सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंग इंडियाचा हायब इंडियासोबत सहयोग

मुंबई। सॅमसंग इंडियाचा 'शो देम हाऊ इट्स डन #विथगॅलॅक्सी' उपक्रम हायब इंडियासोबत सहयोगाने प्रतिभावान मुलींना ऑडिशन्‍सच्‍या माध्‍यमातून त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सक्षम करत आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून, सॅमसंग इंडिया १० शहरांमध्ये गॅलेक्सी ऑडिशन स्टुडिओज लाँच करणार आहे. या अंतर्गत निवडक सॅमसंग एक्सपिरियन्स स्टोअर्सचे रूपांतर ऑडिशन आणि कंटेंट निर्मितीच्या केंद्रांमध्ये केले जाईल. या स्टुडिओंमध्ये प्रत्येक शहरातील ऑडिशनच्या पहिल्या दिवशी नामांकित क्रिएटर्सच्या मार्गदर्शनाखाली मास्टरक्लासेस आयोजित केले जातील, ज्‍यामुळे सहभागी मुलींना सादरीकरण करण्यास, नवनवीन कंटेंट तयार करण्यास आणि त्यांच्या यशोगाथा जगासमोर मांडण्यास प्रेरणा मिळेल.

"या उपक्रमाच्या केंद्रस्थानी एक साधा पण महत्त्वाचा विश्वास आहे, तो म्हणजे भारतातील प्रत्येक तरुणीमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास असायला हवा आणि तिला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळायला पाहिजे. हायब इंडियासोबत आमचा सहयोग प्रगतीसाठी सज्ज असलेल्या पिढीला अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देऊन हा विश्वास सत्यात उतरवण्याप्रती कटिबद्धता आहे," असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्‍स बिझनेसचे उपाध्यक्ष आदित्य बब्बर म्हणाले.

प्रमुख शहरांमध्ये गॅलेक्सी ऑडिशन स्टुडिओज आणि क्रिएटर्सच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या वर्कशॉप्सपैकी मुंबईतील सॅमसंग बीकेसी स्टोअर येथे मास्टरक्लास २ मेपासून सुरू होऊन १० मेपर्यंत चालणार आहे. तर पुण्यातील सॅमसंग एक्सपिरियन्स स्टोअर, फिनिक्स मार्केटसिटी येथे ही वर्कशॉप्स ९ मेपासून सुरू होऊन १७ मेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा भाग म्हणून, सॅमसंग इंडिया सहा मोठ्या शहरांमधील हायब इंडियाच्या सर्व पॉप-अप पार्क्समध्ये #विथगॅलॅक्सी एक्‍सपिरियन्‍स झोन्‍स सुरू करणार आहे. या पार्क्सची सुरुवात २ मे रोजी गुवाहाटी येथून होणार आहे. अधिकाधिक व्‍यक्तींनी कंटेंट शेअर करावा, वापरकर्त्यांनी स्वतः कंटेंट तयार करावेत आणि अभ्यागतांना गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने हे पार्क्‍स डिझाइन करण्‍यात आले आहेत.

या मोहिमेत #wविथगॅलॅक्सी एस२६ अल्ट्राच्‍या माध्‍यमातून चित्रित केलेल्‍या तीन जाहिरातींचा देखील समावेश आहे. या जाहिराती हायब इंडियासोबत सहयोगाने क्रिएट करण्‍यात आल्‍या आहेत, त्यामध्ये सहभागी स्पर्धकांचा अंतिम ऑडिशनपर्यंतचा प्रवास टिपण्यात आला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आरती मित्तल ही आज मनोरंजन विश्वातील एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे

मुंबई। दिल्लीतील प्रतिभावान अभिनेत्री आरती मित्तल आपल्या मेहनतीने, शिस्तीने आणि प्रभावी अभिनयाने मनोरंजन विश्वात सातत्याने नवनवीन उंची गाठत आहे. अभिनयाप्रती तिची निष्ठा, प्रत्येक पात्राला सहजतेने जिवंत करण्याची तिची क्षमता आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची तिची इच्छा, यांमुळे तिचे नाव उदयोन्मुख प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये निश्चितपणे गणले जाते. आरतीने आपल्या अभिनय कारकिर्दीचा पाया रंगभूमीवर घातला, जिथे तिने अभिनयातील बारकावे शिकले आणि आपल्या कलेला सतत अधिक निखारले. त्यानंतर तिने हरियाणवी आणि पंजाबी म्युझिक व्हिडिओंमधून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या एका पंजाबी गाण्याला एफएम रेडिओवर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामुळे तिला सुरुवातीची ओळख मिळाली. तेव्हापासून तिने मॉडेलिंग, जाहिराती आणि अभिनय क्षेत्रात आपले स्थान सातत्याने निर्माण केले आहे. आरतीने 'विराग' या लघुपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती 'अमृतजल' आणि 'हाऊस ऑफ प्लॉटर्स' यांसारख्या प्रतिष्ठित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसली. तिच्या एका आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मोहिमेचे पोस्टर...

बोरिवलीत स्काय-सिटी मॉलमध्ये 'क्रोमा' झाला दाखल

मुंबई महानगर क्षेत्रात क्रोमाची एकूण ५४ आणि संपूर्ण महाराष्ट्रात १०५ स्टोअर्स झाली मुंबई। टाटा ग्रुपच्या 'क्रोमा' या ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल कंपनीने मुंबईतील बोरिवली येथील स्कायसिटी मॉलमध्ये आपले नवीन स्टोअर सुरू करून महाराष्ट्रातील आपल्या रिटेल विस्ताराला अधिक गती दिली आहे. या नवीन स्टोअरसह आता मुंबई महानगर क्षेत्रात क्रोमाची एकूण ५४ स्टोअर्स आणि संपूर्ण महाराष्ट्रात १०५ स्टोअर्स झाली आहेत. मुंबईतील ग्राहकांना उत्कृष्ट ओम्नी-चॅनेल शॉपिंगचा अनुभव देणे आणि या अत्यंत महत्त्वाच्या बाजारपेठेत ब्रँडची पकड अधिक मजबूत करणे, हा या लॉन्चचा मुख्य उद्देश आहे. बोरिवली येथील स्कायसिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर (युनिट नंबर एफ-२७ आणि एफ-२८) असलेले हे प्रीमियम स्टोअर ७,०७५ स्क्वेअर फूटचे आहे. बोरिवली आणि आसपासच्या परिसरातील नागरिक येथे सहज पोहोचू शकतात. या स्टोअरमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विस्तृत रेंज उपलब्ध आहे. मोठी उपकरणे, स्मार्टफोन आणि घरगुती वापराची तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करू शकतात. यासोबतच ग्राहकांसाठी आकर्षक लॉन्च ऑफर्सही उपलब्ध आहेत. मयंक संगानी, चीफ बिझनेस ...

डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल मध्ये दुर्मिळ अशा दुहेरी नेत्र शस्त्रक्रियेनंतर नवी मुंबईतील 62 वर्षीय व्यक्तीला दृष्टिदान

• खोल कॉर्नियल स्कार असलेल्या परिपक्व मोतीबिंदूवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पिनहोल प्युपिलोप्लास्टी या एकत्रित उपचारानंतर रुग्णाच्या दृष्टीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. • डॉ. अमर अग्रवाल यांनी विकसित केलेल्या पिनहोल प्युपिलोप्लास्टीमुळे, पात्र रुग्णांमध्ये कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्याचबरोबर दृष्टीसाठी उत्कृष्ट परिणामही मिळाले आहेत. नवी मुंबई। नवी मुंबईतील वाशी येथील 62 वर्षीय रहिवासी सुभाष विष्णू चाचे यांना 'डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटल मध्ये एका दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या दुहेरी शस्त्रक्रियेनंतर दृष्टी परत मिळाली आहे. सुभाष यांच्या डाव्या डोळ्यात पूर्णपणे विकसित झालेला मोतीबिंदू आणि कॉर्नियावर (बुबुळाच्या बाह्य आवरणावरील) खोल व्रण होता; ही एक दुर्मिळ आणि आव्हानात्मक स्थिती होती, ज्यामुळे जवळपास त्यांची दृष्टी गेलेली होती. रुग्णालयाच्या वडाळा येथील केंद्रातील नेत्रतज्ज्ञांच्या पथकाने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसोबतच पिनहोल प्युपिलोप्लास्टी (PPP) ही प्रक्रिया करून त्यांची दृष्टी यशस्वीरित्या पूर्ववत केली आहे. सुभाष चाचे यांची दृष्टी अनेक ...