सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारतीय फार्मा क्षेत्रात रे निओ फार्माचे पदार्पण

९०+ फॉर्म्युलेशन्ससह फार्मा क्षेत्रात दमदार एंट्री 

मुंबई। रे निओ फार्मा या नेक्‍स्‍ट-जनेरशन फार्मास्‍युटिकल कंपनीने भारतातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अधिकृतपणे आपल्या कार्याचा शुभारंभ केला आहे. स्थिर व विस्तारक्षम कार्यप्रणालीवर आधारित आणि पाच दशकांहून अधिक काळ विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजकतेचा वारसा लाभलेली रे निओ फार्मा अॅक्युट आणि स्पेशलाइज्ड थेरपी विभागांमध्ये ९० पेक्षा जास्त औषध प्रकार सादर करणार आहे. तसेच, अनेक नाविन्यपूर्ण औषधे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहेत.

प्रसिद्ध उद्योजक अमित पटनी यांनी रे निओ फार्माची स्थापना केली आहे. पटनी कॉम्प्युटर्सच्या निर्मितीमागे असलेला समृद्ध कौटुंबिक वारसा आणि उत्पादन, आरोग्य पायाभूत सुविधा, ऊर्जा व आर्थिक क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अमित पटनी यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी विज्ञान, नैतिक मूल्ये आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांचाचे अद्वितीय संयोजन भारतातील उदयोन्मुख औषध निर्मिती क्षेत्रात घेऊन येत आहे.

रे निओ फार्मा अँटीबायोटिक्स, मधुमेहविरोधी औषधे, गॅस्‍ट्रो-इंटेस्टिनल उत्पादने, वेदना व ऑर्थोपेडिक व्यवस्थापन, एलर्जी व श्वसन विकार, हृदयविकार, त्वचाविकार, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स यांसह इतर अनेक व्यापक उपचार क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान करते. कंपनी सामान्य आणि विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या अचूक फॉर्म्युलेशन्ससह ब्रँडेड जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच या औषधांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता यावर विशेष भर आहे.

बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्‍ली-एनसीआर, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा, तेलंगणा व आंध्रप्रदेश यांसारख्या दाट लोकवस्तीच्या व प्रभावशाली राज्यांमध्ये रे निओ फार्माचे प्रबळ जाळे पसरलेले आहे. या राज्यांच्या माध्यमातून कंपनी भारतातील जवळपास ५५-६० टक्‍के व्‍यक्तींपर्यंत पोहोचत आहे, तसेच समुदायांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देत आहे. ९९६७०५३९४५

रे निओ फार्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्‍यांच्‍या नेतृत्वाला पारंपारिक औषधनिर्माण क्षेत्राबाहेरील लाभलेला दांडगा अनुभव. कंपनीच्या प्रवर्तकांना व संचालकांना आर्थिक, मीडिया, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, खासगी इक्विटी, उत्पादन आणि ऊर्जा यांसारख्या विविध क्षेत्रांतील ५० वर्षांहून अधिक काळाचा यशस्वी वारसा लाभला आहे. या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी, प्रशासन आणि नवनिर्मितीसाठी केला जात आहे.

"आम्ही औषधनिर्माण क्षेत्राकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहत नाही; तर आरोग्य सेवेच्या माध्यमातून शाश्वत विकास आणि राष्ट्र उभारणीच्या दिशेने केलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रे निओ फार्मामध्ये आम्हाला माहित आहे की, आरोग्यसेवेचे भविष्य शास्त्रीय आणि कार्यात्मक स्वरूपाचे असण्‍यासह मानवी मूल्यांशी खोलवर जोडलेले आहे. औषधे पोहोचवण्यापलीकडे जाऊन विश्वास निर्माण करणे, पारदर्शकता जपणे आणि आरोग्यसेवा परिसंस्थेतील प्रत्येक घटकाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करणे, याप्रती आम्‍ही कटिबद्ध आहोत," असे रे निओ फार्माचे संस्थापक अमित पटनी म्हणाले.

रे निओ फार्मा गतीमान व्यावसायिक मॉडेलवर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीचे स्वतःचे ब्रँडेड फॉर्म्युलेशन्स आणि आघाडीच्या उत्पादकांशी धोरणात्मक सहकार्य यांचा समावेश आहे. यामुळे गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची कठोर मानके राखत नाविन्यपूर्ण उपचार पद्धती सहज उपलब्ध करून देणे शक्य होते. कंपनीची चपळ कार्यप्रणाली आरोग्याच्या बदलत्या गरजांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा वापर, स्वदेशी संशोधन व विकासमधील गुंतवणूक आणि कुशल व्यावसायिक टीमच्या बळावर रे निओ फार्मा भारतातील डॉक्टर्स, आरोग्यसेवा प्रदाता आणि रुग्णांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे.

आपल्या क्षेत्रात सर्वात वेगाने विस्तारणारा फार्मास्‍युटिकल पोर्टफोलिओ आणि नैतिक व रुग्ण-हित प्रथम या तत्त्वांवर आधारित पाया यामुळे रे निओ फार्मा भारताच्या आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनामध्ये निर्णायक शक्ती बनण्यास सज्ज आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...