सीधे मुख्य सामग्री पर जाएं

एआय करिअरला नवा आकार देत असताना डब्ल्यूपीयू गोवा उच्च शिक्षणात ट्रान्सडिसिप्लिनरी (आंतरशाखीय) दृष्टिकोनाला समर्थन देत आहे

युनिव्‍हर्सिटीमधील नेतृत्‍वाने वेगवान तंत्रज्ञान बदलांच्या या युगात अनुकूलता, आजीवन शिक्षण आणि ट्रान्सडिसिप्लिनरी शिक्षणाच्या वाढत्या गरजेवर भर दिला

मुंबई। आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) आणि वेगवान तंत्रज्ञान बदल जगभरातील उद्योगांना नवा आकार देत असताना युनिव्‍हर्सिटीजनी विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या पहिल्या नोकरीसाठी तयार करण्यापलीकडे जाणे आवश्यक आहे. त्याऐवजी, त्यांना आयुष्यात येणाऱ्या अनेक करिअर बदलांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे, असे मत २० जून रोजी आयोजित वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) गोवा ओपन हाऊसमध्ये प्रवक्त्यांनी व्‍यक्त केले.
या इव्‍हेण्‍टमध्‍ये भावी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणतज्ज्ञ एकत्र आले होते. वाढत्या अनपेक्षित जगात उच्च शिक्षणाचे भविष्य आणि युनिव्‍हर्सिटीजकडून बदलत असलेल्या अपेक्षा यावर यावेळी सखोल चर्चा झाली. या संपूर्ण संवादाच्या केंद्रस्थानी डब्ल्यूपीयू गोवाचे ट्रान्सडिसिप्लिनरी शैक्षणिक मॉडेल होते, जे एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासोबत विविध क्षेत्रांचा एकत्रित विचार करण्याची क्षमता, बदल स्वीकारण्याची तयारी आणि वास्तविक जगातील गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देण्याचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्‍न करते.
“डब्ल्यूपीयू गोवाची स्थापना एका ट्रान्सडिसिप्लिनरी (आंतरशाखीय) दृष्टिकोनातून केली जात आहे, जी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकाच विषयाच्या सीमांच्या पलीकडे जाऊन विविध दृष्टिकोनांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित करते. प्रत्‍यक्ष अनुभवजन्य शिक्षण, उद्योग क्षेत्राशी जोडणी, जागतिक अनुभव आणि सक्रिय शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून पदवीधरांना आयुष्यभर शिकण्यासाठी, परिस्थितीनुसार बदलण्यासाठी आणि नेतृत्वासाठी सज्ज करण्याचे युनिव्‍हर्सिटीचे उद्दिष्ट आहे. तसेच यामुळे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट नोकऱ्यांची संधी खुल्‍या होतील, जिथे विद्यार्थी त्यांनी शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष वापर करू शकतील,” असे व्‍हाइस चान्‍सलर प्रोफेसर वॉल्टर लील म्हणाले.
"विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या नोकरीसाठी तयार करणे पुरेसे आहे, असे गृहीत धरून युनिव्‍हर्सिटीज आता चालणार नाहीत,” असे डब्ल्यूपीयू गोवाचे प्रो व्‍हाइस चान्‍सलर डॉ. आशिष भारद्वाज म्हणाले. "त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात येणारे अनेक बदल, स्थित्यंतर आणि संधींना सामोरे जाण्यासाठी सक्षम होत आहेत का? भविष्य केवळ विशिष्ट विषयातील तज्ज्ञांचे नसेल, तर अशा व्यक्तींचे असेल, जे सतत शिकू शकतात, वेगवेगळ्या क्षेत्रांतील कल्पनांची सांगड घालू शकतात आणि पारंपारिक चौकटीत न बसणाऱ्या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देऊ शकतात."
पारंपारिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत उद्योग क्षेत्र अधिक वेगाने बदलत असल्याने उच्च शिक्षणाबद्दल जुन्‍या गृहितकांचे कशाप्रकारे निराकरण होत आहे, याचा या चर्चेत आढावा घेण्यात आला. नवीन व्यवसाय समोर येत आहेत, प्रस्थापित भूमिका बदलत आहेत आणि एकाच विषयात काम करणाऱ्यांपेक्षा अनेक क्षेत्रांतील कौशल्यांचा मेळ घालणाऱ्या व्यक्तींकडून बाजारपेठेत स्पर्धा वाढताना दिसत आहे.
तंत्रज्ञान कौशल्यांइतकेच शिकण्याची वृत्ती, अनुकूलता आणि वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये काम करण्याची क्षमता भविष्यात महत्त्वाची ठरणार असल्याचे उपस्थितांना सांगण्यात आले. या संवादात भावी करिअरसाठी आवश्यक असणारी जिज्ञासा, संकटांवर मात करण्याची क्षमता आणि आजीवन शिक्षण यांसारख्या मुलभूत गुणांच्या वाढत्या महत्त्वावरही प्रकाश टाकण्यात आला.
प्रवक्त्यांनी भर दिला की, उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना केवळ सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवसायांसाठी प्रशिक्षित करण्याऐवजी भविष्यातील अशा संधींसाठी तयार करावे ज्यांचा आज अंदाज लावणे कठीण आहे.
डब्ल्यूपीयू गोवामध्ये सध्या बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ऑनर्स), बी.डेस. इन इंटिग्रेटेड प्रॉडक्ट डिझाइन, बी.डेस. इन कम्युनिकेशन डिझाइन, आणि बी.एससी (ऑनर्स) इन सायकॉलॉजी हे कोर्स उपलब्ध आहेत.
भविष्यातील कामाच्या स्वरूपाविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये स्पष्टता नसताना या चर्चेने उच्च शिक्षण संस्थांच्या जबाबदारीला प्रकाशझोता आणले. युनिव्‍हर्सिटीजनी केवळ रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक जीवनात येणाऱ्या निरंतर बदलांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे.

वेबसाइट:
https://wpugoa.edu.in/

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली; देशातील परवडणाऱ्या घरांच्या बाजारात मंदीला छेद परवडणाऱ्या घरांच्या बाजारात राष्ट्रीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय विक्री मुंबई।  लखोटिया रियॅलिटीने सांगितले की, केवळ ५ आठवड्यांत त्यांच्या केवाळे येथील GPS (ग्रेटर पनवेल सुपरझोन) प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे रु. २५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली गेली आहेत. देशभरातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट होत असताना ही विक्री राष्ट्रीय कलाला छेद देणारी ठरली आहे. रु. २५ लाखांच्या घराच्या किमतीनुसार रु.२० लाखांच्या गृहकर्जावर अंदाजे रु. १७,००० मासिक ईएमआय येतो. त्यामुळे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ५०,०००–६०,००० असलेल्या कुटुंबांसाठी घरमालकीची संधी अधिक सुलभ होते. याउलट, मुंबईच्या मध्यवर्ती भागात किंमत-उत्पन्न गुणोत्तर १०:१ पेक्षा अधिक असल्याने, एवढी रक्कम सरासरी सदनिकेच्या खरेदीसाठीच्या आगाऊ रकमेचा क्वचितच पुरेशी ठरते. नाईट फ्रँकच्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी बाजारपेठांमध्ये रु. ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ...

लोणावळ्यातील कैवल्यधाम येथे जगातील पहिल्या योग महाविद्यालयाच्या प्लॅटिनम ज्युबिलीचे उपराष्ट्रपती करणार उद्घाटन

लोणावळा: शतकभराचा वारसा असलेली योग संशोधन संस्था कैवल्यधाम येथे भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 18 सप्टेंबर 2026 रोजी उपस्थित राहणार असून, ते गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम कैवल्यधामच्या लोनावळा कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 1951 मध्ये स्थापन झालेले गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस हे योग शिक्षणासाठी समर्पित जगातील पहिले महाविद्यालय होते. 1962 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संस्थेला अखिल भारतीय उच्च शिक्षण संस्था (All India Institute of Higher Education) म्हणून मान्यता दिली. अशी मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली योग संस्था ठरली. गेल्या 75 वर्षांत या महाविद्यालयाने शिक्षक आणि संशोधकांच्या अनेक पिढ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या माध्यमातून कैवल्यधामच्या पद्धती 65 हून अधिक देशांमध्ये पोहोचल्या आहेत. कार्यक्रमापूर्वी बोलताना कैवल्यधामचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सुबोध तिवारी म्हणाले, “पंचाहत्तर वर्षांपूर्वी या महाविद्यालयाने...