सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अभिनेत्री करीना कपूर खान ‘नुवा’चा चेहरा म्हणून कायम

मलाबार तर्फे नॅचरल डायमंड दागिन्यांचा संग्रह ‘नुवा’ सादर

मुंबई। मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने ‘नुवा’ (NUWA) हा ‘नुवा’ नॅचरल डायमंड दागिन्यांचा संग्रह सादर केला आहे. निसर्गात आढळणाऱ्या गुंतागुंतीच्या रचना, पोत आणि सूक्ष्म तपशीलांपासून प्रेरणा घेऊन हा संग्रह साकारण्यात आला आहे. निसर्गाच्या दृष्टीकोनातून आधुनिक वैभवाचा उत्सव म्हणून संकल्पित करण्यात आलेल्या ‘नुवा’मध्ये अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या निसर्गातील बारकाव्यांमधून प्रेरणा घेण्यात आली आहे. पट्ट्यांची आकर्षक लय, मधपोळ्यांची रचना, तसेच धरतीच्या सर्जनशील स्पर्शातून घडलेल्या प्रवाही आकार रचना आणि नैसर्गिक नमुन्यांमधील सौंदर्य या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहे.

‘नुवा’ डायमंड दागिन्यांच्या संग्रहाचा एक भाग म्हणून, ख्यातनाम अभिनेत्री करीना कपूर खान नुवाचा चेहरा म्हणून कायम आहे. तिची सहजसुलभ अभिजातता, आत्मविश्वास आणि चिरकालीन आकर्षण हे या संग्रहातून प्रतीत होणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र ओळख, आधुनिक स्त्रीत्व आणि कालातीत अभिजाततेचा उत्सव यांचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे.

एम.पी.अहमद, अध्यक्ष, मलाबार ग्रुप म्हणाले,“या संग्रहाच्या केंद्रस्थानी आपल्या आजूबाजूच्या जगाला शांतपणे आकार देणारे पण अनेकदा दुर्लक्षित राहणारे गुंतागुंतीचे पोत, रचना आणि तपशील अशा विविध आकृतीबंधांच्या कलात्मकतेबद्दलची एक सखोल प्रशंसा आहे. नुवाच्या माध्यमातून आम्हाला हे सौंदर्य अभिजात, बहुपयोगी आणि आजच्या महिलांसाठी सुसंगत वाटेल अशा एका समकालीन नॅचरल डायमंड संग्रहात रूपांतरित करायचे होते. प्रत्येक दागिना उत्कृष्ट कारागिरी आणि सहजसुलभ अभिजातता मधील समतोल दर्शवतो. त्यातून असे दागिने तयार होतात की जे विविध प्रसंगी आणि पिढ्यानपिढ्या परिधान केले जाऊ शकतात आणि त्यांचे कौतुक केले जाऊ शकते.”

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नुवाच्या या नव्या आवृत्तीत नॅचरल डायमंड्सच्या माध्यमातून आधुनिक वैभव साजरे करण्यात आले असून, निसर्गातील उत्कृष्ट निर्मिती आणि जागतिक डिझाइन प्रभाव यांपासून प्रेरणा देण्यात आली आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आरती मित्तल ही आज मनोरंजन विश्वातील एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे

मुंबई। दिल्लीतील प्रतिभावान अभिनेत्री आरती मित्तल आपल्या मेहनतीने, शिस्तीने आणि प्रभावी अभिनयाने मनोरंजन विश्वात सातत्याने नवनवीन उंची गाठत आहे. अभिनयाप्रती तिची निष्ठा, प्रत्येक पात्राला सहजतेने जिवंत करण्याची तिची क्षमता आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची तिची इच्छा, यांमुळे तिचे नाव उदयोन्मुख प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये निश्चितपणे गणले जाते. आरतीने आपल्या अभिनय कारकिर्दीचा पाया रंगभूमीवर घातला, जिथे तिने अभिनयातील बारकावे शिकले आणि आपल्या कलेला सतत अधिक निखारले. त्यानंतर तिने हरियाणवी आणि पंजाबी म्युझिक व्हिडिओंमधून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या एका पंजाबी गाण्याला एफएम रेडिओवर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामुळे तिला सुरुवातीची ओळख मिळाली. तेव्हापासून तिने मॉडेलिंग, जाहिराती आणि अभिनय क्षेत्रात आपले स्थान सातत्याने निर्माण केले आहे. आरतीने 'विराग' या लघुपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती 'अमृतजल' आणि 'हाऊस ऑफ प्लॉटर्स' यांसारख्या प्रतिष्ठित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसली. तिच्या एका आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मोहिमेचे पोस्टर...

बोरिवलीत स्काय-सिटी मॉलमध्ये 'क्रोमा' झाला दाखल

मुंबई महानगर क्षेत्रात क्रोमाची एकूण ५४ आणि संपूर्ण महाराष्ट्रात १०५ स्टोअर्स झाली मुंबई। टाटा ग्रुपच्या 'क्रोमा' या ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल कंपनीने मुंबईतील बोरिवली येथील स्कायसिटी मॉलमध्ये आपले नवीन स्टोअर सुरू करून महाराष्ट्रातील आपल्या रिटेल विस्ताराला अधिक गती दिली आहे. या नवीन स्टोअरसह आता मुंबई महानगर क्षेत्रात क्रोमाची एकूण ५४ स्टोअर्स आणि संपूर्ण महाराष्ट्रात १०५ स्टोअर्स झाली आहेत. मुंबईतील ग्राहकांना उत्कृष्ट ओम्नी-चॅनेल शॉपिंगचा अनुभव देणे आणि या अत्यंत महत्त्वाच्या बाजारपेठेत ब्रँडची पकड अधिक मजबूत करणे, हा या लॉन्चचा मुख्य उद्देश आहे. बोरिवली येथील स्कायसिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर (युनिट नंबर एफ-२७ आणि एफ-२८) असलेले हे प्रीमियम स्टोअर ७,०७५ स्क्वेअर फूटचे आहे. बोरिवली आणि आसपासच्या परिसरातील नागरिक येथे सहज पोहोचू शकतात. या स्टोअरमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विस्तृत रेंज उपलब्ध आहे. मोठी उपकरणे, स्मार्टफोन आणि घरगुती वापराची तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करू शकतात. यासोबतच ग्राहकांसाठी आकर्षक लॉन्च ऑफर्सही उपलब्ध आहेत. मयंक संगानी, चीफ बिझनेस ...

डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल मध्ये दुर्मिळ अशा दुहेरी नेत्र शस्त्रक्रियेनंतर नवी मुंबईतील 62 वर्षीय व्यक्तीला दृष्टिदान

• खोल कॉर्नियल स्कार असलेल्या परिपक्व मोतीबिंदूवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पिनहोल प्युपिलोप्लास्टी या एकत्रित उपचारानंतर रुग्णाच्या दृष्टीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. • डॉ. अमर अग्रवाल यांनी विकसित केलेल्या पिनहोल प्युपिलोप्लास्टीमुळे, पात्र रुग्णांमध्ये कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्याचबरोबर दृष्टीसाठी उत्कृष्ट परिणामही मिळाले आहेत. नवी मुंबई। नवी मुंबईतील वाशी येथील 62 वर्षीय रहिवासी सुभाष विष्णू चाचे यांना 'डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटल मध्ये एका दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या दुहेरी शस्त्रक्रियेनंतर दृष्टी परत मिळाली आहे. सुभाष यांच्या डाव्या डोळ्यात पूर्णपणे विकसित झालेला मोतीबिंदू आणि कॉर्नियावर (बुबुळाच्या बाह्य आवरणावरील) खोल व्रण होता; ही एक दुर्मिळ आणि आव्हानात्मक स्थिती होती, ज्यामुळे जवळपास त्यांची दृष्टी गेलेली होती. रुग्णालयाच्या वडाळा येथील केंद्रातील नेत्रतज्ज्ञांच्या पथकाने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसोबतच पिनहोल प्युपिलोप्लास्टी (PPP) ही प्रक्रिया करून त्यांची दृष्टी यशस्वीरित्या पूर्ववत केली आहे. सुभाष चाचे यांची दृष्टी अनेक ...