सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे सिनेमागृहात ५० यशस्वी दिवस पूर्ण

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीचा महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रचला इतिहास; १०० कोटींचा विक्रम गाठल्यानंतर चित्रपटगृहांमधील ५० दिवसांची दैदिप्यमान घोडदौड कायम

महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने आज चित्रपटगृहांमधील यशस्वी ५० दिवस पूर्ण करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर ‘राजा शिवाजी’ने त्या सर्व अपेक्षांनाही मागे टाकत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश संपादन केले.

रितेश विलासराव देशमुख यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला हा चित्रपट जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मात्र ‘राजा शिवाजी’चे यश केवळ आर्थिक आकडेवारीपुरते मर्यादित नाही. गेल्या ५० दिवसांत या चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ‘हिंदवी स्वराज्या’ची प्रेरणा, स्वाभिमानाची भावना आणि इतिहासाबद्दलचा अभिमान पुन्हा एकदा जनमानसात जागवण्यात या चित्रपटाला मोठे यश मिळाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि रयतेच्या कल्याणासाठीचा त्यांचा संघर्ष यांचे भव्य चित्रण ‘राजा शिवाजी’मधून करण्यात आले आहे. इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंगांना आधुनिक तंत्रज्ञान, नेत्रदीपक दृश्यरचना आणि प्रभावी कथनशैलीची जोड देत या चित्रपटाने प्रेक्षकांना एका विलक्षण ऐतिहासिक अनुभवाची अनुभूती दिली. त्यामुळेच सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असून आजही अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भक्कम फळी. रितेश विलासराव देशमुख यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका चित्रपटाच्या भव्यतेत अधिक भर घालतात.

'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित ‘राजा शिवाजी’ची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये जगभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ व्यावसायिक यशाची नवी शिखरे गाठली नाहीत, तर इतिहासाविषयीची जाणीव, सांस्कृतिक अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला आदर यांनाही नव्या उंचीवर नेले आहे.

चित्रपटगृहांमधील ५० दिवसांचा टप्पा पार करताना ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक यशस्वी चित्रपट म्हणून नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला वाहिलेली एक भव्य आदरांजली म्हणून ओळखला जात आहे. प्रेक्षकांचे प्रेम, कलाकारांचे समर्पण आणि 'जिओ स्टुडिओज' तसेच 'मुंबई फिल्म कंपनी'च्या भव्य दृष्टिकोनातून साकारलेली ही महागाथा मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरली आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

सॅमसंगचा बीस्‍पोक एआय विंडफ्री एसीद्वारे स्मार्ट कूलिंगचा अनुभव

मुंबई। लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २३ मॉडेल्‍स, तसेच ४-स्‍टार व्‍हेरिएण्‍ट्स असलेली नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमतता आणि प्रीमियम डिझाइनवर लक्ष केंद्रित करते. भारतातील कुटुंबांना वाढत्‍या तापमानाचा आणि सतत बदलत असलेल्‍या हवामान स्थितींचा सामना करावा लागत असताना एअर कंडिशनिंगबाबत अपेक्षा साध्‍या कूलिंगपलीकडे जात आहेत. सॅमसंगची १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२६ लाइनअप या परिवर्तनाचे निराकरण करते, जेथे या लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रीमियम डिझाइन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. हे एअर कंडिशनर्स रूममधील स्थिती आणि वापरकर्त्‍याच्‍या पसंतीशी सर्वोत्तमपणे जुळून जातात, जेथे योग्‍य कूलिंग व आरामदायीपणा देतात. रूममध्‍ये त्‍वरित कूलिंग निर्माण करायचे असल्‍यास एआय फास्‍ट व विंडफ्री कूलिंग+ वैशिष्‍ट्ये साह्य करतात, तर ड्राय कम्‍फर्ट मोड भारतातील मान्‍सूनच्‍या काळात आर्द्रतेवर देखरेख ठेवत...

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई। ज्येष्ठ पत्रकार आणि 'मुंबई तरंग' (गुजराती आणि हिंदी वृत्तपत्र) तसेच 'वेस्टर्न इंडिया टाइम्स' (इंग्रजी दैनिक) चे मुख्य संपादक, दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वश्रुत आहे की, दिलीप पटेल हे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या निःपक्षपाती आणि निर्भीड लेखनासाठी ओळखले जातात. ते मुंबईत, तसेच दिल्लीसह संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनता, सरकार आणि प्रशासनाशी सक्रियपणे संवाद साधतात. कामगार, शेतकरी आणि सैनिकांचा आवाज नेहमीच उठवणाऱ्या, तसेच सरदार साहेबांच्या 'सामर्थ्यवान भारताचा पाया, सरदारांचे विचार' आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीची पक्षाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने गुजरातमध्ये पक्षाला आणखी बळकटी मिळेल.