मुंबई। सॅमसंगने जाहीर केले की, त्यांची गॅलेक्सी टॅब एस१२ सिरीज ७ ऑक्टोबरपासून भारतात उपलब्ध होईल. ग्रे आणि सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध असणारे गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रा आणि टॅब एस१२+ अत्यंत सडपातळ डिझाइनमध्ये अभूतपूर्व कार्यक्षमता, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि नवीनतम गॅलेक्सी एआय यांची सांगड घालत सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वाधिक सक्षम आणि वैविध्यपूर्ण टॅब्लेट अनुभव देतात.
गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रा आणि टॅब एस१२+ मध्ये १६०० निट्सपर्यंत पीक ब्राईटनेससह विस्तृत डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, या टॅब्जमधील व्हिजन बूस्टर वैशिष्ट्य कोणत्याही प्रकाशात सुस्पष्ट दृश्ये आणि व्युईंगचा सुलभ अनुभव देण्यासाठी ब्राईटनेस रिअल-टाइममध्ये समायोजित करते.
१४.६-इंच अल्ट्रा आणि १२.६-इंच प्लस मॉडेलसह, वापरकर्ते विनासायास मल्टीटास्किंगसाठी मल्टी विंडो लेआऊटद्वारे स्क्रीनचे तीन भागांमध्ये विभाजन करू शकतात. उदाहरणार्थ, वापरकर्ते एकाच वेळी लेक्चर स्ट्रीम करत असताना आणि एआय असिस्टंटचा वापर करत असताना सॅमसंग नोट्समध्ये नोट्स लिहू शकतात.
गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्राची सुरुवातीची किंमत १,४९,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ ची सुरुवातीची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रासाठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २७,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ साठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २६,४९९ रुपये आहे.
दोन्ही मॉडेल्स - वाय-फाय आणि ५जी व्हेरिएंट्स, ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी किंवा ५१२ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत - ७ ऑक्टोबरपासून सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, पार्टनर स्टोअर्स, सॅमसंग डॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होतील.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें