सामान्य लोकांना प्राधान्य देणाऱ्या सुविधांची पॉलीकॅब व्यवस्था
मुंबई। गणेशोत्सवाच्या काळात मुंबई भक्ती आणि उत्सवाच्या वातावरणाने भारलेली असतानाच, पॉलीकॅबने आपल्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाची प्रचिती दिली. शहरातील दोन सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वाची उत्सव स्थळे - लालबागचा राजा आणि जुहू बीच येथे भाविकांची सोय लक्षात घेत योग्य व्यवस्था करत मजबूत बंध निर्माण केले आहेत. भाविकांच्या गरजा ओळखून पॉलीकॅबने आराम, सुरक्षा आणि सुलभतेला प्राधान्य देणाऱ्या कार्यात्मक, भाविकांच्या सोयीसाठी जागा तयार करून त्यांचे स्थान अधिक भक्कम केले आहे. मुंबईतील भाविकांच्या गर्दीच्या गरजा ओळखून त्यांनी आपले उपक्रम तयार केले आहेत. या माध्यमातून पॉलीकॅब सामाजिक भान जपत आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपले स्थान भक्कम करते आहे.
लालबागचा राजा येथे दर्शन प्रवास अधिक सुरळीत आणि आरामदायी करण्यासाठी, पॉलीकॅबने दर्शन मार्गावरील स्थानिक बस स्टॉपचे रूपांतर 'कम्फर्ट झोन' मध्ये केले आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना जरा विसावा घेता येईल. त्यांचे मोबाइल रिचार्ज करण्यासोबतच ऊन तसेच पावसापासून बचावासाठी हा बस स्टॉपचा उपयोग करता येईल. याशिवाय भाविक तसेच स्वयंसेवकांची कनेक्टिव्हिटी राहावी म्हणून पॉलीकॅबने पंडालमध्ये मोबाइल चार्जिंग स्टेशन, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या पोलिसांसाठी कम्फर्ट झोन, तसेच हवा खेळती राहणारे पॉलीकॅब पंख्यांनी सुसज्ज अशा वॉकवे झोनची व्यवस्था केली आहे.
श्वेताल बसू, वरिष्ठ उपाध्यक्ष, ब्रँड आणि मार्कॉम, पॉलीकॅब इंडिया लिमिटेड म्हणाल्या,“गणेश चतुर्थी हा एकता आणि भक्तीचा उत्सव आहे. या व्यवस्थेद्वारे आम्ही समाजाला आराम देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. केवळ उत्पादनांच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, ग्राहक प्रथम कनेक्शन तयार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.''
प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या जुहू बीचवर विसर्जनादरम्यान गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पॉलीकॅबने ब्रँडेड सेफ्टी वॉच टॉवर्स बसवले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना देखील गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. अशा प्रयत्नांमुळे लाखो भाविकांशी असलेले पॉलीकॅबचे नाते अधिक दृढ होते आहे. पॉलीकॅबच्या भारतातील यशस्वी सांस्कृतिक कार्यक्रमांवर हा उपक्रम आधारलेला आहे. पुरीमधील रथयात्रेपासून मुंबईतील गणेश चतुर्थीपर्यंत पॉलीकॅब स्थानिक परंपरांशी जुळवून घेताना आराम, काळजी आणि मजबूत बंधाद्वारे लोकांना प्राधान्य देत उत्सवाचा आनंद द्विगुणित करत आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें