाऊन २१ एप्रिल २०२६ पर्यंत हा टीव्ही प्री-बुक करू शकतात.

हे लाँच विजय सेल्स आणि शाओमी यांच्यामधील सातत्‍यपूर्ण सहयोगाचा भाग आहे, जे ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम मूल्य प्रदान करण्याच्या समान उद्दिष्टावर आधारलेले आहे. नवीन एस‍ मिनी एलईडी श्रेणीसाठी अर्ली अॅक्‍सेस उपलब्ध करून देऊन विजय सेल्सने अद्ययावत ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी आपले पसंतीचे ठिकाण म्हणून स्थान अधिक दृढ केले आहे.

या विशेष लाँचला अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी प्री-बुक केलेल्या सर्व युनिट्सवर ४ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी दिली जात आहे. ही वॉरंटी नेहमीच्या २ वर्षांच्या कव्हरेजसह येते आणि सुरुवातीच्या ग्राहकांसाठी दीर्घकालीन चिंतामुक्त अनुभवाची खात्री देते. २१ एप्रिल रोजी प्री-बुकिंगची मुदत संपल्यानंतर एकूण वॉरंटी कव्हरेज पुन्हा ३ वर्षांचे होईल.

शाओमी टीव्‍ही एस मिनी एलईडी सिरीजमध्‍ये प्रगत डिस्प्ले तंत्रज्ञान आहे, जे घरगुती मनोरंजनाचा अनुभव अधिक दर्जेदार बनवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. अधिक ब्राइटनेस, गडद कॉन्ट्रास्ट आणि अचूक रंगसंगती निर्मितीमुळे ही सिरीज प्रेक्षकांना अधिक तल्लीन करणारा आणि अद्वितीय व्‍युईंग अनुभव देते. १३८ सेमी (५५ इंच), १६५ सेमी (६५ इंच) आणि १८९ सेमी (७५ इंच) अशा विविध स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध असलेली ही सिरीज ग्राहकांच्या विविध गरजा आणि आवडीनिवडी पूर्ण करते.

या घोषणेबाबत मत व्‍यक्त करत विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्‍ता म्हणाले "विजय सेल्समध्ये आम्‍ही नेहमी ग्राहकांना नवीनतम आणि सर्वात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शाओमीसोबत आमच्‍या सातत्‍यपूर्ण सहयोगामधून भारतातील बाजारपेठेत उच्‍च-गुणवत्तेची आणि भविष्यासाठी सज्ज उत्पादने पोहोचवण्याप्रती आमची समान कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला नवीन एस मिनी एलईडी टीव्ही लाइनअप ग्राहकांसाठी सादर करताना आणि आमच्या ओम्नी-चॅनेल नेटवर्कच्‍या माध्‍यमातून त्यांना हा टीव्ही खरेदीची प्रथम संधी उपलब्ध करून देताना  आनंद होत आहे."

शाओमी टीव्‍ही एस मिनी एलईडी सिरीजची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे नेक्स्ट-जनरेशन तंत्रज्ञान, ज्यामध्ये १२०० निट्सपर्यंतचा उत्कृष्ट ब्राइटनेस आणि अचूक लोकल डिमिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे अधिक गडद ब्लॅक्स आणि प्रभावी कॉन्ट्रास्टचा अनुभव मिळतो. ४के अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनसह डॉल्बी व्हिजन, एचडीआर१०+ आणि फिल्ममेकर मोडमुळे सिनेमॅटिक व्हिज्युअल्सचा अनुभव अधिक समृद्ध होतो, ज्यामुळे चित्रपट दिग्दर्शकाच्या अपेक्षेनुसार अचूक स्वरूपात पाहता येतात. साऊंडच्या बाबतीत, डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस:एक्ससह सुसज्ज ३४ वॅटची क्वाड-स्पीकर प्रणाली संपूर्ण खोलीत ३डी सराउंड साऊंडचा अनुभव देते. युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीसाठी एअरप्ले २, गुगल कास्ट आणि मिराकास्टचा सपोर्ट देण्यात आला असून, त्यामुळे कंटेंट सहजपणे कास्ट करता येतो. याशिवाय, गेमिंग प्रेमींसाठी डीएलजी १२० हर्ट्झ (ड्युअल लाइन गेट) तंत्रज्ञान, एमईएमसी आणि ऑटो लो लेटन्सी मोड (एएलएलएम) यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यामुळे अधिक स्मूथ आणि खंडित न होणारा गेमिंग अनुभव मिळतो.

