मराठी तरुणाई स्ट्रीट-आर्टमधील गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवणार
मुंबई। झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (झी) या भारतातील कंटेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या नव्या प्रायोगिक टप्प्याच्या पहिल्या अध्यायाची झी लाइव्हची घोषणा केली. त्याअंतर्गत वर्ल्ड ऑफ वाइब्ज या टॅलेट कंपनीच्या सहकार्याने मराठी वाजलंच पाहिजे (एमपीव्ही) हा पहिला प्रमुख कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी फिनिक्स मार्केट सिटी, पुणे येथे होणार असलेला एमपीव्ही हा केवळ एक लाइव्ह कॉन्सर्ट नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामधे मराठी तरुणाई संस्कृतीचं प्रतिबिंब झळकणार असून हिप-हॉप, इंडी म्युझिक, स्ट्रीट आर्टमधील नव्या गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवलं जाणार आहे.
क्रॅटेक्स, संजू राठोड, श्रेयस अँड वेदांग, एमसी गावठी आणि पट्या द डॉक अशा ४०+ कलाकारांचा समावेश असलेलं हे फेस्टिवल धमाल उर्जेसह आजच्या तरुणाईची अस्सल आणि लोकल गोष्ट सांगणार आहे. एमपीव्ही हा असा मंच आहे, जिथं परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्तीचा संगम होईल आणि आजच्या क्रिएटर्सच्या सूर, ताल आणि काव्यासह मराठी अभिमानाची व्याख्या नव्यानं मांडली जाईल.
कार्यक्रमाचा प्रभाव आणखी तीव्र करण्यासाठी झी-लाइव्हने मराठी झी5 सह भागिदारी करत एमपीव्हीची उर्जा प्रत्यक्ष मंचाच्या पलीकडे सर्वदूर जाईल याची काळजी घेतली आहे. खास डिजिटल कंटेंट, आर्टिस्ट स्पॉटलाइट्स व बिहाइंड-द-सीन्स स्टोरीजच्या माध्यमातून हे फेस्टिव्हल प्रत्यक्षातील उर्जेचा अनुभव डिजिटल पातळीवर पोहोचवेल आणि भारतभरातील तरुण चाहत्यांना त्यांची संस्कृती व समाजाशी सहज कनेक्ट होता येईल.
गॅरेथ इस्विन थॉमस, व्यवसाय प्रमुख, झी-लाइव्ह म्हणाले,'‘मराठी वाजलंच पाहिजे हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो सांस्कृतिक ओळख आणि तरुणाईची अभिव्यक्ती आहे. हा कार्यक्रम कशाप्रकारे तरुण पिढीची उर्जा लाइव्ह अनुभवात कशाप्रकारे मांडली जाऊ शकते, अविस्मरणीय क्षणांची निर्मिती कशी केली जाऊ शकते याचं प्रतीक आहे. सांस्कृतिक उत्सवाची ही नवी भाषा आहे.’'
व्ही.आर. हेमा, व्यवसाय प्रमुख, झी5-झी मराठी म्हणाल्या,'‘झी लाइव्हच्या सहकार्याने आम्ही मराठी तरुणांना स्थानिक आणि जागतिक मंच देत आहोत. त्यांचा आवाज आणि त्यांचं संगीत डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवत आम्ही फक्त त्यांचा परफॉर्मन्सच नव्हे, तर त्यांची गोष्ट, संघर्ष आणि स्वप्नंही मांडत आहोत. एमपीव्ही प्रादेशिक कथांच्या क्षेत्रातील नवे पर्व आहे आणि ते धाडसी, अभिमानास्पद, अस्सल व कनेक्टेड आहे.'’
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें