सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आयटेल अॅक्‍वा फक्त १,७९९ रूपयांमध्ये लॉन्च

भारतातील आयपी६७ रेटिंग असलेला एकमेव फीचर फोन 

मुंबई। आयटेल या भारतासाठी तंत्रज्ञान सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या नवीन डिवाईसच्‍या लाँचसह सर्वत्र धूमाकूळ निर्माण केली आहे. भारतातील आपल्या टिकाऊ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या उत्पादनांच्या श्रेणीसाठी प्रसिद्ध असलेल्या आयटेलने भारतातील आयपी६७ रेटिंग* असलेला एकमेव फीचर फोन अॅक्‍वा लाँच केला आहे. आयटेल अॅक्‍वा कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जिथे सामान्य फीचर फोन्स निकामी होतात. आयपी६७ जलरोधक व धूळरोधक संरक्षणामुळे आयटेल अॅक्‍वा कोणत्याही नुकसानाशिवाय ३० मिनिटांपर्यंत पाण्यात बुडूनही सुरक्षित राहू शकतो आणि चिखल किंवा ओल्या वातावरणातही उत्तम कार्यरत राहतो. यासोबत, अॅक्‍वाने भारतातील फीचर फोन्समध्ये आणखी एक पहिलेच तंत्रज्ञान सादर केले आहे, ते म्‍हणजे एआय एन्व्हायरनमेंटल नॉईज कॅन्सलेशन (ईएनसी). हे तंत्रज्ञान बांधकाम साइट्स, बाजारपेठा, कारखाने आणि सामान्य ट्रॅफिकसारख्या गर्दीच्या ठिकाणांमधील पार्श्वभूमीचा गोंगाट दूर करते; ज्यामुळे वापरकर्त्‍याला आणि दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीला कोणत्याही अतिरिक्त आवाजाशिवाय एकमेकांचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येते. हा अॅक्‍वा फोन निळा, लाल आणि काळा या अत्यंत स्टायलिश रंगांमध्ये उपलब्ध असून आता देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये फक्त १,७९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

हे नवीन लाँच आयटेलने भारतात सुरू केलेल्या नवीन इन्नो सिरीजचा भाग आहे. आधुनिक वापरकर्त्‍यांच्‍या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली इन्नो सिरीज दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि कार्यक्षम बनवण्यासाठी टिकाऊपणा, सोयीसुविधा आणि व्यावहारिक नाविन्‍यता एकत्र आणते. टिकाऊपणा, सुविधा आणि दैनंदिन सुलभतेवर लक्ष केंद्रित करणारी ही इन्नो सिरीज मुलभूत संवादाच्या पलीकडे जाऊन वापरकर्त्‍यांचे जीवन सुकर करणारे उपाय प्रदान करते. या सिरीजमधील प्रत्येक डिवाईस वापरकर्त्‍याचा अनुभव वाढवण्यासाठी आणि ग्राहकांच्या अपेक्षांना नव्‍या उंचीवर नेण्‍यासाठी उद्देशपूर्ण नाविन्‍यता सादर करतो. फीचर फोन वापरकर्त्‍यांमध्ये आयटेलने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात दिसून आले आहे की, फोन खराब होण्यामागे पाण्यामुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण (४२ टक्‍के) होते. ग्राहकांच्या याच समस्येचा अभ्यास करून आयटेल अॅक्‍वा विकसित करण्यात आला आहे, जो अनपेक्षितपणे पाण्यात पडल्यास उत्तम संरक्षण देतो आणि भारतभरातील लाखो वापरकर्त्‍यांना भेडसावणारी ही मोठी समस्या दूर करतो.

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजित तालापात्रा म्हणाले, “नाविन्‍यता हे इंजिन आहे, जे तंत्रज्ञानाला प्रासंगिक ठेवते. आमची नवीन इन्नो सिरीज सादर करणे हे आयटेलला भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण टेक ब्रँड बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. भारताला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या डिझाइनसह आयटेल अॅक्‍वा हा भारताच्या वैविध्यपूर्ण हवामानाचा विचार करून डिझाइन करण्यात आला आहे, मग तो किनारपट्टीच्या भागातील दमट आणि पावसाळी हवामान असो किंवा वाळवंटातील कोरडे आणि धुळीचे हवामान असो. लाखो भारतीयांना भेडसावणाऱ्या एका सामान्य समस्येचे निराकरण करून, आयटेल अॅक्‍वा दैनंदिन अनुभव समृद्ध करणाऱ्या आणि फीचर फोन श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या अर्थपूर्ण नाविन्‍यता आणण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला सादर करतो.”

भारतातातील डिवाईस मार्केटमधील टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमतीची वाढती भूमिका या विषयावरील नवीन सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर) अहवालाने आयटेलची सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, ज्यामध्ये फीचर फोनमध्ये ०.६५ आणि स्मार्टफोनमध्ये ०.८६ गुणांसह आयटेलने या सेगमेंटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे. याव्यतिरिक्त, ८५ टक्‍के ग्राहकांना वाटते की त्यांना पैशांचे पूर्ण मूल्य मिळते, ८१ टक्‍के ग्राहक आयटेलला मजबूती आणि टिकाऊपणाशी जोडतात, ७९ टक्‍के ग्राहक ब्रँडच्या डिझाइनचे कौतुक करतात, तर ७४ टक्‍के ग्राहक आयटेलला विश्वासार्ह आणि खात्रीशीर ब्रँड मानतात.

अॅक्‍वा हा घराबाहेर आणि कठीण परिस्थितीत सातत्याने वापरण्यासाठी डिझाइन केलेला सर्वांगीण डिवाईस आहे. २.४-इंचाचा मोठा डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रेकॉर्डिंगसह वायरलेस एफएम रेडिओ, ६० कॉल लॉग्स आणि ३२ जीबीपर्यंत वाढवता येणारी स्टोरेज क्षमता असलेल्या या फोनमध्ये मजबूत टिकाऊपणासोबत अनेक उत्तम वैशिष्ट्यांचे संयोजन आहे. या फोनमध्ये १,२०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याच्या व्यावहारिक डिझाइनमध्ये आणखी भर घालते ते म्हणजे याला असलेला टाइप-सी चार्जिंग सपोर्ट, ज्यामुळे ग्राहकांना हा फोन वापरणे अधिक सोयीचे होते. या वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या फोनमध्ये किंग व्हॉईस हे द्विभाषिक व्हॉईस असिस्टन्स वैशिष्‍ट्य देखील आहे, जे इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये लहान मेसेज, मेनू प्रॉम्प्ट्स आणि कॉलची माहिती वाचून दाखवते. तसेच, आयटेल अॅक्‍वा १० प्रादेशिक भाषांना सपोर्ट करतो, ज्यामुळे वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीच्या वापरकर्त्‍यांना दररोज हा फिचर फोन सहजपणे वापरता येतो.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार  मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...

आयटेलने लॉन्च केला 'सिटी ३०० ५जी' स्मार्टफोन

परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दमदार बॅटरी परफॉर्मन्स  मुंबई: भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेल ने आयटेल सिटी ३०० ५जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. तरुण आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा स्मार्टफोन १४,९९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे. परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दिवसभर साथ देणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्सपासून मुक्त सॉफ्टवेअरचा अनुभव देण्याचा सिटी ३०० ५जी चा प्रयत्न आहे. सिटी ३०० ५जी मध्ये १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं अधिक सहज आणि प्रतिसादक्षम होतं. टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसरमुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेला इंटरफेस यामुळे फोन वापरण्याचा अनुभव स्वच्छ, सोपा आणि त्रासमुक्त राहतो. त्यामुळे फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा स्मार्ट...