सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाने किया कनेक्ट नूतनीकरणाचा १ लाखांचा टप्पा पार केला

मुंबई। किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने देशात १,००,००० हून अधिक पेड किया कनेक्ट नूतनीकरणाचा टप्पा ओलांडल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने कनेक्टेड कार सबस्क्रिप्शनच्या बाबतीत ३० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रिटेंशन (ग्राहक टिकवून ठेवण्याचे प्रमाण) नोंदवले आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून कियाच्या इंटेलिजेंट मोबिलिटी परिसंस्‍थेप्रती ग्राहकांचा वाढता कल आणि निरंतर सहभाग दिसून येतो. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या तीन वर्षांच्या मोफत सबस्क्रिप्शन कालावधीनंतरही ग्राहकांनी या सेवेला पसंती दिली आहे. जागतिक स्तरावर, कियाने जवळपास ९७ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नोंदणी दर राखला आहे, ज्‍यामधून ग्राहकांमध्‍ये कनेक्टेड तंत्रज्ञानाची वाढती गरज दिसून येते.

हे यश कियाच्या कनेक्टेड परिसंस्‍थेचे दीर्घकालीन मूल्य आणि ग्राहक निष्ठा अधोरेखित करते. नूतनीकरणाचा हा वाढता ओघ स्पष्ट बदलाचे संकेत देतो, ते म्‍हणजे ग्राहक आता केवळ सुरुवातीचा वापर न करता कनेक्टेड तंत्रज्ञानाला त्यांच्या दैनंदिन ड्रायव्हिंग अनुभवाचा अविभाज्य भाग बनवत आहेत.

या टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्त करत सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ''एक लाख किया कनेक्‍ट सबस्क्रिप्‍शन नूतनीकरणाचा टप्‍पा पार करण्‍यामधून ग्राहकांचा आमच्‍या कनेक्‍टेड मोबिलिटी परिसंस्‍थेवर वाढता विश्वास दिसून येतो. पूरक कालावधीव्‍यतिरिक्त सतत अवलंबनामधून आम्‍ही अधिक सोयीसुविधा, सुरक्षितता व नियंत्रणाच्‍या माध्‍यमातून देत असलेले दैनंदिन मूल्‍य निदर्शनास येते. आम्‍ही स्‍मार्ट, अधिक कनेक्‍टेड ड्रायव्हिंग अनुभवासाठी आमचे डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍स प्रगत करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.''

२०१९ मध्‍ये यूव्‍हीओ म्‍हणून लाँच करण्‍यात आलेला हा प्‍लॅटफॉर्म आता किया कनेक्‍ट म्‍हणून ओळखला जातो. यासह किया इंडिया देशातील कनेक्‍टेड कार उत्‍क्रांतीमध्ये अग्रस्‍थानी राहिली आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्‍लॅटफॉर्म विविध नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून अधिक विकसित झाला आहे, जसे स्‍मार्टवॉच कनेक्‍टीव्‍हीटी, वॉईस असिस्‍टण्‍ट इंटीग्रेशन (अॅलेक्‍सा), ओव्‍हर-द-एअर (ओटीए) अपेडट्स, सराऊंड व्‍ह्यू मॉनिटर (एसव्‍हीएम), किया कनेक्‍ट सबस्क्रिप्‍शन आणि नवीन किया कनेक्‍ट २.०. ही सर्व वैशिष्‍ट्ये सर्वसमावेशक व भविष्‍याकरिता सुसज्ज डिजिटल परिसंस्‍था देतात.

आज, किया कनेक्‍टने मुलभूत मालकीहक्‍कामध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांची भर करत परिवर्तन घडवून आणले आहे, जेथे नेव्हिगेशन, रिमोट कंट्रोल, कन्‍वीनियन्‍स, वेईकल मॅनेजमेंट आणि सेफ्टी अँड सिक्‍युरिटी या पाच प्रमुख आधारस्‍तंभांमध्‍ये १०० हून अधिक वैशिष्‍ट्ये देत आहे. प्रगत तंत्रज्ञान, जसे कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीट (सीसीएनसी), डिजिटल की, ओटीए सॉफ्टवेअर अपडेट्ससह किया रिमोट डायग्नोस्टिक्‍स, सराऊंड व्‍ह्यू मॉनिटरिंग आणि बहुभाषी वॉईस रेकग्निशन विनासायास, सुरक्षित आणि उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव देतात. 

नूतनीकरणाचा हा कल ग्राहकांना दररोज मिळणाऱ्या प्रत्यक्ष फायद्यांमुळे दिसून येत आहे. यामध्ये रिमोट वेईकल अॅक्सेस, रिअल-टाइम डायग्नोस्टिक्स, प्रगत सुरक्षा, प्रेडिक्टिव्ह अलर्ट्स आणि एकूण सोयीसुविधांचा समावेश आहे. या क्षमतांमुळे अधिक मन:शांती मिळते, तसेच किया कनेक्ट आधुनिक प्रवासाच्या गरजांसाठी अपरिहार्य साधन बनले आहे.

किया इंडिया शाश्वत ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देणारा उपक्रम ड्राइव्ह ग्रीन आणि किया इन्स्पायरिंग ड्राइव्ह (के.आय.डी.) सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करत आहे. हे उपक्रम खास अनुभवांच्या माध्यमातून ग्राहकांमधील ब्रँडबद्दलची ओढ आणि परस्पर संवाद वाढवण्यास मदत करतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल

८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग मुंबई: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन ब्रँड्स व कलेक्शन्स उपलब्ध असतील. यासोबतच २१,००० उदयोन्मुख ब्रँड्स आणि लेबल्स सहभागी होत असून, त्यापैकी १३,००० ब्रँड्स प्रथमच बीएफएफमध्ये सहभागी होत आहेत. मिन्त्राच्या प्रमुख शेरॉन पैस म्हणाल्या, “बिग फॅशन फेस्टिव्हल हा भारताच्या उत्सवी कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला आहे. प्रादेशिक विक्रेते आणि लघुउद्योगांना सक्षम करण्यापासून ते जागतिक आणि भारतीय फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड्समधील सर्वोत्तम उत्पादने लाखो घरांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तो संपूर्ण इकोसिस्टमला जोडतो. एआय आणि विस्तारित डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने आम्ही ८० दशलक्षांहून अधिक ग्राहकांसाठी फॅशन अधिक सुलभ, वैयक्तिकृत आणि अखंड बनवत आहोत.” यंदाच्या बीएफएफमध्ये पुरुष व महिलांचे एथनिक वेअर, पुरुषांचे कॅज्युअल वेअर, महिला...

झेन डायमंड रेडियंट रिफ्लेक्शन्स

सादर केले करवा चौथ स्पेशल झेन डायमंड कलेक्शन मुंबई: प्रेम, समर्पण आणि आयुष्यभराची सोबत यांचा सण करवा चौथ, यंदा नैसर्गिक हिऱ्यांसह अधिक चमकदार बनवा. संध्याकाळी चंद्राचे दर्शन आणि उपवास सोडण्याच्या पवित्र क्षणी हिऱ्यांचे सदाबहार तेज तुमचा आनंद अधिक संस्मरणीय बनवेल. झेन डायमंड इंडिया या खास क्षणासाठी निवडलेले शानदार डायमंड ज्वेलरी कलेक्शन घेऊन आले आहे. तुमच्या जीवनसाथीसाठी प्रेमाची सुंदर भेट द्यायची असो किंवा तुम्हाला तुमचा करवा चौथ लुक सर्वात वेगळा आणि खास बनवायचा असेल - ही अद्वितीय डिझाइन्स तुमचा आनंद द्विगुणित करतील. प्रेमाचे अतूट बंधन आणि आयुष्यभराच्या वचनांचे प्रतीक, हा क्लासिक बँड अस्सल सॉलिटेयर हिऱ्यांच्या अद्वितीय चमकेने सजला आहे. करवा चौथला अंगठीचे खूप खास आणि भावनिक महत्त्व असते. हा सुंदर बँड तुमच्या लग्नातील अंगठीला एक आधुनिक आणि शानदार अपग्रेड देण्यासाठी परफेक्ट आहे. हा तुम्हाला त्या वचनांची आठवण करून देत राहील, जी या पवित्र रात्रीच्या चंद्राप्रमाणे कायम चमकत राहतील. रोज गोल्ड, यलो गोल्ड आणि व्हाईट गोल्डमध्ये उपलब्ध असलेली ही शानदार स्प्लिट-बँड सॉलिटेयर रिंग अतिशय...

आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड ने लॉन्च केले आकाश इनव्हिक्टस - इंजिनियरिंग 2.0

मुंबई: आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड, जे भारतातील आघाडीच्या परीक्षा-तयारी प्रदात्यांपैकी एक आहे, त्यांनी आकाश इनव्हिक्टस-इंजिनियरिंग 2.0 द्वारे आपल्या अभियांत्रिकी तयारी परिसंस्थेला बळकट केल्याची घोषणा केली आहे. ही एक नवीन कामगिरी-चालित शैक्षणिक रचना आहे, जी जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स्ड आणि राज्य सीईटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुव्यवस्थित मार्ग तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. एक ३६०-अंश तयारीचा अनुभव, सहा स्तंभांवर आधारित विद्यार्थ्यांना वर्गात, त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या चाचण्यांमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक टप्प्यावर इनव्हिक्टसचा फरक जाणवेल. हा कार्यक्रम सहा स्तंभांवर उभा आहे: परिणाम-केंद्रित शैक्षणिक दृष्टिकोन: प्रत्येक वर्ग, सराव सत्र आणि उजळणी चक्र एका उद्देशाने नियोजित केले जाते — जेईई ॲडव्हान्स्ड, जेईई मेन, बिटसॅट आणि राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये सर्वोत्तम शक्य रँक मिळवणे. रँक-सिद्ध झालेली शिक्षक टीम: शिक्षक टीम ही आकाश इनव्हिक्टसची सर्वात मोठी ताकद आहे. हीच शैक्षणिक टीम आहे जिने इनव्हिक्टस अभ्यासक...