दूरदर्शी व्यवसाय नेतृत्वाचा सन्मान – लोणावळ्यात भव्य "अल्टिमेट मिलियनेयर ब्लूप्रिंट" कार्यशाळा व अवॉर्ड सोहळा
लोणावळा। व्यवसायाचा खरा उद्देश केवळ नफा नसून समाजाचं उत्थान आहे, या तत्त्वावर आधारित "अल्टिमेट मिलियनेयर ब्लूप्रिंट" ही चार दिवसांची भव्य कार्यशाळा लोणावळ्यात नुकतीच पार पडली.
देवीदास श्रावण नाईकरे यांनी अध्यात्म, व्यवसाय आणि नेतृत्व एकत्र आणणारी ही परिवर्तनयात्रा घडवली. ध्यान, वेदज्ञान आणि आधुनिक बिझनेस स्ट्रॅटेजी यांच्या संगमातून उद्योजकांना "मोठा विचार, स्थिर मन आणि शुद्ध हेतू" यांचं महत्त्व शिकवण्यात आलं.
या कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्रातील टॉप उद्योजकांना गौरविण्यात आलं. विशेष आकर्षण ठरले बॉलीवूड स्टार मुश्ताक खान. त्यांनी आपल्या भाषणात उद्योजकांना संबोधित करताना म्हटलं – "हा अवॉर्ड तुमच्या यशाचा नाही, तर तुमच्या सेवाभावाचा आणि दृष्टिकोनाचा सन्मान आहे."
शेवटी कार्यशाळेचा मुख्य संदेश ठरला, "नेतृत्व म्हणजे केवळ यश मिळवणे नव्हे, तर आपल्या यशातून समाजासाठी नवे मार्ग उघडणे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें