सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाकडून नवीन किया सिरॉस एमवाय२६ लाँच

स्‍पोर्टी व शक्तिशाली फ्रण्‍ट आणि रिअर डिझाइन 

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने किया सिरॉस मॉडेल इअर २०२६ (एमवाय२६)च्‍या लाँचची घोषणा केली आहे. ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजा व अभिप्रायानुसार नवीन एचटीई, एचटीई(ओ), एचटीके+(ओ) आणि एचटीएक्‍स(ओ) ट्रिम्‍ससह मॉडेल श्रेणीचा विस्‍तार केला आहे. ८३९,९०० रूपयांपासून सुरू होणारी सिरॉस एमवाय२६ खरेदी करणे सोपे झाले आहे, तसेच या वेईकलचे मूल्‍य-केंद्रित स्‍थान अधिक दृढ झाले आहे. नवीन डिझेल ऑटोमॅटिक ट्रिम्‍ससह ऑटोमॅटिक पर्यायांच्‍या व्‍यापक उपलब्‍धतेमुळे श्रेणीमध्‍ये अधिक पर्याय उपलब्‍ध झाले आहेत. संपूर्ण श्रेणीमध्‍ये प्रबळ ट्रिम धोरण, सुधारित वैशिष्‍ट्य वितरण आणि अधिक वैशिष्‍ट्यपूर्ण एसयूव्‍ही अपीलसह स्‍पोर्टी व शक्तिशाली फ्रण्‍ट आणि रिअर डिझाइन सुधारणांसह नवीन सिरॉस उत्तम, अधिक अर्थपूर्ण मूल्‍य देते. तसेच एैसपैस जागा, प्रीमियम इंटीरिअर्स आणि प्रबळ सुरक्षितता ही मुलभूत वैशिष्‍ट्ये कायम ठेवण्‍यात आली आहेत.

''ग्राहकांच्‍या अभिप्रायांमधून सिरॉस एमवाय२६ च्या उत्क्रांतीला दिशा दिली आहे. डिझाइनमधील सुधारणा आणि सुधारित ट्रिम व फीचर लाइनअपद्वारे आम्ही अधिक अर्थपूर्ण मूल्य आणि पॉवरट्रेनचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सिरॉसला लाँच झाल्यापासून ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मोठी मान्यता मिळाली असून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. हे नवीन अपडेट ग्राहकांच्या मोठ्या वर्गासाठी तिचे आकर्षण अधिक वाढवेल. प्रीमियम सुविधा अधिक सुलभ करणे, उत्तम केबिन स्पेस आणि शहरात चालवण्यासाठी लागणारी चपळता यांचा मेळ घालणे, हे कियाच्या ग्राहक-प्रथम कल्पकतेचे उदाहरण आहे. आम्ही ग्राहकांना त्यांच्या जवळच्या किया डीलरशिपला भेट देऊन सिरॉस एमवाय२६ चा अनुभव घेण्याचे आवाहन करतो," असे सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले.

किया सिरॉस उच्‍च मालकीहक्‍क अनुभव देणाऱ्या वैशिष्‍ट्यांनी युक्त आहे. या वेईकलमध्‍ये ७६.२ सेमी (३० इंच) ट्रिनिटी पॅनोरामिक डिस्प्ले पॅनल - कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपीट, ड्युअल-पेन पॅनोरामिक सनरूफ, स्ट्रीमलाइन डोअर हँडल्स, पुढील व मागील बाजूस हवेशीर आसनव्‍यवस्‍था यांचा समावेश आहे. तसेच६०:४० स्प्लिटसह दुसऱ्या रांगेतील सीट रिक्लाईन व स्लाईड), २० रोबस्ट हाय-स्टँडर्ड सेफ्टी पॅकेज आणि बीएनसीएपी ५-स्टार रेटिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. ८० पेक्षा जास्त कनेक्टेड कार वैशिष्‍ट्ये, ओटीए अपडेट्स आणि किया कनेक्ट डायग्नोस्टिक्समुळे ग्राहकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होतो.

ग्राहकांच्या बदलत्या पसंतीनुसार रस्त्यावर अधिक प्रभावी उपस्थिती दाखवण्‍यासाठी सिरॉस एमवाय२६ मध्ये आता स्पोर्टी व शक्तिशाली फ्रंट बंपर देण्यात आला आहे. यामध्ये बॉडी-कलर्ड एरो इन्सर्ट्स, ग्लॉसी ब्लॅक स्किड प्लेट्स आणि एलईडी फॉग लॅम्प्सचा समावेश आहे. कारची मागील बाजू अधिक आकर्षक करण्यासाठी एलईडी हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि बॉडी-कलर एरो इन्सर्ट्स असलेला नवीन बंपर बसवण्यात आला आहे.

कारची बाजूची प्रोफाइल अधिक प्रबळ करण्यासाठी सिरॉसमध्‍ये आता ग्लॉसी ब्लॅक रूफ रेल्स, ओआरव्‍हीएम आणि बॉडी-कलर्ड साइड गार्निश देण्यात आले आहेत. हे सर्व बदल किया सिरॉसचे लुक व प्रीमियम मूल्य वाढवतात. एचटीएक्‍स व एचटीएक्‍स(ओ) आता नवीन आर१७ - ४३.६६ सेमी (१७ इंच) स्‍पोर्टी क्रिस्‍टल कट अलॉई व्‍हील डिझाइन, निऑन रंगाचे ब्रेक कॅलिपर्ससह येतात. व्हिज्‍युअल उपस्थिती अधिक दृढ करत सिरॉस एमवाय२६ नवीन रंग पर्यायांसह मॅग्‍मा रेड, आयव्‍हरी सिल्‍व्‍हर मॅट आणि आयव्‍हरी सिल्‍व्‍हर ग्‍लॉस या रंगांमध्‍ये येते.

नवीन अपडेट्स आणि शक्तिशाली व्‍हेरिएण्‍ट लाइन-अपसह प्रमुख वैशिष्‍ट्ये आता किफायतशीर दरांमध्‍ये उपलब्‍ध आहेत. यामुळे सिरॉसचे उत्‍साहवर्धक केबिन अनुभव, एैसपैस जागा आणि फाइव्‍ह-स्‍टार बीएनसीएपी सेफ्टी रेटिंग ही मूळ वैशिष्ट्ये कायम ठेवत प्रीमियम वैशिष्‍ट्ये सर्वांसाठी सुलभ झाली आहेत. डिझेल ऑटोमॅटिक व्‍हेरिएण्‍ट आत एचटीके+ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्‍यासह डिझेल पॉवरट्रेन्‍समध्‍ये सोयीसुविधेसंदर्भात ग्राहकांच्‍या प्रमुख गरजेची पूर्तता करण्‍यात आली आहे आणि सोयीसुविधा व स्थिरता वाढवण्‍यात आल्‍या आहेत. या वेईकलची किंमत १,२७३,९०० रूपये आहे.

सुसंगत आकार असलेली किया सिरॉस शहरातील वाहतुकीमध्‍ये चालवण्यासाठी अत्यंत सोपी आहे. महत्त्वाचे म्हणजे, सुसंगत आकार असूनही इंटीरिअर आणि प्रवाशांच्या आरामात कोणतीही तडजोड केलेली नाही. उत्तम राइड दर्जा, प्रशस्तपणा आणि उपयुक्तता यांमुळे ग्राहकांनी या कारला पसंती दिली आहे. सिरॉस ही दीर्घकालीन फॅमिली कॉम्‍पनियन (कौटुंबिक सोबती) म्हणून समोर आली आहे.

सुधारित उपलब्‍धता, विस्‍तारित पर्याय आणि प्रबळ मूल्‍य वितरणासह सिरॉस एमवाय२६ने अधिक अर्थपूर्ण मूल्‍यासह  विचारशील, ग्राहक-केंद्रित नाविन्‍यता देण्‍याप्रती कियाची कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती

मुंबई: नवी मुंबईस्थित एफएमसीजी कंपनी मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, भारतातील प्रसिद्ध शेफ, पाककला तज्ज्ञ आणि रेस्टॉरेंटर शेफ हरपाल सिंह सोखी हे कंपनीसोबत इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जोडले गेले आहेत. ते कंपनीच्या प्रमुख ब्रँड इंची (Inchi)चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही काम पाहणार आहेत. 2017 मध्ये स्थापन झालेल्या आणि निखिल भारती, आर. पी. चटर्जी आणि मनीष पार्डीवाला यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंचीने अल्पावधीतच इंडो-चायनीज सेगमेंटमध्ये लोकप्रिय घरगुती ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ब्रँडकडे 100 हून अधिक उत्पादनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. यामध्ये शेजवान डिप आणि स्प्रेड्स, नूडल्स, सॉसेस, गॉरमे आणि इन्स्टंट सूप्स तसेच खास कुकिंग मसाल्यांचा समावेश आहे. या उत्पादनांमुळे घरच्या घरी रेस्टॉरंटसारख्या इंडो-चायनीज पदार्थांची चव सहज अनुभवता येते. या धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर निखिल भारती म्हणाले, “उत्पादनांची मोठी आणि ग्राहकांना आवडणारी...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...