सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड ने लॉन्च केले आकाश इनव्हिक्टस - इंजिनियरिंग 2.0

मुंबई: आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड, जे भारतातील आघाडीच्या परीक्षा-तयारी प्रदात्यांपैकी एक आहे, त्यांनी आकाश इनव्हिक्टस-इंजिनियरिंग 2.0 द्वारे आपल्या अभियांत्रिकी तयारी परिसंस्थेला बळकट केल्याची घोषणा केली आहे. ही एक नवीन कामगिरी-चालित शैक्षणिक रचना आहे, जी जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स्ड आणि राज्य सीईटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुव्यवस्थित मार्ग तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
एक ३६०-अंश तयारीचा अनुभव, सहा स्तंभांवर आधारित
विद्यार्थ्यांना वर्गात, त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या चाचण्यांमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक टप्प्यावर इनव्हिक्टसचा फरक जाणवेल. हा कार्यक्रम सहा स्तंभांवर उभा आहे:
परिणाम-केंद्रित शैक्षणिक दृष्टिकोन: प्रत्येक वर्ग, सराव सत्र आणि उजळणी चक्र एका उद्देशाने नियोजित केले जाते — जेईई ॲडव्हान्स्ड, जेईई मेन, बिटसॅट आणि राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये सर्वोत्तम शक्य रँक मिळवणे.
रँक-सिद्ध झालेली शिक्षक टीम: शिक्षक टीम ही आकाश इनव्हिक्टसची सर्वात मोठी ताकद आहे. हीच शैक्षणिक टीम आहे जिने इनव्हिक्टस अभ्यासक्रम, पुस्तके आणि चाचणी यंत्रणा उंचावली आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या रचलेले आणि संशोधन-आधारित अभ्यास साहित्य: या शैक्षणिक टीमने शिक्षण-शास्त्र आणि परीक्षा पद्धतींवरील सखोल संशोधनाचा वापर करून पुस्तके पुन्हा लिहिली आहेत, जी विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पनांपासून ते सर्वात कठीण प्रश्नांपर्यंत टप्प्याटप्प्याने घेऊन जातात.
बुद्धिमान चाचणी. सखोल विश्लेषण: चाचणीची वारंवारता, खोली आणि कठोरता यासह पूर्णपणे पुनर्रचित चाचणी यंत्रणा, जिथे प्रत्येक चाचणी विद्यार्थ्याला त्यांची ताकद, त्रुटी आणि सुधारणा करण्याच्या नेमक्या क्षेत्रांचे स्पष्ट चित्र देते.
एक पारदर्शक प्रगती नकाशा: विद्यार्थी आणि पालक आज विद्यार्थी कुठे उभा आहे आणि त्यांना जिथे पोहोचायचे आहे तिथपर्यंतचा मार्ग स्पष्टपणे पाहू शकतात.
 वर्गाच्या पलीकडे मार्गदर्शन आणि परिसंस्था: जोसा (JoSSA) समुपदेशन मार्गदर्शन, शंका निरसन सहाय्य आणि वर्गाच्या वेळेच्या पलीकडेही विद्यार्थ्यासोबत राहणारे मार्गदर्शन यासह सतत मार्गदर्शन, जेणेकरून कोणताही विद्यार्थी मागे राहणार नाही.
राष्ट्रीय लॉन्चसोबत, आकाश इनव्हिक्टसने चार केंद्रित बॅचेस देखील सादर केल्या आहेत -- एस, अचीव्हर, अॅक्सेलरेटर आणि अपेक्स. प्रत्येकी समान सामर्थ्याचा मार्ग आहे, जो विद्यार्थी सर्वोत्तम कसा शिकतो आणि त्यांच्या आकांक्षेभोवती आकारला गेला आहे. चारही बॅचेसचा उद्देश एकच आहे: प्रत्येक विद्यार्थी तणावमुक्त पद्धतीने आपल्या कमाल क्षमतेपर्यंत पोहोचावा याची खात्री करणे.

लॉन्चप्रसंगी बोलताना, चंद्र शेखर रेड्डी गरिसा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), म्हणाले: "आकाश इनव्हिक्टस-इंजिनियरिंग 2.0 आमच्या टॉप शिक्षकांनी घडवला आहे — ज्यांना वर्षानुवर्षे टॉप रँक देण्याचा दशकांचा अनुभव आहे. त्यांनी आमचा अभ्यासक्रम नव्याने उभा केला, पुस्तके पुन्हा लिहिली आणि चाचणी प्रणाली पूर्णपणे नव्याने डिझाइन केली. आम्ही हा प्रोग्राम सुरुवातीला काही निवडक केंद्रांवर चालवला, आणि जेईई 2026 चे निकाल भन्नाट आले. आता आम्ही आकाश इनव्हिक्टस भारतातील प्रत्येक आकाश शाखेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत घेऊन जात आहोत — सुरुवात आमच्या सध्याच्या विद्यार्थ्यांपासून. आमचा विश्वास आहे की ही प्रणाली आमच्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्ड, जेईई मेन, बिटसॅट आणि राज्य अभियांत्रिकी परीक्षांमध्ये त्यांची बेस्ट शक्य रँक मिळवून देईल, आणि आम्हाला खात्री आहे की जेईई 2027 आणि 2028 हे आकाशच्या इतिहासातले सर्वोत्तम निकाल असतील. कारण शेवटी, 'उत्कृष्टता फक्त काहींसाठीच का असावी?'"

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...

ऑडिओच्या पलीकडे झेप घेणार 'boAt'; नवीन श्रेणी आणि परदेशी बाजारपेठांवर देणार भर

मुंबई। ऑडिओ आणि वेअरेबल्स क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी भारतीय कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ' boAt' (बोट) आता आपल्या वाढीच्या (ग्रोथ) पुढील टप्प्यासाठी नवीन कन्झ्युमर टेक श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी प्रोजेक्टर्स, पर्सनल ग्रूमिंग, चार्जिंग सोल्यूशन्स आणि एंटरटेनमेंट व लाइफस्टाइल तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या अस्तित्वाचा विस्तार करत आहे. कंपनी या पुढील टप्प्याकडे ‘boAt 2.0’ म्हणून पाहत आहे. या अंतर्गत ऑडिओ हा boAt च्या व्यवसायाचा मुख्य पाया राहील, तर नवीन श्रेणी आणि जागतिक बाजारपेठांना भविष्यातील वाढीचे प्रमुख इंजिन म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाईल. 'boAt 2.0' साठी कंपनी सज्ज: boAt चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नायर यांनी सांगितले की, "आता आमचा भर पुनर्लाभाकडून (टर्नअराउंड) शाश्वत वाढीकडे आहे. भक्कम ताळेबंद (बॅलन्स शीट), कार्यक्षम शिस्त आणि मजबूत मूळ व्यवसायाच्या जोरावर आम्ही 'boAt 2.0' साठी सज्ज होत आहोत." त्यांनी पुढे नमूद केले की, "आम्ही ऑडिओ व्यवसायातील आमचे अग्रस...