सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंगची फुटबॉल चाहत्यांसाठी नवी मोहीम

मुंबई: सॅमसंग इंडियाने फुटबॉल चाहत्यांसाठी आपल्या व्हिजन एआय बिग टीव्हींवर विशेष ऑफर्स जाहीर केल्या. ‘बिग गेम, बिगर स्क्रीन, बिगेस्ट मोमेंट्स’ ही मोहीम फुटबॉल चाहत्यांना एआय सॉकर मोड असलेल्या सॅमसंग व्हिजन एआय टीव्हींच्या माध्यमातून खेळाचा थरार आपल्या घरी आणण्याची संधी देते.

सॅमसंगच्या २०२६ मधील व्हिजन एआय टीव्ही श्रेणीमध्ये उपलब्ध असलेला हा एआय सॉकर मोड फुटबॉलचा चेंडू अधिक स्पष्टपणे फिरताना दिसण्यासाठी, आकर्षक रंगसंगतींसाठी आणि स्टेडियमसारखाच उत्कृष्ट आवाज देण्यासाठी रिअल-टाइम सीन्‍सचे विश्‍लेषण करून फुटबॉल पाहण्याचा आनंद वाढवतो.

सॅमसंगचा व्हिजन एआय कम्पॅनियन (व्हीएसी) बिक्‍स्‍बी, परप्लेक्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट यांसारख्या एआय प्लॅटफॉर्म्सना एकत्र जोडतो. हा टीव्ही एआय अपस्केलिंग प्रोद्वारे कमी रिझोल्यूशन असलेल्या कंटेंटची गुणवत्ता, डेप्‍थ आणि कॉन्ट्रास्ट सुधारून वैयक्तिकृत टीव्ही पाहण्याचा अनुभव देतो. यामधील कलर बूस्टर प्रो प्रत्येक सीनमधील रंग अधिक सुयोग्य करून नैसर्गिकरित्या जिवंत बनवते, तर एआय साऊंड कंट्रोलर प्रो कॉमेंट्री, संगीत आणि प्रेक्षकांच्या आवाजात योग्य ताळमेळ साधून विशाल व स्पष्ट आवाज प्रदान करतो.

या ऑफर्सचा भाग म्हणून, ग्राहकांना खरेदी केलेल्या मॉडेलनुसार ९२,९९० रुपयांपर्यंतचा साऊंडबार किंवा २,१४,९९० रुपयांपर्यंतचा टीव्ही मोफत मिळणार आहे. ही डिल अधिक फायदेशीर करण्यासाठी, सॅमसंग २० टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट पर्याय आणि ३० महिन्यांपर्यंतचे ईएमआय प्‍लॅन्‍स देत आहे.

आकार ७५ इंचांपेक्षा जास्त असलेले सॅमसंग व्हिजन एआय बिग टीव्ही सॅमसंग टीव्ही प्लस, सॅमसंग केअर+, सॅमसंग फायनान्स+, साऊंड प्लस, आर्ट प्लस आणि सात वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन भविष्यासाठी सज्ज संपूर्ण मनोरंजनाचा अनुभव देतात. ग्राहक व्हिजन एआय बिग टीव्हीची ही श्रेणी एक्‍सप्‍लोअर करू शकतात आणि सॅमसंग इंडियाच्या रिटेल स्‍टोअर्समध्ये व ऑनलाइन चॅनेल्सवर या विशेष ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

अल्केमने हेअर ग्रोथ सिरम 'रेनोशिया एक्सो' लॉन्च केले

मुंबई। अल्केम लॅबोरेटरीज लि .ने रेनोशिया एक्सो™ लाँच करण्याची घोषणा केली, जे एका सर्वसमावेशक वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे हेअर फॉलिकलचे (केसांच्या मुळांचे) आरोग्य आणि चेतना टिकवून ठेवण्यासाठी विकसित केलेले नेक्स्ट-जनरेशन हेअर रीजनरेशन उपचार तंत्रज्ञान आहे. केस गळती ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या त्वचारोगविषयक समस्यांपैकी एक म्हणून समोर आली आहे, ज्याचा परिणाम केवळ वाढत्या वयाच्या व्यक्तींवर नाही, तर अनुवंशिकता, जीवनशैलीतील बदल, पर्यावरणीय तणाव आणि आरोग्यशैलीतील बदलांमुळे वाढत्या तरुण वर्गावरही होत आहे. वर्षानुवर्षे उपचारांचे पर्याय वाढले असले तरी, केस गळती अनेक जैविक घटकांच्या एकत्रित प्रभावामुळे होते हे सर्वज्ञात आहे. तरीदेखील अनेक उपचार अद्याप केसांच्या वाढीच्या चक्राच्या केवळ मर्यादित घटकांवर भर देतात. या लाँचबाबत मत व्यक्त करत अल्केमचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप सिंग म्हणाले, “केसांच्या पुनरुज्जीवनाचे विज्ञान गेल्या दशकात लक्षणीयरित्या विकसित झाले आहे आणि त्याचप्रमाणे केस पातळ होण्यामागील कारणांची आपली समजही वाढली आहे. यावर फॉलिक्युलर मिनिअॅचरायझेशन, बदललेले सेल्यूलर ...