ही सिरीज आकर्षक लाँच किमतीत सादर करण्यात आली असून कोटक, एचडीएफसी, एसबीआय आणि अॅक्सिस बँक कार्ड्सवर १०,००० रुपयांपर्यंतच्या त्वरित बँक कॅशबॅकचा लाभ दिला जात आहे. अंतिम खरेदीच्या वेळी हा कॅशबॅक लागू होईल, ज्यामुळे १३८ सेमी (५५ इंच) मॉडेलची प्रभावी किंमत ४८,९९९ रुपये, १६५ सेमी (६५ इंच) मॉडेलची ६६,९९९ रुपये आणि १८९ सेमी (७५ इंच) मॉडेलची ८९,९९९ रुपये इतकी राहील. प्री-ऑर्डर टप्प्यानंतर ही सिरीज Vijay Sales च्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये तसेच त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे देशभरातील ग्राहकांना ती सहजपणे खरेदी करता येईल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल

८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग मुंबई: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन ब्रँड्स व कलेक्शन्स उपलब्ध असतील. यासोबतच २१,००० उदयोन्मुख ब्रँड्स आणि लेबल्स सहभागी होत असून, त्यापैकी १३,००० ब्रँड्स प्रथमच बीएफएफमध्ये सहभागी होत आहेत. मिन्त्राच्या प्रमुख शेरॉन पैस म्हणाल्या, “बिग फॅशन फेस्टिव्हल हा भारताच्या उत्सवी कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला आहे. प्रादेशिक विक्रेते आणि लघुउद्योगांना सक्षम करण्यापासून ते जागतिक आणि भारतीय फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड्समधील सर्वोत्तम उत्पादने लाखो घरांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तो संपूर्ण इकोसिस्टमला जोडतो. एआय आणि विस्तारित डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने आम्ही ८० दशलक्षांहून अधिक ग्राहकांसाठी फॅशन अधिक सुलभ, वैयक्तिकृत आणि अखंड बनवत आहोत.” यंदाच्या बीएफएफमध्ये पुरुष व महिलांचे एथनिक वेअर, पुरुषांचे कॅज्युअल वेअर, महिला...

झेन डायमंड रेडियंट रिफ्लेक्शन्स

सादर केले करवा चौथ स्पेशल झेन डायमंड कलेक्शन मुंबई: प्रेम, समर्पण आणि आयुष्यभराची सोबत यांचा सण करवा चौथ, यंदा नैसर्गिक हिऱ्यांसह अधिक चमकदार बनवा. संध्याकाळी चंद्राचे दर्शन आणि उपवास सोडण्याच्या पवित्र क्षणी हिऱ्यांचे सदाबहार तेज तुमचा आनंद अधिक संस्मरणीय बनवेल. झेन डायमंड इंडिया या खास क्षणासाठी निवडलेले शानदार डायमंड ज्वेलरी कलेक्शन घेऊन आले आहे. तुमच्या जीवनसाथीसाठी प्रेमाची सुंदर भेट द्यायची असो किंवा तुम्हाला तुमचा करवा चौथ लुक सर्वात वेगळा आणि खास बनवायचा असेल - ही अद्वितीय डिझाइन्स तुमचा आनंद द्विगुणित करतील. प्रेमाचे अतूट बंधन आणि आयुष्यभराच्या वचनांचे प्रतीक, हा क्लासिक बँड अस्सल सॉलिटेयर हिऱ्यांच्या अद्वितीय चमकेने सजला आहे. करवा चौथला अंगठीचे खूप खास आणि भावनिक महत्त्व असते. हा सुंदर बँड तुमच्या लग्नातील अंगठीला एक आधुनिक आणि शानदार अपग्रेड देण्यासाठी परफेक्ट आहे. हा तुम्हाला त्या वचनांची आठवण करून देत राहील, जी या पवित्र रात्रीच्या चंद्राप्रमाणे कायम चमकत राहतील. रोज गोल्ड, यलो गोल्ड आणि व्हाईट गोल्डमध्ये उपलब्ध असलेली ही शानदार स्प्लिट-बँड सॉलिटेयर रिंग अतिशय...

ब्लॅक ओपल कन्सल्टंट्सचे बीएसई एसएमईवर यशस्वी पदार्पण

मुंबई। ब्लॅक ओपल कन्सल्टंट्स लिमिटेडच्या शेअर्सनी बीएसई एसएमई मंचावर यशस्वी पदार्पण केल्यानंतर मोठी तेजी नोंदवली. कंपनीचे शेअर्स २१० रुपयांच्या पातळीवर पोहोचून अप्पर सर्किटवर बंद झाले. २१० रुपयांच्या या भावावर कंपनीचा शेअर आपल्या १९७ रुपयांच्या या मूळ आयपीओ इश्यू किमतीपेक्षा ६.६०% वर व्यवहार करत होता. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात २०० रुपयांच्या भावावर झाली, जी इश्यू किमतीपेक्षा १.५२% अधिक होती. त्यानंतर संपूर्ण सत्रादरम्यान शेअर्समध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळाली. कंपनीचा एकूण ५५.०८ रुपये कोटींचा आयपीओ होता. यामध्ये ४४.०९ कोटी रुपये मूल्याच्या २२.३८ लाख शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि १०.९९ कोटी रुपये मूल्याच्या ५.५८ लाख शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश होता. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खुला असलेल्या या आयपीओसाठी प्रति शेअर १८५ रुपये ते १९७ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम इश्यू किंमत प्रति शेअर १९७ रुपये निश्चित करण्यात आली, ज्यामध्ये एका लॉटमध्ये ६० किंवा अधिक शेअर्स (६०० शेअर्सचा लॉट आकार) समाविष्ट होते. या...