सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंगकडून ‘द बिग बीस्पोक एआय फेस्ट'ची घोषणा

मुंबई। सॅमसंग इंडियाने द बिग बीस्पोक एआय फेस्टची घोषणा केली आहे. हा फेस्ट १२ जून ते १९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या फेस्‍टदरम्‍यान कंपनीच्या बीस्पोक एआय होम अप्लायन्सेस पोर्टफोलिओवर आकर्षक समर डील्स उपलब्ध असतील. या उन्हाळ्यात एआय-सज्ज आधुनिक जीवनशैलीचा आनंद घेणे ग्राहकांसाठी अधिक सुलभ व्हावे, यासाठी निवडक बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि इतर होम अप्‍लायन्‍सेसवर ग्राहक २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक आणि विस्तारित वॉरंटी फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.

या ऑफरसाठी पात्र असलेले रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशिन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्षाच्या विस्तारित वॉरंटीचे पैसे भरून सॅमसंग केअर+ च्या माध्यमातून अतिरिक्त दोन वर्षांची वॉरंटी मोफत मिळू शकते. तसेच, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्ससाठी ग्राहक फक्त ९९ रूपयांमध्ये एक वर्षाची विस्तारित वॉरंटी मिळवू शकतात.

ग्राहकांना निवडक टॉप लोड वॉशिंग मशिन्सच्या इन्स्टॉलेशनसोबत एक मोफत फिल्टर देखील मिळेल. हा फिल्टर मशिनचे धूळ आणि गंज लागण्यापासून संरक्षण करतो, ज्यामुळे मशिनचा टिकाऊपणा वाढतो. याव्यतिरिक्त, सॅमसंग फायनान्स+ वापरणाऱ्या ग्राहकांसाठी या ऑफरमध्ये १,००० रूपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा समावेश आहे. सॅमसंग फायनान्स+ ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आणि सॅमसंग अप्‍लायन्‍सेस खरेदी करण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित प्रक्रिया प्रदान करते.

तसेच, ग्राहक एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीचा लाभ घेऊ शकतात, ज्यामधून दीर्घकालीन विश्वासार्हता आणि मनःशांती मिळते.

द बिग बीस्पोक एआय फेस्टच्या या ऑफर्स सॅमसंग डॉटकॉम, प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्‍ये उपलब्ध आहेत.

प्रगत एआय आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीवर आधारित सॅमसंगची बीस्पोक एआय अप्‍लायन्‍सेस अधिक स्मार्ट, सुलभ आणि ऊर्जा-कार्यक्षम पर्याय देतात. बीस्पोक एआय एअर कंडिशनर्स जलद कूलिंग देतात आणि सातत्यपूर्ण आरामासाठी हवेचा प्रवाह आपोआप समायोजित करतात. स्मार्टथिंग्स होम केअरशी जोडलेले हे एसी कामगिरीवर सक्रियपणे लक्ष ठेवतात, गॅसची कमतरता किंवा फिल्टर साफ करणे यांसारख्या समस्या शोधतात आणि वापरकर्त्यांना आगाऊ सूचित करतात.

किचनमध्‍ये, बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर्स सॅमसंगच्या कनेक्टेड परिसंस्‍थेद्वारे एआय-सज्ज सोयीस्करता आणि विनासायास होम मॅनेजमेंट प्रदान करतात. दुसरीकडे, बीस्पोक एआय वॉशिंग मशिन्स कार्यक्षम आणि प्रभावी स्वच्छतेसाठी कपडे धुण्याची प्रक्रिया (वॉश सायकल्‍स) अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी एआयचा वापर करतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

सलग चार वेळा ९ थरांची सलामी देत बाल गोपाल गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

कांजूरमार्ग पूर्वच्या बाल गोपाल गोविंदा पथकाचा दहीहंडी उत्सवात डंका; ईशान्य मुंबईत अभिमानाची कामगिरी मुंबई : दहीहंडी उत्सवातील थरार, साहस आणि गोविंदांच्या जिद्दीचे दर्शन घडवत बाल गोपाल गोविंदा पथक, कांजूरमार्ग पूर्व यांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात या पथकाने तब्बल चार वेळा ९ थरांची मानवी मनोरा रचना यशस्वीपणे साकारत आपल्या शिस्तबद्ध आणि दमदार कामगिरीची छाप उमटवली. विशेष म्हणजे, विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवात बाल गोपाल गोविंदा पथकाने ९ थरांची रचना करत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. पहिल्या प्रयत्नात मोहन चिराठ, नाहूर, दुसऱ्या प्रयत्नात राधा फाउंडेशन, चेंबूर, तिसऱ्या प्रयत्नात विक्रोली, कन्नमवार नगर येथे ९ थर यशस्वीरीत्या रचण्यात आले. तर चौथ्या वेळी कांजूरमार्ग पूर्व येथे ९ थरांचा मनोरा रचना साकारत पथकाने आपल्या कामगिरीवर कळस चढवला. या ऐतिहासिक यशामागे पथकातील गोविंदांची अथक मेहनत, नियमित सराव, शिस्त, एकजूट आणि परस्परांवरील विश्वास यांचा मोठा वाटा आहे. पथकाला कोच राजू लाखन बाबू पाटणकर आणि कोच विनोद वांगणे यांचे मोलाचे मार्ग...