मुंबई। भारताची सर्वात मोठी ४-व्हीलर इव्ही उत्पादक आणि देशाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीची अग्रणी टाटा.ईव्हीने 'नेक्सॉन.ईव्ही ४५' मध्ये एडीएएस सुरक्षा टेक्नॉलॉजी दाखल केल्याचे जाहीर केले. या गाडीचे प्रीमियम अपील आणखी वाढवत कंपनीने त्यात रियर विंडो सनशेड आणि अॅंबियन्ट लाइटिंग सारखी फीचर्स देखील दाखल करून ग्राहकांना अधिक मूल्य देऊ केले आहे. या व्यतिरिक्त, टाटा.ईव्ही ने नेक्सॉन.ईव्ही डार्कचे अनावरण केले आहे, ज्यामध्ये स्टाइल आणि पोर्टफोलियोची वैशिष्ट्ये आणखी वाढवली आहेत.
नवीन दाखल केलेली फीचर्स एम्पॉवर्ड +ए४५, एम्पॉवर्ड +ए ४५ डार्क आणि एम्पॉवर्ड +ए ४५ रेड डार्क पर्सोनामध्ये उपलब्ध असतील आणि यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे १७.२९ लाख रुपये, १७.४९ लाख रुपये आणि १७.४९ लाख रुपये असेल.
या नवीन प्रकारांत ५ स्टार भारत एनसीएपी रेटिंग आहे. अशाप्रकारे संपूर्ण नेक्सॉन.ईव्ही श्रेणी ५ स्टार सुरक्षा प्रमाणित झाली असून त्यातून भारतीय मार्गांसाठी सुरक्षित वाहने बनवण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेस पुष्टी मिळाली आहे. नेक्सॉन.ईव्ही ४५ मध्ये पहिल्या मालकासाठी आजीवन एचव्ही बॅटरी वॉरंटी उपलब्ध आहे. त्यामुळे ईव्ही ग्राहकासाठी संपूर्ण मनःशांती आहे.
नेक्सॉन.ईव्ही ४५ पोर्टफोलियोमधील सुधारणांबद्दल टिप्पणी करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “टाटा.ईव्हीमध्ये आमच्या उत्पादनांत निरंतर सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असतो, जेणेकरून आमच्या ग्राहकांसाठी ही खरेदी अधिक अर्थपूर्ण ठरावी. नेक्सॉन.ईव्ही हे आम्ही आमच्या उत्पादनांचा मूल्य प्रस्ताव वाढविण्यासाठी त्यांचे आकर्षण अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने कशाप्रकारे प्रयत्न केले आहेत याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. एडीएएस सुरक्षा टेक्नॉलॉजी दाखल करून आणि डार्क आवृत्ती लॉन्च करून आम्ही नेक्सॉन.ईव्ही मध्ये एक ठळक आणि अत्याधुनिक सौंदर्यदृष्टी आणत आहोत आणि त्याचवेळी या वाहनाची सुरक्षा आणि प्रीमियम गुणवत्ता वाढवत आहोत. नेक्सॉन.ईव्ही हे ग्राहकांना या श्रेणीतील सर्वोत्तम फीचर्स प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रातिनिधिक रूप आहे आणि ते अशाप्रकारे इनोव्हेशनच्या माध्यमातून मोबिलिटी उद्योगाचे नेतृत्व करण्याच्या आमच्या मिशनला गती देते.”
'नेक्सॉन.ईव्ही डार्कची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये:
'नेक्सॉन.ईव्ही 45 लाइन-अपमध्ये नवीन दाखल केलेल्या डार्क आवृत्तीमध्ये खास, ऑल-ब्लॅक सौंदर्यदृष्टी सहित एक्स्टीरियरवर डार्क ट्रीटमेंट आणि इंटीरियरमध्ये ऑल-ब्लॅक लेदरेट बोल्स्टर्ड सीट्स आहेत. ३५०-३७० किमीच्या सी७५ प्रत्यक्ष रेंजसह आणि ४० मिनिटांत २०% - ८०% च्या जलद चार्जिंग स्पीड सह 'नेक्सॉन.ईव्ही डार्क आपल्यासह पॅनोरमिक सनरूफ, वाहन-ते-वाहन चार्जिंग आणि व्हेइकल टू लोड टेक्नॉलॉजी तसेच ३१.२४ सेंमी हरमन टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि २६.०३ सेंमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रियर विंडो सनशेड आणि अॅंबियन्ट लाइटिंगसाठी एक खास युआय आणि युएक्सयांसारखी फीचर्स घेऊन येत आहे.
शिवाय एडीएएस फीचरमुळे जी इतर फीचर्स सामील झाली आहेत, ती आहेत- ट्रॅफिक साइन रेकग्निशन, लेन सेंटरिंग सिस्टम, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलीझन वॉर्निंग, (पादचारी / सायकलस्वार / कार), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (पादचारी / सायकलस्वार / कार), हाय बीम असिस्ट.
२०२० मध्ये लॉन्च झालेली नेक्सॉन.ईव्ही ही खरोखर एक गेम-चेंजर आहे, जिने भारतात ईव्ही क्रांतीची सुरुवात केली. ती आजही भारताची सर्वाधिक विकली जाणारी ईव्ही आहे, आणि त्याचे कारण आहे या वाहनात असलेले टेक्नॉलॉजी, परफॉर्मन्स आणि फीचर्स यांचे आकर्षक मिश्रण. सुरक्षेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या नेक्सॉन.ईव्हीला भारत-एनसीएपी प्रोटोकॉल अंतर्गत संपूर्ण ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे सर्वार्थाने भारतीय कुटुंबांसाठी ही एक विश्वसनीय गाडी आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें