सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाची मे महिन्यामध्‍ये २७,५८६ युनिट्सच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वोच्च विक्रीची नोंद

वार्षिक आधारावर २३.६ टक्‍के वाढ 

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आपल्या स्थापनेपासून मे महिन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च विक्री जाहीर केली आहे. मे २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या २२,३१५ वाहनांच्या तुलनेत यंदा मे महिन्यात २७,५८६ युनिट्सची घाऊक विक्री झाली आहे, ज्‍यामध्‍ये वार्षिक आधारावर २३.६ टक्‍के वाढ नोंदवण्यात आली आहे. या प्रबळ कामगिरीमधून कियाच्या उत्पादनांना असलेली ग्राहकांची शाश्वत मागणी आणि भारतामधील बाजारपेठेतील ब्रँडचा सातत्यपूर्ण वेग दिसून येतो.

२०२६ मध्ये आपला प्रबळ वाढीचा टप्पा कायम राखत किया इंडियाने या वर्षात आतापर्यंत (वायटीडी) १३९,१९७ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. २०२५ मधील याच कालावधीतील १२१,५१४ युनिट्सच्या तुलनेत १४.६ टक्‍के वाढ झाली आहे. कियाचा प्रीमियम, तंत्रज्ञानावर आधारित आणि भविष्यासाठी सज्ज गतीशीलता सोल्यूशन्स देण्यावरील भर आणि ब्रँडच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओला ग्राहकांकडून मिळणारी सातत्यपूर्ण मागणी यामुळे हा वेग कायम राहिला आहे.

या कामगिरीबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे सीनियर व्हाईस-प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले, “आमच्‍या मे महिन्यातील आतापर्यंतच्‍या सर्वोच्च विक्री कामगिरीमधून ग्राहकांच्या बदलत्या पसंतीनुसार आमच्या विविध श्रेणीतील उत्पादनांची असलेली मजबूत पकड दिसून येते. नवीन सेल्टोस आणि सोनेटला मिळणारी सातत्यपूर्ण मागणी, तसेच कॅरेन्‍स क्लॅव्हिस, क्लॅव्हिस ईव्ही आणि एमवाय२६ सिरॉसला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद यामुळे आम्हाला आमचा वाढीचा वेग कायम ठेवण्यास मदत झाली आहे. तसेच, आमच्या बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) प्रोग्रामसारखे अलीकडील उपक्रम ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक गतीशीलता अधिक सुलभ आणि व्यावहारिक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्ही देशभरात आमची उपस्थिती अधिक दृढ करत असताना भारतातील ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अनुरूप अशी नाविन्यपूर्ण उत्पादने, प्रीमियम मालकीचा अनुभव आणि तंत्रज्ञान प्रदान करण्यावर आमचा भर कायम आहे.”

या महिन्यातील मजबूत कामगिरीचे नेतृत्व नवीन सेल्टोसने केले, जिने जानेवारीमध्ये लाँच झाल्यापासून प्रत्येक महिन्याला १०,००० पेक्षा जास्त युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडून आपला प्रबळ वाढीचा वेग कायम ठेवला आहे. या वेईकलची आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि बेंचमार्क सेट करणारी ५-स्टार बीएनसीएपी रेटिंग, जी भारतातील आजपर्यंतची सर्वाधिक स्कोअर करणारी आयसीई वेईकल आहे, यामुळे प्रीमियम फॅमिली एसयूव्ही म्हणून या वेईकलचे स्थान अधिक दृढ झाले आहे. सोनेटने कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये आपले मुख्य योगदान कायम ठेवले आहे, ज्याला पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट्समधील विस्तीर्ण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांद्वारे अधिक सुलभतेचा लाभ मिळाला आहे. विशेषतः नवीन व्हेरिएंट स्ट्रॅटेजी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची वाढलेली उपलब्धता आणि अधिक प्रबळ एकूण मूल्य प्रस्तावासाठी एमवाय२६ किया सिरॉसला देखील  ग्राहकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.

किया इंडियाच्या फॅमिली मूव्हर पोर्टफोलिओला अधिक मजबूत करत कॅरेन्‍स क्लॅव्हिस व क्लॅव्हिस ईव्ही प्रगत वैशिष्ट्ये आणि वैविध्‍यपूर्ण आसन व्यवस्थेसह एक व्यावहारिक गतीशीलता सोल्यूशन शोधत असलेल्या ग्राहकांमध्ये सातत्याने पसंती मिळवत आहेत. किया इंडियाच्या बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) प्रोग्रामच्या सादरीकरणाने इलेक्ट्रिक गतीशीलतेमधील सुरुवातीचे अडथळे कमी करून आणि ग्राहकांची सोय वाढवून कंपनीच्या ईव्ही धोरणाला अधिक पूरक बनवले आहे.

४०२ शहरांमध्ये पसरलेल्या ८९१ टचपॉइंट्ससह किया इंडियाचे देशभरातील मजबूत नेटवर्क, शहरी आणि उदयोन्मुख दोन्ही बाजारपेठांमध्ये ग्राहकांसाठी विक्री, सर्व्हिस आणि मालकीच्या सपोर्टसाठी ब्रँडची उपलब्धता वाढवते. यामध्ये आणखी भर घालत कंपनीचे १३० सर्टिफाइड प्री-ओन्ड आउटलेट्स कार्यरत आहेत, जे ग्राहकांसाठी त्वरित पेमेंट, विनासायास एक्सचेंज आणि त्रासमुक्त मालकीचा अनुभव सक्षम करतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल ७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात महोत्सव मुंबई। आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील 'आर्ट डेको'च्या प्रवासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (शताब्दी) मियामी आणि मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्याच ट्विन-सिटी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 'आर्ट डेको अलाइव्ह'च्या संस्थापक स्मिति कनोडिया आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संचालक तसनीम मेहता उपस्थित होत्या. ऑक्टोबरमध्ये मियामीत 'आर्ट डेको अलाइव्ह!'चा महोत्सव पार पडला होता. आता यानंतर मुंबईत या महोत्सवाची पहिली आवृत्ती ७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणी पार पडणार आहे.  राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार म्हणाले, ''आर्ट डेको अलाइव्ह! आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रह...

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनानिमित्त 'बोट'च्या नव्या शॉर्ट फिल्ममध्ये अरबाज खानचा मजेशीर अंदाज

मुंबई। येत्या २८ ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड ' बोट' (boAt) ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'ब्लिंकिट' (Blinkit) आणि प्रसिद्ध अभिनेते-निर्माते अरबाज खान यांच्या सहकार्याने एका नव्या डिजिटल मोहिमेची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर सध्या या शॉर्ट फिल्मची जोरदार चर्चा सुरू असून, एका मजेशीर उपरोधाद्वारे प्रेक्षकांना "एक सर्वोत्तम भाऊ कसा असावा?" याचा विचार करायला लावला आहे. मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमधील मजेशीर डिजिटल फिल्म : मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आलेल्या या डिजिटल फिल्ममध्ये अरबाज खान हातात माइक घेऊन बॉलिवूडच्या 'ऑल-टाईम फेव्हरेट भाई' बनण्याच्या स्टाइलचे पृथक्करण करताना दिसतो. रात्री १ वाजताचे ट्विट्स, ठरवून मारलेले डायलॉग्स, आणि हिरोसारखा रुबाब दाखवणे म्हणजे प्रेम नव्हे, हे तो आपल्या खास शैलीत सांगतो. स्वतः अरबाजने ही भूमिका साकारल्यामुळे हा विनोद अधिकच रंगतो. बॉलिवूडमधील 'युनिव्हर्सल भाई' या प्रतिमेवर भाष्य करत जेव्हा अरबाज कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो, "मी भाईचा भ...

लोणावळ्यात अमावी सोबत सुरु केले 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज'

ताजचे लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पदार्पण मुंबई । भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे ' ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड 'अमावी' च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा ...