सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फेडएक्स-सीएसके सहकार्याचा दुसरा टप्पा; तीन डिजिटल फिल्म्सची मालिका सादर

मुंबई। फेडएक्स (फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन), जगातील अग्रगण्य एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी, हिने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत भागीदारी करत “फेडएक्स. द मूव्ह इंडिया नीड्स” या डिजिटल ब्रँड कॅम्पेनची घोषणा केली आहे. या कॅम्पेनअंतर्गत तीन डिजिटल फिल्म्स सादर करण्यात आल्या असून त्यामध्ये सीएसके चे स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी, रुतुराज गायकवाड आणि उर्विल पटेल प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. फेडएक्स–सीएसके सहकार्याचा हा सलग दुसरा वर्ष असून, मागील वर्षातील यशस्वी उपक्रमाचा विस्तार म्हणून हा कॅम्पेन पुढे नेण्यात आला आहे.

भारतामध्ये क्रिकेट हे केवळ खेळ नसून ते संस्कृती, व्यापार आणि समुदाय यांना जोडणारे प्रभावी माध्यम आहे. या पार्श्वभूमीवर “फेडएक्स. द मूव्ह इंडिया नीड्स” कॅम्पेन फेडएक्सकडून विविध व्यवसायांच्या गरजांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक ‘एंड-टू-एंड’ लॉजिस्टिक्स सोल्यूशन्सची प्रभावी मांडणी करते. क्रिकेटच्या संदर्भातून प्रेरणा घेत, या कॅम्पेनमध्ये फेडएक्सला ‘ऑल-राऊंडर’ म्हणून सादर करण्यात आले आहे—ज्यात चपळता, विश्वासार्हता आणि विशेष कौशल्य यांचा संगम आहे. ऑटोमोबाईल, हेल्थकेअर आणि प्रीमियम ई-कॉमर्ससारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये फेडएक्स व्यवसायांना अमेरिकाज, युरोप आणि आशियातील प्रमुख व्यापार मार्गांशी सहजपणे जोडण्यास सक्षम करते. सीएसके खेळाडूंच्या माध्यमातून हा कॅम्पेन भारतीय व्यवसायांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याची सुलभता अधोरेखित करतो.

फेडएक्स (एमइआयएसए क्षेत्र)चे मार्केटिंग, कस्टमर एक्स्पीरियन्स आणि एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत ताटीवाला म्हणाले, “फेडएक्स जटिल लॉजिस्टिक्स प्रक्रियांना सुलभ करण्यासाठी बांधील आहे, ज्यामुळे व्यवसायांना त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येते. चेन्नई सुपर किंग्ससोबतचे आमचे सातत्यपूर्ण सहकार्य या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. आमच्या सर्वसमावेशक उपाययोजनांद्वारे आम्ही वस्तूंची जलद, स्मार्ट आणि विश्वासार्ह हालचाल सुनिश्चित करतो, ज्यामुळे व्यवसाय अधिक चपळ आणि स्पर्धात्मक बनतात.”

चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. विश्वनाथन म्हणाले, “फेडएक्ससोबतची आमची भागीदारी दुसऱ्या वर्षीही पुढे चालू ठेवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘द मूव्ह इंडिया नीड्स’ हा कॅम्पेन प्रगती, सातत्य आणि पुढे जाण्याच्या भावनेचे प्रतीक आहे, जो आमच्या संघ आणि चाहत्यांशी दृढपणे जोडलेला आहे. आगामी हंगामांमध्ये या यशस्वी सहकार्याला अधिक बळ देण्याची आम्ही उत्सुकता बाळगतो.”

या डिजिटल फिल्म्स सोशल मीडिया तसेच विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित करण्यात आल्या असून, त्या देशभरातील क्रिकेटप्रेमी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि उद्योजकांपर्यंत पोहोचतील. इच्छुक प्रेक्षक या फिल्म्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...